संपादकीय

राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत बौद्धांचे सर्वाधिक योगदान;बौद्ध धम्म स्विकारल्यानंतरची ही वास्तविकता!

राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत बौद्धांचे सर्वाधिक योगदान;बौद्ध धम्म स्विकारल्यानंतरची ही वास्तविकता!

परंपरेच्या कुबड्या झुगारून विज्ञानवादी धम्माचा स्विकार म्हणजे 1956 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूसपण बहाल करणारी ऐतिहासिक क्रांतीच. एवढेच नाही तर मानवी जीवनाच्या वाटा समृद्ध करणाऱ्या सम्यक जीवनाचा स्वीकार म्हणजे मानवी कल्याणाचा एकमवे मार्ग होय.

हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर मानवाच्या प्रगतीच्या दिशा कशा विस्तारत जातात व आपले जीवन हे मंगलमय होते याचा एक प्रत्यय हाती लागला तो असा की,
दलित हिंदू धर्म सोडून बौद्ध झाली त्यांची शैक्षणिक स्थिती, शहरीकरण ,सेक्स रेशिओ आणि काम करणाऱ्यांची संख्या केवळ हिंदू दलितांच्या तुलनेत बदललेली नाही तर संपूर्ण हिंदू च्या तुलनेत अधिक उत्कृष्टतेत बदललेली बाब पुढे आली.

               त्यात सण 2011 च्या जनगणनेतून काही आकडे समोर आल्यानंतर पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्म-परिवर्तनाची क्रांती किती अमुलाग्र बदल घडवू शकते हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे.कारण हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्माचे अनुसरण हे केवळ धर्म परिवर्तन न राहता ती व्यक्ती, समाज ,राष्ट्र विकासाची, संपूर्ण मानव कल्याणाची गुरुकिल्ली ठरत आहे.
             त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म अनुसरल्यानंतर त्या पावलावर पाऊल ठेवत आजच्या घडीला दलित हिंदूंनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांच्यातील परिवर्तन डोळ्याला चकाकी आणणारे आहे. तो बदल खालील प्रमाणे आढळतो.

हिंदू ची साक्षरता केवळ 73. 27 टक्के आहे .
तर बौद्धांची साक्षरता ही 81.29 टक्के आहे.

शिक्षणाच्या बाबतीत बौद्ध परिवारात जास्त लक्ष घातले जाते.

यूपीची संपूर्ण साक्षरता दर 67.5 टक्के आहे
हिंदू ची राष्ट्रीय साक्षरता दर 60.59 टक्के आहे
तर उत्तर प्रदेशमध्ये केवळ बौद्धांची साक्षरता दर 68. 59 टक्के आहे .
म्हणजे तेथील बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला वर्ग हा दलितांच्या व सर्व हिंदूच्या तुलनेत सर्वाधिक साक्षर आहे.

हेच प्रमाण
छत्तीसगडमध्ये 87.5 34%
महाराष्ट्रात 83.17 टक्के
आणि झारखंडमध्ये 80. 41 टक्के बौद्ध साक्षर आढळतात .

महिलांच्या तुलनेत पहावयास झाल्यास बौद्ध महिला साक्षरता दर 74.04 टक्के आहे.
आणि भारतीय एकूण महिला साक्षरता 64.5 63 टक्के आढळतो .
म्हणजेच बौद्ध महिला साक्षरतेच्या बाबतीत 10 टक्के पटीने अधिक आहेत .यावरून असे स्पष्ट दिसते की, बौद्ध समुदाय मुलींच्या शिक्षणावर जास्तीत जास्त लक्ष देतात .
तर हिंदू महिला साक्षरतेच्या बाबतीत 56 टक्के प्रमाण आढळते .
बौद्ध परिवार मुलींना जन्मास घालतात ही आणि त्यांना वाचवतातही.त्यांच्यात स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण आढळत नाही.बौद्धांच्या 1000 पुरुषांमागे 965 महिला आहेत. तर भारताच्या भारताचा आकडा हा 1000 प्रती पुरुषांच्या तुलनेत 943 असा आहे .

भारतात 40 टक्के बौद्ध शहरात राहतात.
त्यात महाराष्ट्रात तर प्रत्येक दुसरा बौद्ध व्यक्ती शहरात राहतो.

आणि जी बौद्ध गावात राहतात ती जास्तीत जास्त शेतावर मजूर म्हणून काम करतात .

त्यातच एक अभिमानाची बाब म्हणजे बौद्ध आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त योगदान करणारा समुदाय आहे.
त्यांचे (work participation Ratio )
43.15 टक्के असा आहे.

जो इतर दलितांचा 40. 47 टक्के आहे.
तर राष्ट्रीय सरासरी दर 39.79 आहे.
वरील प्रमाणे आढळणारी तुलनात्मक बदल हे केवळ बौद्ध धम्माच्या अनुसारणातूनच आहे.कारण बौद्ध धम्माची मूल्य ,नीती,ही व्यक्तीला अत्त:दीप :भव चा मार्ग दाखवते.

बौद्ध समाज हा मेहनत, मजुरी करून खातो व भीक मागून खात नाही ही बाबही यात प्रकर्षाने समोर आली.
सर्व आकडेवारी म्हणजेच 2011 च्या जनगणनेतील वास्तवता आहे .

-संदर्भ
(दलित दस्तक)

-रायटर्समंच

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button