स्प्रुट लेखन
पदाची रस्सीखेच
पदाची रस्सीखेच
पद........मग ते कोणतंही असो, त्यात पदाची रस्सीखेच चाललेली असते. मग ते राजकारणातील पद असो वा ते साध्या एखाद्या संस्थेतील असो. पद हे पद असतं. कोणीही आपलं पद सोडायला तयार नसतात. मात्र ते पद जर संकटाचं असेल तर सगळेच नाकारत असतात. कारण त्यावेळी त्या संस्थेला किंवा त्या देशाला उभारण्याची वेळ असते.
देशाच्या राजकारणातही असंच झालं. ज्यावेळी देश स्वतंत्र्य झाला. त्यावेळी देशात विकास नव्हताच. देश अशा स्थितीवर होता की जिथे हिंदू मुस्लीमांची भांडणं होती. निर्वासीतांचा प्रश्न होता. देशात गरीबी होती. कारण या देशाला इंग्रजांनी अशा स्थितीवर आणून सोडले होते. ज्यावेळी देशातील वातावरण तंग होतं. काय खायचं आणि काय नाही असा प्रश्न होता. त्यातच आपल्या जनतेला काय चारायचं आणि काय नाही हाही प्रश्न होता. त्यातच महात्मा गांधींनी पाकिस्तानला पंचावन कोटी रुपये दिले. त्याचं कारणही तसंच होतं. ते म्हणजे इंग्रजांनी स्वातंत्र्य या देशाला बहाल केलं. त्यावेळी त्यांचं मुस्लीम लिगशी चांगलं पटत होतं. त्यातच या देशातील जी चल अचल संपत्ती होती, त्या संपत्तीचंही वाटप करण्याची गोष्ट इंग्रजांनी केली होती. त्यावेळी इंग्रजांनी कोणताच विचार केला नाही. जागेचं वाटप झालं. परंतू पैशाचं काय? शेवटी पैशाचीही हिस्सेवाटी झाली आणि ठरलं की पंचावन कोटी रुपये पाकिस्तानला द्यायचे.
मुद्दा महत्वपूर्ण होता. परंतू इंग्रजांनी या देशातून सर्वच धनसंपदा आपल्या देशात नेल्यामुळे व देशात भुकमरी वाढल्यामुळे आपल्या देशातील काही मंडळींनी विभागलेल्या पैशाची हिस्सेदारी आणि त्या हिस्सेदारीतील पंचावन कोटी रुपये पाकिस्तानला देवू नये असं सुचवलं. यावर महात्मा गांधी हे सत्याचे पुजारी होते. त्यांना वाटलं की ही गद्दारी आहे. देश आपल्याला पुढील काळात माफ करणार नाही. त्यातच त्यांनी ते रुपये पाकिस्तानला द्यायचा हेका धरला व तो पैसा दिलाही. त्यातच गरीबीत असलेल्या या देशातील लोकांची मने खवळली व पुढे ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधीची हत्या झाली.
पंचावन कोटी रुपये पाकिस्तानला दिल्यानंतर देश आणखीनच गरीब झाला. त्यातच नेहरुंना पंतप्रधान बनविण्यात आलं. त्यातच वरील सर्व प्रश्न. अशावेळी हिंदू राष्ट्र आणि मुस्लीम राष्ट्राची कल्पना. पाकिस्तान आणि हिंदुस्तान....... ज्याला आपण भारत म्हणतो.दोन एका अखंड हिंदुस्तानचे तुकडे........काही लोकांना वाटत होतं की या भारत देशात फक्त हिंदू राहावेत आणि मुस्लीमांनी पाकिस्तानात जावे. तर काहींना वाटत होतं की जिथे जे जसे राहात असतील तसे राहू द्यावे. त्यातच पुन्हा दोन्ही देशात हिंदू मुस्लीमांची भांडणं. भांडणात तोडफोड. या तोडफोडीतही देशाची मालमत्ताच उध्वस्त व्हायची. त्यातच शेवटी तोडगा निघाला की जी मंडळी जिथे आहेत, त्या मंडळींना तिथेच राहू द्यायचं.
