Uncategorized

अत्याचार नेमका कुणाचा? कुणावर? विचार करण्याची गरज

काही काही महिला ह्या पुरुषांना लाथेनं मारतात. परंतू त्या महिला असल्यामुळे त्यांचा अत्याचार कधी दिसत नाही. फक्त पुरुषांचा दिसतो. तसेच पुरुष……….नेहमीच पुरुषांबाबत कुरकूर असते लोकांची. पुरुष असा असावा, तसा असावा. परंतू स्री अशी असावी, तशी असावी असं कोणीच म्हणत नाही. आज साधारण रस्त्यावरुन गाडी घेवून जाणारी मुलगी…….जाणूनबुजून कट मारुन जाते व मौज घेते. परंतू ती कट मारतांना पडली तर लोकं तिला दोषी न मानता त्यालाच दोषी मानतात हे कितपत बरोबर आहे याचा विचारच कोणी करीत नाही. तसेच मी जेव्हा जेव्हा एखाद्या कार्यक्रमात जातो, तेव्हा तेव्हा त्या कार्यक्रमात एखादी स्री जेव्हा आपलं मनोगत मांडते, तेव्हा ती हमखास आपल्या पतीची आठवण सांगते. माझा पती की नाही असा………माझा पती की नाही तसा. सारखी पतीची प्रशंसा. त्यातच समजा तिचा पती कितीही चांगला असला, तरी जेव्हा कवीसंमेलनात त्या कविता सादर करतात. तेव्हा नेमका त्या कवितेत माणसं स्रीयांवर किती अत्याचार करतात? तेच मांडत असतात. यावरुन वाटतं की आपल्या पतीजवळ त्या कितीही सुखी असल्या तरी त्यांच्या बोलण्यातून त्या ख-या अर्थानं सुखी नसतात. कारण त्यांच्यावर पुरुषांनी अत्याचार केला नसला तरी त्यांची विचारशक्ती ही पुरुषांचा अत्याचार होत असल्याची बनलेली असते. तीच मानसिकता पुरुष कितीही चांगला असला तरी त्याची अवहेलना करणारी असून ती मानसिकता पुरुषांच्या विकास आणि प्रगतीला मारक ठरते.
पुुर्वीचा काळ होता की मनुस्मृतीत लिहिल्यानुसार स्रीयांना त्यांच्या मनानंं वागण्याची परवानगी नव्हती. परंतू आज काळ बदललाय.
भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं, त्यानुसार स्रीयांनाच नाही तर त्यांनी संपूर्ण मानवजातीचे त्यांनी कल्याण केले. त्यानुसार आज बहुतःश स्रीया ह्या दुःखी नाहीत. साधारणतः विचार केल्यास आज महिला शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के सुखी आहेत. आज देशाची टेहाळणी केल्यास असं जाणवते की काही घरात काही महिला पुरुषांवरच अत्याचार करीत असतात. काही घरात तर वधूकडील मंडळी सारखी आग लावत असते पुरुषांच्या संसारात. आजच्या स्नुषा सासवांची सेवाशृषृषा न करता केवळ त्या सासवांना मारणे, धमकावणे इत्यादी गोष्टी करीत असतात. तसेच सतत धमक्या देत असतात. त्या धमक्या म्हणजे पोलिस स्टेशनला तक्रार करील. सर्वांना जेलच्या आत टाकील. वैगेरे वैगेरे. काही काही स्नुषा तर सासनांना जेवायलाही बरोबर देत नाहीत. असा काळ आला आहे आजचा. आज स्नुषांना आपली आई, आपल्या माहेरची माणसं गोड झाली आहेत आणि सासू सासरे व पतीच्या परीवारातील माणसं कडू झाली आहेत असं चित्र दिसतं. तरीही वक्तृत्वस्पर्धा, कवीसंमेलनातून जणू त्यांच्यावरच अत्याचार होत असल्याचा सूर उमटतो. परंतू पुरुषांना पाहिलं तर ते कधीच आपलं दुःख व्यक्त करतांना दिसत नाहीत. ते कधीच विचारपीठावर आपलं दुःख बोलत नाहीत. त्याबाबतीत एखादा प्रसंग सांगतो. एखाद्या मैयतीतील गोष्ट घ्या. या मयतीत स्रीया रडून मोकळ्या होतात.नंतर त्यांना आठवणही येत नाही. परंतू पुरुष रडत नाही. त्यालाही दुःख होतं. परंतू ते दुःख तो अंतर्मनात दाबत असतो.
