प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी नांदेड विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी नांदेड विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नांदेड: महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी व सर्व कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आल्याने विद्यापीठातील सर्वच कामकाज बंद राहिले.
शासनास वारवार लेखी तसेच संप करून देखील या बाबीची दखल शासनाने घेतली नाही, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांना महाराष्ट्र शासनाने ७ वेतन आयोग २०१६ पासून लागू केला; परंतु महाराष्टातील सर्व त कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना तो 2019 पासून लागू करण्यात आला त्यामुळे महाराष्ट्र शासकीय कर्मचारी आणि विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू करण्यात आलेल्या वेतन आयोगा मध्ये तफावत निर्माण झाली. शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर राहिलेली थकबाकी आश्वासित प्रगती योजना या संदर्भातील जीआर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून विद्यापीठ कर्मचारी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
या परीक्षा कालावधीत देखील असा संपर्क करणे कर्मचारी संघटना देखील योग्य वाटत नाही परंतु शासनाच्या अशा आडमुठ्या धोरणामुळे नाईलाजास्तव आम्हालाही संपाचे हत्यार उपसावे लागत आहे याप्रसंगी आम्ही एवढेच सांगू इच्छितो की आमच्या मागण्या तात्काळ मागणी झाल्यास याचा कोणताही परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर होणार नाही त्यासाठी आम्हाला रात्रीचे दिवस जरी करावे लागले तरी आम्ही कर्मचारी ते पूर्ण करू आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस शिक्षकेतर कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत त्यास केवल शासनच जबाबदार असेल याची नोंद देखील शासनाने घ्यावी.मागील वेळेस देखील आमचं संपवताना शासनाने आम्हाला हमी दिली होती की लवकरच आम्ही आमची शासन निर्णय बदलू आणि विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिला मोठा दिलासा देऊ असे आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी दिले होते परंतु मागील तीन वर्षांपासून केवळ विद्यापीठीय शिक्षण तर कर्मचाऱ्यांना आश्वासनच मिळताहेत ठोस कृती मोठ्या प्रमाणावर शासनाकडून करण्यात येत नाही आणि त्यामुळे आता विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी हे मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊन हा संप मागण्या पूर्ण मान्य होईपर्यंत चालूच ठेवणार असल्याचे सर्व संघटनांनी ठरविले आहेतरी शासनाने कर्मचाऱ्याच्या भविष्याशी त्यासोबतच विद्यापीठाचे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याची अशा प्रकारे खेळ करू नये जेणेकरून यामुळे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य उध्वस्त होईलअशी विनंती सर्व कर्मचारी संघटना आपल्या मार्फत शासनाला करू इच्छित असल्याचे सांगण्यात येत आहे.