तोडग्यानुसार जे हिंदू पाकिस्तानात होते, ते तिथेच राहिले. जे मुस्लीम भारतात होते, तेही इथेच राहिले. परंतू वाद क्षमले नाहीत. शेवटी जननसंख्येवरुन वाद होत राहिला. मुस्लीमांनी या देशात मुलं अल्लाची देण म्हणत जनन संख्येवर भर दिला तर पाकिस्ताननं हिंदू कमी व्हावेत म्हणून हिंदूंच्या मुलं कात्रीकरणावर भर दिला. तेच कारण की काय, आज या भारत देशात १९५१ आणि आताचा लोकसंख्येचा आलेख पाहता आज मुस्लीमांची संख्या जास्त आहे. कारण भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. त्याउलट पाकिस्तानमध्ये हिंदू कमी झालेले आहेत. येथील मुस्लीम बांधव हा सर्वच बाबतीत स्वतंत्र्य आहे. तिथे मात्र हिंदूंना बोलण्याचीही मनाई आहे. इथे राजकारण असो वा व्यापार, नोकरी असो वा कोणतेच क्षेत्र मुस्लीम पुढे आहेत. तिथे तसं नाही.
महत्वाची गोष्ट अशी की या देशानं मुस्लीमांनाही सन्मानाचं स्थान दिलं. त्यासाठी मुस्लीमांनीही या देशाला आपला देश मानावा. फाटे फोडू नयेत. हे यासाठी म्हणावंसं वाटतं की ज्यावेळी क्रिकेटचा सामना २०२१ मध्ये पाकिस्ताननं जिंकला. त्यावेळी याच भारतात जल्लोष झाला.,फटाक्याची आतिषबाजी केली. कदाचित ही आतिशबाजी कोणाला बदनाम करण्यासाठीही झाली असेल. पुन्हा हिंदू मुस्लीमांचे वाद व्हावेत म्हणून. मी ते म्हणणार नाही. परंतू एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की ज्या अयोध्येत हिंदू मुस्लीम एक आहेत. रामललाचे कपडे मुस्लीम शिवतात. एखाद्या वेळी रामललाची आरतीही हिंदू पुजारी नसला तर मुस्लीम बांधव करतात. तिथे येणा-या भक्तांना चिरंजी, हार अति प्रसन्नतेनं मुस्लीम बांधव विकतात. त्या देशातील इतर भागात असं हिंदू मुसलमान एकमेकांचे शत्रू म्हणून का वागतात? पाकिस्तानच्या क्रिकेट विजयावर चौकार का मारतात? तसेच या देशात असे कृत्य करुन हिंदू मुसलमान फुट का पाडतात? तेच कळत नाही. तसेच आजही अशा गरीबीत असलेल्या देशाला संकटातून उभारलेल्या नेहरुंना काही लोकं शिव्या का घालतात? तेही कळत नाही.
कोणी म्हणतात की या देशानं सत्तर वर्षात विकास केलाच नाही. मग जो विकास आज काही प्रमाणात झाला, तो कोणी केला? विशेष सांगायचं म्हणजे इंग्रज या देशातून गेल्यानंतर खोकल्या झालेल्या अर्थव्यवस्थेला जाग्यावर आणण्याचं काम नेहरुंनी केलं. तसेच जेव्हा १९६२ ला चीननं युद्ध थोपलं, तेव्हा जय जवान, जय किसानचा नारा देवून लालबहाद्दूर शास्री यांनी देशातील नागरीकांना आवाहन केलं की एक वेळ उपाशी राहा. तुमचा एकवेळचा उपवास हा इतरांना जगविणारा आहे. महत्वाचं म्हणजे त्या वेळच्या राजकारण्यांनी देशातील लोकसंख्येला जगवलं. त्या वेळच्या मुस्लींमांनीही या देशाला आपला देश मानला. त्या वेळच्या जतींद्रनाथानं आपल्या विजयाचा राजीनामा देवून डॉक्टर बाबासाहेबांना निवडणूकीत विजयी बनवलं. अन् त्या वेळच्या राजकारण्यांनी देशासाठी स्वतःला वाहून घेतलं नव्हे तर बलिदान दिलं. त्यातच त्या वेळच्या राजकारण्यांनी स्वतःच्या भावी पिढीचा विचार न करता आपली संपत्ती देशासाठी खर्च केली. गडगंज संपत्ती गोळा केली नाही. हा आपण बोध घ्यायला हवा. परंतू आज काही लोकं त्यांना काही बाही बोलतात. तेव्हा वाईट वाटतं. वाटतं की त्या वेळच्या या नेत्यांनी खरंच आजच्यासारखं वागायला हवं होतं. जर ते आजच्यासारखे वागले असते तर आज या देशात विकास दिसला नसता. आजही या देशात पाकिस्तान, अफगानिस्तान सारखेच रस्ते दिसले असते. ही विचार करायला लावणारी बाब आहे.
