काय आहे ‘चिरा’ पद्धत ?जाणून घ्या
काय आहे ‘चिरा’ पद्धत ?जाणून घ्या
भारतीय समाजव्यवस्थेत असणारी गरिबी आणि जातीयवर्चस्वादाच्या खोलात शिरले असता त्यातील खूप काही गोष्टी समोर येतात आणि माणसेच माणसाचं शोषण करून कोणत्या थराला जातात याची प्रचिती येते.त्यातील बहुतांश जातवर्ग हा कायमच शोषणाचा शिकार झालेला आहे. स्त्री ही केवळ वासना तृप्त करणारी एक साधन म्हणून पाहिलेल्या याच समाजव्यवस्थेत हातात लेखणी घेऊन समाजाला शिक्षित करू पाहणाऱ्या एका स्त्रीचे जर या व्यवस्थेने तिच्या पायाला घुंगरू बांधून तिच्यावर लादलेले गुलामित्व ही अशी अवस्था जेव्हा ‘नाजायज औलाद’च सर्टिफिकेट एखाद्याच्या माथी मारते तेव्हा याला चिरा सारखी पद्धतही कारणीभूत ठरते.
चिरा म्हणजे लग्नाच्या सोहळ्यासारखाच. नाचणारणीच्या जीवनात जी पहिली व्यक्ती येईल, तिनं नाचणारणीच्या नातलगानं मागितली ती रक्कम द्यावी लागते किंवा रक्कम किती घ्यायची ती ठरवली जाते. रक्कम सोन्याच्या रुपयाच्या किंवा जमिनीच्या स्वरूपात असू शकते. पहिल्या रात्री नाचणारणीला नवरीसारखं सजवतात. देवाची पूजा करतात. तिला सर्व नातलगांच्या पाया पडावं लागतं.
गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी घालतात; सोन्याचे दागिने असतील तर ते देखील घालतात. ‘सुहागरात ‘सारखी खोली फुलांनी सजवली जाते. नाचणारीण, जो चिरा उतरतो, त्या व्यक्तीस नवन्याचं स्थान देते. मग ते स्वतःच्या मर्जीनं असो वा कोणाच्या भीतीमुळे असो. जोपर्यंत ती व्यक्ती तिला सांभाळते तोपर्यंत त्याशिवाय नाचणारीण दुसन्याशी लैंगिक संबंध ठेवत नाही. जी व्यक्ती नाचणारणीशी लैंगिक संबंध ठेवते तिला मालक असं नाव देतात. किंवा कोल्हाटी शब्दात ‘कजा’ म्हणतात.