शत्रूची ती बहादुर किल्लेदार स्त्री ;जिच्याविरुद्ध जिंकूनही शिवरायांनी आपल्याच सेनापतीला मृत्युदंड दिला कारण..
शत्रूची ती बहादुर किल्लेदार स्त्री ;जिच्याविरुद्ध जिंकूनही शिवरायांनी आपल्याच सेनापतीला मृत्युदंड दिला कारण..
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा लोकशाहीचा समृद्ध रूप आहे.ज्यात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्यतत्वे ओतपोत भरलेली आढळतात. आपला नि परका आपला यात कुठला भेद नाही नाही ना कुठली सूट आहे.म्हणूनच शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे तत्वांशी तडजोड करणारे न्हवते तर तत्व निर्माण करून त्या तत्वाला आचरणात आणत असतांना आपल्या व परक्याचा मुलाहिजा केला जात नसे.
ज्यापद्धतीने
कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्यासंबंधी गैरउद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तरणीताठी अन् देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी अन् ‘आपलीही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते, असे उद्गार काढतात त्याच पद्धतीने जेव्हा ,
आपल्या सेनापतीने तब्बल 27 दिवस लढा लढुन विजयी झाला तरी केलेल्या चुकीबद्दल गय केली नाही.
तो काळ होता १६७८ चा सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीन बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई या बहादूर स्त्रीने २७ दिवस किल्ला लढवला. पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सकुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीने शत्रू असलेल्या खांवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही. कारण शिवाजीची भूमिका होती. स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे. मग ती कुणाचीही असो.हे तत्व अंगीकारताना यासाठी चारित्र्यसंपन्त्रता आणि सौंदर्यासंबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो. आजच्या भडभुंज्या तथाकथित शिवभक्त ‘वतनदारासमोर अन् ‘राजासमोर’ अशी कुणी सुंदर स्त्री आली असती, तर त्यांनी काय उद्गार काढले असते अन् काय केले असते याची कल्पना करून पहा म्हणजे खरा शिवाजी अन् खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल.
(संदर्भ-शिवाजी कोण होता?
कॉ. गोविंद पानसरे)