देश

चिंताजनक !भारतातील बालके कुपोषणाच्या विळाख्यात..

भारतातील बालके  कुपोषणाच्या विळाख्या

 कुपोषण ही भारतातील गंभीर समस्यांपैकी एक आहे, तरीही या समस्येकडे पाहीजे त्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही .  आज, भारतामध्ये जगातील सर्वात जास्त वाढलेली 4.66 कोटी वयानुसार कमी उंची  व 2.55  मुले अल्प वजनाची आहेत  हे लक्षात घेण्यासारखे आहे .  राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-4 मधील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की देशात कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे, तरीही सर्वात कमी उत्पन्न गटातील निम्म्याहून अधिक मुले अजूनही उची खुंटलेली 51% आणि कमी वजनाची 49%आहेत.

 कुपोषणावरील ताज्या सरकारी आकडेवारीवरून भारतातील कुपोषणाचे संकट अधिक गडद झाल्याचे दिसून येते.  या आकडेवारीनुसार, सध्या भारतात ३३ लाखांहून अधिक मुले कुपोषित आहेत.  यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 17.7 लाख मुले गंभीर कुपोषित आहेत.  सर्वाधिक कुपोषित बालके महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमध्ये आहेत.  महिला आणि बालविकास मंत्रालयाने एका आरटीआयच्या उत्तरात ही  माहिती दिली आहे.  28  राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधील माहीतीच्या  आकड्यांचे  संकलनआहे, असे मंत्रालयाने पीटीआय या वृत्तसंस्थेने आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.


 देशात एकूण 33,23,322 बालके कुपोषित आहेत.  मंत्रालयाचा अंदाज आहे की कोरोना महामारीमुळे गरिबातील गरीब लोकांमध्ये आरोग्य आणि पोषण संकट आणखी वाढू शकते.  यावर चिंता व्यक्त करताना मंत्रालयाने म्हटले आहे की 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत भारतातील 17.76 लाख मुले गंभीर अति कुपोषित  आणि 15.46 लाख मुले  कुपोषित होती.  हे आकडे खूप  चिंताजनक असले तरी गेल्या नोव्हेंबरच्या आकडेवारीशी तुलना केल्यास ते अधिकच चिंताजनक आहेत .  दोन वर्षांच्या आकडेवारीतील एक मोठा फरक म्हणजे गेल्या वर्षी सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जाहीर केली होती.  यंदा ही आकडेवारी थेट पोषण अगंणवाडी केन्द्र वरून घेण्यात आली आहे. 
 आणखी एक फरक म्हणजे या वर्षीच्या आकडेवारीत मुलांच्या वयाचा उल्लेख नाही.  तथापि, कुपोषणाची व्याख्या  करतांना जागतिक आरोग्य संघटनेने  असे म्हटले आहे की , अती गंभीर कुपोषित मुले म्हणजे अशी आहेत ज्यांचे वजन-उंचीच्या  प्रमाण खूप कमी आहे व  ज्यांच्या हाताचा घेर 115 मिलिमीटरपेक्षा कमी आहे .

 याच्या खाली असलेली एक श्रेणी, म्हणजे गंभीर कुपोषित मुले अशी आहेत ज्यांच्या हाताचा घेर 115 ते 125 मिलीमीटर दरम्यान आहे.  दोन्ही परिस्थितींचा मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.अतिगंभीर कुपोषित   सँम अवस्थेत, लहान मुलांचे वजन त्यांच्या उंचीनुसार फारच कमी असते.  अशा मुलांची रोगप्रतिकारक शक्तीही खूप कमकुवत असते आणि काही गंभीर आजारामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नऊ पटीने जास्त असते.

   महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातव्यतिरिक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आसाम आणि तेलंगणा या राज्यांमध्येही कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे.  भारतासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे जगातील प्रसिद्ध शहरांमध्ये गणल्या जाणाऱ्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही एक लाखांहून अधिक बालके कुपोषित आहेत.

 नोव्हेंबर 2020 ते 14 ऑक्टोबर 2021 दरम्यान अति गंभीर सँम मुलांच्या संख्येत 91 टक्के वाढ दिसून आली आहे, जी आता 9,27,606 वरून 17.76 लाख झाली आहे.  महाराष्ट्रात सर्वाधिक 6.16 लाख कुपोषित बालके नोंदवली गेली, त्यापैकी 1,57,984 कुपोषित आणि 4,58,788 अति  गंभीर कुपोषित होती, असे अंगणवाडी पोषण केन्द्र च्या अहवालाचा  हवाला देत आरटीआय उत्तरात म्हटले आहे.  या यादीत बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 4,75,824 लाख कुपोषित बालके आहेत.  त्याच वेळी, गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे गुजरातमध्ये कुपोषित बालकांची एकूण संख्या 3.20 लाख आहे.  यामध्ये 1,55,101 अतिगंभीर कुपोषित मुले आणि 1,65,364 कुपोषित  मुलांचा समावेश आहे.

 इतर राज्यांमध्ये, आंध्र प्रदेशात 2,67,228 मुले  कुपोषित आहेत.  कर्नाटकात 2,49,463 मुले  कुपोषित आहेत.  उत्तर प्रदेशमध्ये 1.86 लाख, तामिळनाडूमध्ये 1.78 लाख, आसाममध्ये 1.76 लाख आणि तेलंगणामध्ये 1,52,524 लाख बालके कुपोषित आहेत.  त्याचबरोबर बालकांच्या कुपोषणाच्या बाबतीत  दिल्लीही मागे नाही दील्लीत 1.17 लाख मुले कुपोषित आहेत.  2011 च्या जनगणनेनुसार देशात 46 कोटींहून अधिक मुले आहेत.

 याशिवाय ग्लोबल हंगर इंडेक्समध्येही भारताचे स्थान आणखी घसरले आहे.  116 देशांमध्ये, जिथे भारत 2020 मध्ये 94 व्या क्रमांकावर होता, तो 2021 मध्ये 101 वर घसरला आहे.  भारत आता आपल्या शेजारी देश पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळपेक्षाही मागे पडला आहे.  हे अत्यंत चिंताजनक आहे.

 विकास परसराम मेश्राम 
vikasmeshram04@gmail.com

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button