आज या देशातील नेत्यांची संपत्ती पाहिली तर एका एका नेत्याजवळ सात पिढ्या पोसल्या जातील एवढं धन आहे. तसेच काही काही लोकांजवळ म्हणजे जे राजकारण्यांना चिपकून राहतात त्यांच्याजवळही तेवढंच धन आहे. ते आपल्या देशातील बँकेत ठेवत नसून बाहेर देशातील बँकेत ठेवतात. त्या पैशाचा वापर आपण करण्याऐवजी बाहेर देशातील लोकांना करायला मिळतो. तरीही आज नेत्यांचे वेतन अगडबंब आहे तरीही.......ही बाब घडते.
महत्वाचं म्हणजे ज्या पंतप्रधान पंडीत नेहरुनं देशाला उभारलं. त्या पंडीत नेहरु आणि त्यांच्या चमूला धन्यवाद द्यायला हवं. कारण बिघडलेल्या परीस्थीतीत जम बसवणं काही साधी सोपी गोष्ट नाही. गोष्टी सांगायला काय लागते. आज साध्या संस्थेमध्ये एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर विस्कळीत परीस्थीती पाहिल्यावर ती परीस्थीती हाताळायला कोणी वाली नसतो. परंतू ती परिस्थीती सुरळीत झाल्यास सर्वजण ते पद घ्यायला तयार होतात. त्यातच ज्यानं ती परिस्थीती हाताळली त्याला शिव्या हासडतात. तेच नेहरुंबाबतीत घडलं.
आज पदाबाबत रस्सीखेच चाललेली आहे. कारण आज पदप्राप्ती होताच भ्रष्टाचारानं पैसा कमवायला मिळतो. संपत्ती सात पिढ्यांना पुरेल अशी प्राप्त करता येते. त्यातच नेतेमंडळी आपल्या नावावर संपत्ती घेत नाहीत. ते मित्र आणि आप्तांच्या नावावर संपत्ती घेत असतात. मग कसा सापडेल भ्रष्टाचार? आज भ्रष्टाचार चरणसीमा गाठत आहे. काही काही प्रकरणं उघडकीस येतात सर्वच प्रकरणं उघडकीस येत नाही. असा भ्रष्टाचार करण्यासाठीच पदांबाबत रस्सीखेच सुरु आहे. काही काही लोकांजवळ भरपूर पैसा आहे. भरपूर पैसा........ कारण त्यांचे लागेबांधे विद्यमान नेत्यांशी असतात. जे विद्यमान नेत्यांना विरोध करीत नाहीत. त्यांच्या हो ला हो मिळवतात. प्रसंगी पक्षांतर करतात. त्यांची साधी चौकशीही होत नाही. यातूनच साधे साधे संस्थाचालकही गब्बर बनलेले आहेत. हेही तेवढंच खरं आहे.
आज अशा सर्वच क्षेत्रीय व्यक्तींची चौकशी व्हायला हवी. प्रत्येकाला संपत्तीची मर्यादा ठरवून द्यायला हवी. तेव्हाच लोकं सुधारतील भ्रष्टाचार करणार नाही. पद भुषवतील. पदावर आल्यावर भ्रष्टाचार करणार नाही. देशाचाही विकास होईल व देश काही का होईना विकासाच्या क्षेत्रात येईल. कोणी कोणाला शिव्या हासडणार नाही. कोणी कोणाला अपशब्द बोलणार नाही. तसेच देश सृजलाम सुफलाम होईल यात काही दुमत नाही. हे तेवढेच खरे आहे. परंतू काहींना वाटत असते की माझे पोट भरायला हवे. इतरांचे नको. म्हणूनच देश आजही विकासात कोसो दूर आहे. देशात समस्याच समस्या आहेत. त्यातच देशात आजही भुकमरी आहे. काही मुठभर लोकं सोडले तर आजही देशातील काही लोक आजही उपासातच दिवसं काढत आहेत. हे तेवढेच खरे आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०