साहित्य

साहित्यिकांची दैना;अ. भा. सा. संम्मेलन

साहित्यीकांची दैना;अ.भा.सा. संमेलन

         अखिल भारतीय साहित्य संमेलन. मोठ्या थाटामाटात पार पडलं. त्यातच या साहित्य संमेलनाला देशातील विविध लेखक व कविंनी हजेरी लावली. त्यातच कविकट्टाही भरला आणि नव्यानं गझलकट्टा. त्यातच बरेचसे जुनेच साहित्यीक या संमेलनाला दिसली.
     साहित्य संनेलन भरवायला हवं. कारण त्यातून  लेखनीला वाव मिळतं. त्यांना असं वाटायला लागतं की माझ्या लेखनीची कुणीतरी दखल घेतोय. त्यातच काही निमंत्रीत साहित्यीक या संमेलनाला हजेरी लावत असतात.
      *निमंत्रीत साहित्यीक कोण असतात*
       निमंत्रीत साहित्यीक कोण असतात असा विचार केल्यास ज्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळतात. किंवा ज्याला अनेक पुरस्कार मिळालेले असतात. तसेच  जे वेगवेगळ्या साहित्यीक मंडळाचे वा महामंडळाचे पदसिद्ध कार्यकर्ते असतात किंवा जे अशा महामंडळाशी संलग्न असतात अर्थात गोड बोलणारे असून अगदी मनमिळावूपणाने वागतात. तसेच जे या साहित्य संमेलनाला मोठमोठ्या देणग्या देतात.
      *पुरस्कार कोणाला मिळतात*
      अलिकडे पुरस्कार मिळविणे फार सोपे झाले आहे. मी तुम्हाला हजार रुपये देतो. तू पाचशे रुपये ठेव व पाचशेचा रुपयेचा मला पुरस्कार दे. पण या गोष्टी गुप्त ठेव. अशा प्रकारचे संवाद बरेचदा होतात नव्हे तर मी तुम्हाला पुरस्कार देतो. हजार रुपये द्या. अशा प्रकारचे संवाद नेहमी ऐकायला मिळतात. त्यातच राज्यस्तरीय पुरस्कारही शिफारसीच्या नावावर मिळतात. त्यात  साहित्यीकाचं शिफारसपत्र मिळविण्यासाठी त्या साहित्यीकाला पैसे मोजावे लागतात.
       नागपूरमध्ये झालेल्या एका राज्यस्तरीय संमेलनाची गोष्ट सांगतो. या संमेलनात एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. तसेच त्याच संमेलनात त्याच पुस्तकाला एक चांगलं पुस्तक म्हणून पुरस्कारही मिळाला होता. आता ज्या पुस्तकाचं नामकरण झालं नाही. ते पुस्तक चांगलं कसं कळेल.      
       पुस्तकाचा दर्जा हा ते पुस्तक चाळल्याशिवाय समजत नाही. मग ते चांगलं पुस्तक म्हणून त्याला पुरस्कार दिलं जाणं हे कोणत्या नियमात बसते. तरीही ते पुस्तक बसवलं गेलं. पुढं तो प्रकाशन समारंभ व ते साहित्य संमेलन झाल्यानंतर चर्चा चांगली रंगली. आता त्या गोष्टीला बरेच दिवस झाले. कालांतरानं ते साहित्य संमेलनही जुनं झालं. त्याला लोकं विसरलेत. परंतू माझ्या अजुनही तो प्रकार चांगला लक्षात आहे. सदर पुरस्कार्थी एक मोठी साहित्यीका म्हणून नाव मिळवते आहे. असो.नाव सांगत नाही अन् ते सांगून बदनामी करणार नाही.
       अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बाबतीत लिहितांना बरेच वेळा तेच ते साहित्यीक पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात. या नाशाकच्या साहित्य संमेलनात एक साहित्यीक असाच की ज्याला अठरा वेळा संमेलनात निमंत्रीत म्हणून प्रतिनिधीत्व करायला मिळालं. त्यातच त्यानं फेसबुकवर उघडपणानं जाहिरही केलं. महत्वाचं म्हणजे कशाला हवा तोच तो पणा. नव्यांना संमेलनानं निमंत्रीत म्हणून संधी का देवू नये. मला या बाबतीत हनुमंत चांदगुडेची गोष्ट आठवली. दोघंही एकाच विचारपीठावर होतो. हनुमंत चांदगुडे गाजलेलं व्यक्तीमत्व. इयत्ता आठवीच्या पुस्तकात त्यांची आक्रोश नावाची कविता आहे. त्यांचेशी झालेला संवाद. त्यांनाही साहित्य मंडळानं दोनवेळा निमंत्रीत केलं. तिस-यांदा जेव्हा केलं. तेव्हा त्यांनी स्वतःच नाही म्हणलं असं त्यांचं म्हणणं.
