स्प्रुट लेखन

मरणानंतर मालमत्ता सील व्हावी!

मरणानंतर मालमत्ता सील व्हावी!

         अलिकडे  मायबापाचं मुलांशी पटत नाही. त्यातच मायबाप मुलांना डोईजड झालेले दिसतात. मायबापाची सेवा करायला कोणीच पाहात नाही.
        मायबाप मुलांना जन्मास घालतात. त्यातच त्या मुलांना लहानाचं मोठं करीत असतांना काबाडकष्ट करतात. मुलांना उन्हातून सावलीत नेतात. शेवटी ही मुलं मोठी झाली आणि त्यांना पंख फुटताच उडायला लागली तर ती माणुसकी विसरतात व त्यातून ते आपल्या मायबापालाही ओळखत नाहीत. 
       मायबापाला मुलांना मोठे करतांना मोठी कठीणाई सहन करावी लागते. ती मुलांच्या पालनपोषणासाठी मोठं दुःख सहन करीत असतात. त्यातच त्याला दूध पाजण्यापासून तर त्याला शिक्षण देणं, कपडे घेवून देणं. तसंच त्यांच्या आवडीनिवडी जोपासणं इत्यादी कामंही मायबाप करीत असून त्यांच्या तरुण झाल्यावर त्यांना पोटापाण्याला लावण्यासाठी त्यांना नोकरीही हेच मायबाप लावून देतात.
       मुलांना शिक्षण शिकवीत असतांना अंगावर येणारे व्रण मायबाप सहन करतात. त्यातच मुलं उच्च शिक्षण शिकली की आपल्या नोक-या प्राप्त करुन आपला विवाहही उरकवतात. त्यातच त्यांचा विवाह झाला की ही मुलं आपल्या मायबापाला ओळखतही नाहीत.
       विवाह करतांना आपल्या मुलाला कोणती मुलगी योग्य होईल, कोणती नाही हे मायबापाला माहित असतं. त्यातच मुलीवाल्यांनाही कोणता मुलगा चांगला आणि कोणता नाही हे माहित असतं. परंतू आजची मुलं ही आपापल्या मायबापांना विचारुन विवाह करीत नाहीत. मग फसतात व त्यानंतर आपल्या पत्नीच्याच इशा-यावर चालत असतात. त्यातच जेव्हा त्यांचे मायबाप त्यांना भेटायला येतात. तेव्हा ते त्यांची सेवा करण्याऐवजी त्यांचा अपमानच करीत असतात. ते आपल्या सासूसास-यांसमोर किंवा आपल्या मित्र परीवारासमोर त्यांना आपल्या घरचे नोकर आहेत असं संबोधन देतात. त्यावेळी त्यांना जन्म देणा-या त्या मायबापांना मरणासन्न यातना होतात. त्यातच काही आत्महत्या करतात. तर काही जगतात. वैफल्य गिळून. त्यांना वाटत असतं की यापेक्षा मी निपुत्रीक असतो तर बरं झालं असतं.
        आजच्या काळात अशी पिढी निपजली आहे की ती पिढी आपल्या मायबापावर प्रेम करीत नाही. ते त्यांना नकोसे वाटतात. त्यातच जे मायबाप राब राब राबून, काळं पांढरं करुन पै पै पैसा कमवतात. त्या मायबापांना ही पिढी त्यांच्या म्हातारपणी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवीत असते. ज्या वयात विरंगुळा म्हणून नातवंड खेळवाविशी वाटतात. त्याच वयात त्यांची मुलं त्यांना वाळीत टाकून त्यांनी बांधलेल्या घरावर ताबा करुन मनसोक्त सुख भोगत असतात. एवढेच नाही तर ते मरणानंतर त्यांची जी मालमत्ता असते. ती विभागून वा विकून मनसोक्त आनंदात लोळत असतात. काही तर या फुकटात मिळणा-या  मालमत्तेनं दारु, गांजा, चरस यासारखे वेगवेगळे शौकं करुन तो कण कण गोळा केलेला पैसा उडवतात.
       अलिकडे अशीच पिढी आली आहे. सहा सहा मुले असलेली मायबाप आजही रस्त्यावर आहेत. त्यांची कोणीही सेवा करायला तयार नाहीत. याउलट ते मेल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचे तुकडे करुन त्या मालमत्ता हस्तगत करणारे महाभाग या देशात काही कमी नाही. ज्या देशात पूर्वी संस्कार चालायचे. आज मात्र पाश्चात्यांच्या अनुकरणातून ते संपलेले आहेत. मी आणि माझी पत्नी व माझी मुले, एवढंच त्यांचं आज अस्तित्व शिल्लक आहे. याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार सरकारचं धोरण आणि आजूबाजूचं वातावरण. हे सुधारता येवू शकते. त्यासाठी खालील उपाययोजना करता येईल.
      १) सरकारनं असा कायदाच करावा. त्या कायद्यानुसार ठरवावं की जो व्यक्ती मायबापाची सेवा करीत असेल, त्यालाच मरणानंतर मालमत्ता द्यावी. तसं सिद्ध करायला लावावं. तसेच जो सेवा करीत नसेल,  त्यांची मालमत्ता सरकारजमा करावी. याचा परीणाम असा होईल की प्रत्येक मुलगा मायबापाची लोभापायी तरी सेवा करेल.
         २) ज्या मुलाला मायबापानं काबाडकष्ट करुन शिकवलं. त्या मुलाला जर सरकारी नोकरी असेल आणि त्यानं मायबापाची सेवाच केलेली नसेल, तर अशांच्या नोक-या कायमस्वरुपी काढून घ्याव्यात.
       ३) जो मायबापाची सेवा करीत नसेल, अशा मुलांची संपत्ती त्या मायबापाच्या मरणानंतर सील व्हावी.
        ४) जे मायबापाची सेवा करीत नसतील, अशांना कोणत्याही सरकारी योजना मिळू नयेत.
       ५) जो मायबापाची सेवा करीत नसेल, अशा मुलांना समाजानंही वाळीत टाकावं. 
        ६) जो मायबापाची सेवा करीत नसेल, अशा पालकांची मुलं कोणत्याही शाळेनं आपल्या शाळेत घेवू नयेत.
       ७) जे मायबापाची सेवा करीत नसतील, अशासाठी सरकारनं विशेष कायदे बनवावेत. त्यांच्या मुलांकडून जबरदस्तीनं पैसा वसूल करुन तो पैसा मायबापाच्या खात्यात गोळा करावा.
      ८) जो मायबापाची सेवा करीत नसेल, अशांना मालमत्ता प्राप्त करण्याचा अधिकारच देवू नये.
       ९) ज्याप्रमाणे सरकारनं मतदानकार्ड व आधार कार्ड काढलं. तसं मायबापाची सेवा करणारं कार्ड काढावं. त्याच कार्डानुसार कोणत्याही योजना लागू कराव्यात.
      वर उपयोजीलेले प्रकार केल्याने खरंच समाज सुधारेल. प्रत्येक व्यक्ती मायबापाची सेवा करेल. त्यातच संस्कार टिकेल व समस्त देशात मायबापाची सेवा न करणारा कोणीही सापडणार नाही. 

   अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button