मी आजपर्यंत असे अनेक प्रकार पाहिले की पती आपली पहिली पत्नी असतांना दुस-या स्रीशी विवाह करते. हा अत्याचारच आहे. यात शंका नाही. परंतू मी हेही पाहिले आहे की पती जीवंत असतांना त्याच्या पत्नीनं अनेकांशी विवाह केलेले आहेत. तसेच हेही पाहिले आहे की पती कामावर जाताच तिचा बायफ्रेंड घरी येतो व पती घरी येण्याची वेळ होताच तो बायफ्रेंड घरातून निघून जातो. मात्र आजच्या सुधारलेल्या समाजाला केवळ पुरुषांच्या डोळ्यातील कुसळ दिसतं, स्रीयांच्या नाही.
आज अशी सासरची बरीच मंडळी अशी आहेत की जी आपल्या जावयांना त्रासच देत असतात. त्यांना जावई आणि त्यांची मुलगीच हवी असते. त्याचे आईवडील नाही. ते म्हणतात की जावई आमच्या घराकडे किरायानं कमरा घ्या.नाहीतर आमच्या घरी राहा. मग अशावेळी ज्या आईवडीलांनी जन्म दिला, त्या आईवडीलांनी कुठं जावं? असं विचारताच यावर ती पत्नी म्हणते की मला काय सांगता. तो माझा प्रश्न नाही. तुमचा प्रश्न आहे. त्यांना वृद्धाश्रमात ठेवा नाहीतर कुठेही. मला सांगू नका आणि हं, मी जर तुम्हाला हवी असेल तर आईला सोडून या. मी चालले माहेरी.
सुखी संसार………ज्या आईनं त्या बाळाला लहानाचं मोठं केलं. तो बाळ हताश होतो. जी आई……ती काय आपल्याला आयुष्यभर पुरणार असा विचार करुन तो बाळ पत्नीजवळ जातो आईला एकटं सोडून. त्याला आईही होकार देते नाईलाजानं. परंतू बिचारीची आत्मा तळपत असते. परंतू अशी सुन वा असा मुलगा कधीच जीवनात सुखी होत नाही. कालांतरानं नशीब त्यांना सर्व दाखवत असते. वारंवार संकटं येत असतात. कारण आशिर्वादाची झालरच नसते ना त्यांच्या आयुष्यात. काही सुना नाईलाजानं करतात किळसवाणे बोलून. काही मारतातही……कधी काडीनं, कधी लाथेनं तर कधी हातानं आणि वरुन तक्रारही टाकतात पोलिसस्टेशनला. त्या जराजर्जर झालेल्या सासुची. ती अत्याचार करते म्हणून.
कदाचित ती बोलत असेल थोडेसे सुनेला. ऐकलं उदार मनानं तर काय झालं. आपले आईवडील बोलत नाही का? बोलतात ना. मग असंच त्यांना आईवडील समजावं. आपले आईवडील मारत नव्हते काय? मारत होते. तेच प्रेम सासुसास-यात पाहावं. सासुसास-यांनाही आपले मायबापच मानावे. तेव्हाच आपला संसार सुखाचा होवू शकेल.
अत्याचार नेमका कुणाचा? कोणावर? असा जर प्रश्न आजच्या काळात केल्या गेला तर नक्कीच जाणवतं की आजच्या काळात काही टक्केवारी सोडली तर महिलाच अत्याचार करीत आहेत. वरुन आम्ही नाही त्या गावच्या असे म्हणत तक्रारीही टाकत आहेत पोलिसस्टेशनला आणि स्वतः होवून आपला सुखी संसार व घर बरबाद करीत आहेत. आजच्या काळातील महिलांना कायद्याचं संरक्षण मिळाल्यानं या असल्या अत्याचाराच्या न्यायालयात ब-याच केसेसही वाढत आहेत.