      विशेष सांगायचं म्हणजे काही लोकं हे हपापलेले असतात. त्यांना वाटते की माझं नाव साहित्य संमेलनाच्या निमंत्रीतांमध्ये असावं. कमीतकमी कवीकट्ट्यात तरी. मग ते बरेच वेळा रिपीट झाले तरी चालतील.
     आज या महाराष्ट्रात असे बरेच साहित्यीक आहेत की ज्यांनी कित्येक पुस्तकं काढली आहेत. ज्यांचं रोजच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात साहित्य छापून येतं. ज्यांचं साहित्य कसदार असतं. तसेच जे चांगलं साहित्य लिहितात. परंतू त्यांना दाखवायची सवय नसते. तसेच असेही साहित्यीक या महाराष्ट्रात आहेत की जे पुरस्कारासाठी हपापलेले नाहीत. कोणी पुरस्कार देवो अगर न देवो. त्यांना त्याबाबत काही वाटत नाही. त्यातच कोणी त्यांना पुरस्कारासाठी एवढे पैसे द्या जरी म्हटलं तर ते स्पष्ट नकार देतात. अ.भा.सा.संमेलन त्यांना अपात्र ठरवू शकत नाही असं त्यांचं लेखन असतं. परंतू त्या अखिल भारतीय संमेलन समीतीला असे साहित्यीक दिसतील तेव्हा ना. अखिल भारतीय साहित्य समीती खरं तर त्या साहित्यीकांचा शोधच घेत नाही. कारण खरे साहित्यीक त्यांना हवे नाहीत. त्यांना तेच ते साहित्यीक हवेत. जे मागील दोनचार वर्षात राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले अाहेत किंवा ज्यांचे पाठ्यपुस्तकात नाव आले आहे.
         राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे किंवा पाठ्यपुस्तकात नाव येणे यासारख्या गोष्टी केवळ ओळखीने घडत असतात. एका विद्यापीठाची गोष्ट सांगतो.
       आमच्या भागातील एक विद्यापीठ. या विद्यापीठात एका लेखकाचं पुस्तक लागलं. ते पुस्तक विद्यापीठाला ग्रंथ लावणा-या समीतीनं वाचलं होतं की नाही कुणास ठाऊक की ओळखीनं लावलं की पैसे घेवून लावलं कुणास ठाऊक. ते पुस्तक अभ्यासक्रमाला लागताबरोबर एका विद्यार्थीनीच्या हातात पडलं. त्या विद्यार्थीनीनं ते पुस्तक अभ्यासलं. त्यातच तिनं ते पुस्तक पान न् पान चांगलं अभ्यासलं असल्यानं त्यातील अश्लीलता तिच्या लक्षात आली व ती अश्लीलता तिनं सर्वांच्या लक्षात आणून दिली व झालेल्या प्रकाराबाबत वादंग सुरु झालं. शेवटी ते पुस्तक कोणाला माहित होण्यापुर्वीच विद्यापीठातून हटविण्यात आलं.
      महाराष्ट्रात खरे साहित्यीक जास्त नाहीत. बोटावर मोजण्यासारखे आहेत. त्यांना स्वतःचा गाजावाजा केलेला आवडत नाही. ते इमानी इतबारे लिहितात. प्रसिद्धीची त्यांना हौस नाही. त्यांच्या कथा कविता अभ्यासक्रमात नाही. (खरं तर त्यांच्याच कथा, कविता अभ्यासक्रमात असाव्यात) अखिल भारतीय साहित्य समीतीवाले त्यांना ओळखत नाहीत. कारण त्यांचं साहित्य हे ज्ञानपीठ पुरस्कारालाही लाजवेल असं असतं. ज्ञानपीठ पुरस्कारवाले साहित्य संमेलनाला जात नाहीत. अगदी तशाचसारखं. त्यातच या महाराष्ट्रात अशाही काही साहित्यीक संस्था आहेत की तेही पुनरावृत्तीच करतात. जे इतर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले असतात अशांनाच वाव देतात. पुस्तक प्रकाशन संस्थाही त्याच गोष्टी करतात. त्यामुळं तीच दैना मातब्बर साहित्यीकांची होवून बसलेली आहे. चांगला साहित्यीक हा पुरस्कार, पुस्तक प्रकाशन, तसेच साहित्यीक संमेलनाला जाणे ह्या गोष्टी टाळून आपलं कार्य अविरत करत असतात. मग ते यशस्वी होवो अगर न होवो. ते अशा प्रकारच्या साहित्यीक दैनेचा विचारच करीत नाहीत.

      अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button