पेरियार: आशियातील सॉक्रेटिस
पेरियार: आशियातील सॉक्रेटिस
इ.व्ही. रामास्वामी म्हणजेच पेरियार यांचा तामिळनाडूच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीवर किती प्रभाव पडला याचा अंदाज यावरून लावता येतो की, साम्यवादापासून दलित चळवळीपर्यंत, तमिळ राष्ट्रवाद, बुद्धिवाद आणि स्त्रीवादापर्यंतच्या प्रत्येक प्रवाहातील लोक त्यांचा आदर करतात. केवळ आदरच नाही तर त्यांना मार्गदर्शक म्हणून मानतात . आशियाचा सॉक्रेटिस असेही म्हणतात.
एका धार्मिक हिंदू कुटुंबात जन्मलेले पेरियार हे धर्माचे कट्टर विरोधक होते. त्यांनी लहानपणापासूनच ब्राह्मणवाद आणि हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यांचा ना मूर्तिपूजेवर विश्वास होता, ना वेदांवर त्यांनी केवळ धार्मिक ग्रंथांची होळी केली नाही तर रावणालाही आपला नायक मानले.
पेरियार यांनी महात्मा गांधींच्या तत्त्वांनी प्रभावित होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यादरम्यान त्यांनी 1924 मध्ये केरळमधील वैकोम सत्याग्रहात महत्त्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये त्यांचा दर्जा खूप उंचावला होता. वैकोम सत्याग्रहानंतर लोकांनी त्यांना ‘वैकोम वीरन’ म्हणजेच ‘वैकोमचा नायक’ ही पदवी दिली. हा तो काळ होता जेव्हा त्यांचा ब्राह्मणांशी आणि काँग्रेसमधील तथाकथित उच्च वर्गाशी संघर्ष वाढू लागला आणि त्यांनी पक्ष सोडला.
नंतर पेरियार यांनी ‘सेल्फ रिस्पेक्ट’ चळवळ म्हणजेच दलित-हरिजन आणि महिलांसाठी स्वाभिमान चळवळ सुरू केली. असे मानले जाते की या चळवळींमुळे तमिळ आणि दक्षिण भारतातील मोठ्या लोकसंख्येला सामाजिक सुधारणेची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच पेरियार यांना राजा राममोहन रॉय, आणि यांसारख्या समाजसुधारकांच्या पंक्तीत ठेवले जाते.
केरळचा वैकोम सत्याग्रह हे दलितांना येथे असलेल्या प्रतिष्ठित मंदिरात प्रवेश करण्याची आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आंदोलनाचा अधिकार देण्याची चळवळ होती. महात्मा गांधींसोबतच इतरही अनेक बड्या नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. पेरियार यांचीही या आंदोलनात महत्त्वाची भूमिका होती आणि त्यासाठी त्यांना तुरुंगातही पाठवण्यात आले होते. अखेर या आंदोलनाला यश आले.
यानंतर पेरियार तामिळनाडूत नायक बनले. वैकोम सत्याग्रह हा ब्राह्मणवादाच्या विरोधात होता आणि पेरियार हे स्वतः ब्राह्मणांचे मुखर विरोधक होते. दक्षिणेत त्यांच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे काँग्रेसमधील ब्राह्मणांचा एक मोठा वर्ग खूप दुखावला गेल्याचे मानले जाते. दुसरीकडे, वैकोम सत्याग्रहातील आपली भूमिका दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे पेरियार यांचे मत होते.
पेरियार यांच्या काँग्रेस नेत्यांशी झालेल्या संघर्षासाठी येथे आणखी एका घटनेचा उल्लेख केला जाऊ शकतो. त्यावेळी काँग्रेस पक्ष तामिळनाडूतील काही गुरुकुलांना आर्थिक मदत करत असे. इथे अनेक गुरुकुलांमध्ये ब्राह्मण आणि इतर जातीच्या मुलांची खाण्यापिण्याची व्यवस्था वेगळी होती आणि जेवणातही गुणवत्तेचा फरक होता. पेरियार यांना त्याविरोधात आवाज उठवायचा होता पण पक्षाने त्याकडे कधीच लक्ष दिले नाही.
याच क्रमाने, 1925 मध्ये, पेरियार यांनी तामिळनाडू काँग्रेससमोर पक्षाच्या नेतृत्वात ब्राह्मणेतरांना अधिक सहभाग देण्याचा प्रस्ताव ठेवला. पण पक्षाने तो साफ फेटाळून लावला. या घटनेनंतर पेरियार यांनी काँग्रेसमध्ये उघडपणे बंडखोरी केली. त्याचवेळी त्यांनी आपल्या समर्थकांमध्ये एक दिवस काँग्रेसचा राज्यातून सफाया करणार असल्याचेही जाहीर केले.
आपल्या राजकीय आवाजाला धार देण्यासाठी पेरियार यांनी 1938 मध्ये जस्टिस पार्टीची स्थापना केली. त्यानंतर 1944 मध्ये त्यांनी ते विसर्जित केले आणि द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) ची स्थापना केली. तामिळनाडूतून काँग्रेसला हद्दपार करण्याचे पेरियार यांचे स्वप्न 1968 मध्ये पूर्ण झाले जेव्हा द्रमुकने राज्यात प्रथमच सरकार स्थापन केले.
पेरियार यांना त्यांच्या काळाच्या पुढचा माणूस असेही म्हणतात. स्त्रीस्वातंत्र्याबद्दलच्या त्यांच्या विचारांवरूनही हे कळू शकते. बालविवाह संपवणे, विधवा महिलांना पुनर्विवाहाचा अधिकार देणे, विवाहाला पवित्र बंधनाऐवजी भागीदारी समजणे अशा सर्व मुद्द्यांवर त्यांनी प्रचार केला. आपल्या भाषणात ते लोकांना सांगत असत की, फक्त ते म्हटल्याने काहीही स्वीकारू नका. पेरियार म्हणाले, ‘विचार करा. जर तुम्हाला पटत वाटत असेल की तुम्ही ते स्वीकारू शकता तरच स्वीकारा, नाहीतर सोडून द्या.’
विकास परसराम मेश्राम
vikasmeshram04@gmail.com