स्री ही जर स्री सारखी राहिली आणि वागली तर तिचाच संसार सुखी होत असतो. परंतू आजच्या स्रीयांमध्ये सहनशिलता उरलेलीच नाही. अरे ज्या माणसाशी आपण विवाहबद्ध होतो. त्या माणसाशी इमानदारीनं वागणे गरजेचे आहे. परंतू त्या माणसाला जर दोष देत आहोत विवाह झाल्यावर. तर विवाह का करावा? तो जर माहेरी राहायला नकार देत असेल तर त्यात त्याचा काय दोष? तो दोषी नसतोच. कारण त्याचं प्रेम असते त्याच्या मायबापावर. त्याच्या नातेवाईकावर. कारण त्यांनी त्याला लहानाचं मोठं केलेलं असतं.
ब-याचशा सासवा कुरकूर करतात की माझी सुन चांगली नाही. परंतू काही काही पतीरावही याला दोषी असतात. ते अगदी आपल्या पत्नीच्या मनामनानुसार वागत असतात. तिला खुश ठेवण्यासाठी प्रसंगी आपल्या आईवडीलांवर अत्याचार करु लागतात. याबाबतीतही एक फेसबुकवरील प्रसंग सांगतो. यात सुन कशी असावी? याचं हे एक उदाहरण. एक मुलगी विवाह करुन जेव्हा सासरी येते. तेव्हा आपल्या आईबाबांना, ते जेवले की नाही हे न विचारता तो पती एक ताट व त्या ताटात जेवन घेवून सुहागरात्रीच्या दिवशी तिच्या कम-यात येतो. म्हणतो की मी तुझ्यासाठी चांगलं आपल्या हातानं बनवलेलं जेवन आणलं. त्यावर ती म्हणते की मायबापांना विचारलं का? त्यावर तो म्हणतो की मायबापाचं जावू दे. तू आपलं पाहा. आपली सुहागरात आहे. परंतू ती एक चांगली सुन असते. ती त्याचवेळी ओळखते की हा पती चांगला नाही. ती त्याच दिवशी त्याला सोडते. ती परत दुस-याशी विवाह करते. त्यानंतर तिला तो पती आवडतो. तो चांगला असतो आपल्या वडील आईची सेवा करणारा. ती रमते त्या घरी. तिला मुलंबाळं होतात व ती त्यांना चांगलं संस्कार शिकवते. जेव्हा ती म्हातारी होते, तेव्हा एकदा मंदिरात देवदर्शनासाठी गेली असतांना तो तिचा पती दिसतो. तो फाटक्या कपड्यात असतो. ती ओळखते. त्याला मुलंबाळं असतात. परंतू तो पत्नीसुखात वाहवत गेल्यानं त्यानं आपल्या मुलांवर संस्कार केलेले नसतात.
आपण स्वतःही यात दोषी असतो. आपण विवाह करुन ज्या मुलीला आणतो. त्या मुलीला आपण आपलंसं करण्याची गरज असते. तिला प्रेम दाखविण्याची गरज असते. परंतू आपण तिच्याच प्रेमात वाहवत गेल्यानं ती याचा फायदा घेते व त्याचं रुपांतरण पुढे पती अत्याचार करतो असे म्हणण्यात होते.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आपलं घर. आपल्या घरचं भांडण सर्वांना दिसतं. आपल्या घरी भांडण झालं तर लोकं हसतात. वाईट म्हणतात. त्यांना मजा वाटते ते पाहतांना. त्यांना त्यांच्या घरचं भांडण दिसत नाही. म्हणून पुरुषांनी म्हणा की स्रीयांनी, आपल्या घरचं भांडण कधी कोणी दाखवू नये कोणालाच. कारण लोकांना तेच पाहिजे असते.
पुरुष हा स्रीयावरील अत्याचारास दोषी नक्कीच आहे. नाही म्हणता येत नाही. परंतू तेवढ्याच प्रमाणात दोषी स्री देखील आहे. कारण टाळी कधीच एका हातानं वाजत नाही. दोन्ही हात लागतात. शेवटी एवढंच सांगेन की विवाह करा. मुलं पैदाही करा. परंतू संसार आणि संस्कार विसरु नका. कारण संसार आणि संस्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे विसरु नका. दोघांनीही एकमेकांना समजून घ्यावे. सासुसास-यांनाही समजून घ्यावे. तेव्हाच संसार व्यवस्थीत होईल आणि संसार व्यवस्थीत झाला की चांगले संस्कारही फुलवता येईल हे तेवढेच खरे आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button