भ्रुणहत्येतून काय साध्य झालं..?
भ्रुणहत्येतून काय साध्य झालं…
आज वशीकरणाला जास्त महत्व आलं आहे. त्याचं कारण आहे मुली न मिळणे. भ्रुणहत्येनं आज मुलींची संख्या कमी झालेली आहे.
आज मुलगा हाच वंशाचा वारस समजून लोकांनी गत वीस तीस वर्षाच्या पुुर्वीपासून लोकांंनी मुलीच्या भ्रृणाला पोटातल्या पोटात ठार केलं. त्यासाठी गर्भलिंगाचं परीक्षण केलं. त्यानुसार लोकांना ते भ्रूण मुलींचे दिसताच त्याची कत्तल झाली. आज ही लोकसंख्या याच दृष्टीकोणानं अतिशय कमी झालेली आहे. काल लोकांनी सर्रास भ्रुणहत्या केल्या. आज त्याचे परीणाम दिसून येत आहे. सन २००१ च्या जननगणनेनुसार स्री पुरुष प्रमाण १००० ला ९३३ असे होते. ते आज वाढलेले दिसत आहे.
आज असे मुलींचे घटते प्रमाण. त्यातच मुली गर्भाच्या झालेल्या भ्रृणहत्या ह्या आज मुलांना मुली मिळतांना त्रासदायक ठरत आहेत. मुलांची आज संख्या जास्त असल्यानं व मुलींची संख्या कमी असल्यानं मुलींचे भाव आणि मुली असलेेल्या वडीलांचेही भाव वाढलेले असून आज मुली विवाह योग्य तरुणाला मिळत नाहीत.
ग्रामीण भागाचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मुली जन्माचं प्रमाण १९९१ मध्ये ९७२ होते. ते २००१ मध्ये ९५९ झाले. कारण ग्रामीण भागात निरक्षरता व अंधश्रद्धा जास्त असल्यानं ग्रामीण भागात दिवसेेंदिवस मुली जन्माला घालणं कमी कमी होत गेलं. तसं शहरी भागात झालं नाही. शहरी भागात १९९१ मध्येे ८७५ व २००१ मध्ये ८७४ होते.
राज्याचा विचार केल्यास काही काही राज्याचे प्रमाण सांगावेसे वाटते. जसे १९९१ मध्ये केरळ ९३६, तामीळनाडू ९७४, महाराष्ट्र ९३४, मध्यप्रदेश ९१२, गुजरात ९३४, हरीयाणा ८६५, पंजाब ९९२, उत्तरप्रदेश ८७६,बिहार ९०७ असे स्रीजन्माचे प्रमाण होते. तेच प्रमाण २००१ मध्ये केरळ ९५६, तामीळनाडू ९८६, महाराष्ट्र ९२२, मध्यप्रदेश ९२०, गुजरात ९२१, हरियाणा ८६१, पंजाब ८७४, उत्तरप्रदेश ८९८, बिहार ९२१ होते. आता हा झाला प्रमुख राज्याचा मुलींचा जन्मदर. यामध्ये तसं पाहता सर्वच राज्यात मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे. परंतू सर्वात जास्त मुलींचे कमी झालेले प्रमाण हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेश मध्ये जास्त आहे. सध्या गुजरातही या रांगेत आहे. आता भारताचा एकंदर विचार केल्यास १००० जर पुरुष जन्म घेत असतील तर स्रीयाचाा जन्म सरासरी ९४० असा आहे. याचाच अर्थ मुली १००० मागे साठच्या सरासरीनं कमी होत आहे. या स्रीजन्माला दिल्लीतही सोडलं नाही. दिल्लीत हे प्रमाण ८६८ आहे.
आज याच प्रमाणावरुन मुलींच्या अत्याचारात वाढ झालेली असून मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना विवाहाला मुली मिळत नाही. मग काय अशी मुलं टोळ्या करुन ज्या राज्यात मुली जास्त असतात. त्या भागातून मुलींची तस्करी करतात. अशी तस्करी करीत असतांना त्यांना मुलींच्या वयाचंं बंधन नाही. त्या तस्करीत अगदी चार वर्षे वयाच्या कोवळ्या कळ्यांपासून तर अगदी पन्नास वर्षे वयाच्या महिलेपर्यंतच्या स्रियांचा समावेश होत असतो. अशी मुलींची तस्करी राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या राज्यासह इतरही राज्यात होते. परंतू त्यामध्ये वरील सात राज्ये आघाडीवर असल्याचे जाणवते. यासाठी काही काही दलंही सक्रीय असल्याचे दिसते. तसेच त्याला पोलिसांचं पाठबळही असल्याचं जाणवतं. आज महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये विवाहाच्या नावावर सर्रास मुली विकल्या जातात नव्हे तर दिल्ली, पंजाब, हरियाणा व राजस्थानसारख्या भागात फूस लावून मुली पळवल्या जातात. एवढंच नाही तर राजस्थान, हरियाणा व दिल्लीमध्ये वशीकरणासारख्या तंत्र विद्या वापरुन मुलींना वशमध्ये केलं जात असून वशीकरण ही जरी अंधश्रद्धा असली तरी तिचा राजरोषपणे वापर करण्यावर भर दिला जात आहे. आज या मुलींची तस्करी करुन पाहिजे त्या प्रमाणात त्यांचे शारीरिक शोषण करुन घेवून त्यानंतर या मुलींना जबरदस्तीनं वेश्याव्यवसायात ढकललं जातं. त्यातून पैसा कमवला जात आहे. त्यातच काही मुलींचे (वयस्क स्रीया) शारीरिक अवयव विकून त्यातूनही रग्गड पैसा कमवला जात आहे. जसे किडनी, यकृत, डोळे इत्यादी अवयव. शेवटी त्या अवयवाचं काम झालं की त्यांच्या मृत शरीराची योग्य विल्हेवाटंही लावली जाते. मात्र यात एेवढी काटेकोरता वापरली जाते की ती माहिती उघडकीस येत नाही. जसे मागील काही दिवसापुर्वीच्या काही राज्यातील घटना.
महत्वपूर्ण गोष्ट ही की माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी व मुलगाच वंशाचा वारस समजून मुलांचे गर्भलिंग परीक्षण केले. त्यातच मुलींचे भ्रूण दिसताच मुली गर्भीच्या हत्या झाल्या. त्यांनी त्याचा उद्या जावून कोणता परीणाम होईल याचाही विचार केला नाही. परंतू आज याच मुलींचे प्रमाण कमी झाल्याने व मुलांची संख्या जास्त असल्याने व विवाहाला मुली मिळत नसल्याने त्यांची जबरदस्तीनं तस्करी करुन वा त्यांच्यावर संमोहन (वशीकरण) करुन त्यांचं अपहरण तर केलं जातं.. परंतू यामध्ये ज्या स्रीयांची तस्करी होते. त्यांना जर लहान लहान मुलं असतील आणि त्यांचाही दोष नसेल तरी त्यांचंही नुुकसान होते. ज्यातून त्या मुलांचे वडील आपली शारीरिक कामना पुर्ण करण्यासाठी दुसरा विवाह करुन टाकतात नव्हे तर यातूून त्या मुलांचे हालहाल होतात. काही मुुले रस्त्यात लावारीससारखे भीक्षा मागतात. अशी मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडेही वळतात. काही मुले अनाथालयातही जातात. परंतू त्यांचा कोणीही विचार करीत नाहीत. हे तेवढंच सत्य आहे.
अंंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०