ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, अश्या राज्यपालांकडुन पदवी स्वीकारणार नाही- नसोसवायएफ
ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, अश्या राज्यपालांकडुन पदवी स्वीकारणार नाही- नसोसवायएफ
नांदेड; दि; २८
महापुरुषांबद्दल औरंगाबाद आणि पुण्यात मा. राज्यपालांनी बोलतांना अवमानकारक भाष्य करणाऱ्या अश्या राज्यपालांकडून आम्ही पदवीदान करून घेणार नाही, तसेच राज्यपालांचा वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवणार आहोत, असे नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट(नसोसवायएफ) संघटनेने असा पवित्रा हाती घेतला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे बहुजन समाज जनतेच्या भावना दुखाल्या तसेच सावित्रीबाई फुल्यांचा अपमान करणाऱ्या मा.राज्यपालांचा धिक्कार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांच्या आदेशाने नसोसवायएफ संघटनेच्या वतीने करणार आहोत असे राज्य प्रवक्ता प्रा. सतीश वागरे यांनी म्हंटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे बहुजनमन दुखावणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते .औरंगाबाद आणि पुण्यात बोलताना केलेल्या दोन वक्तव्यांवरून संबंध महाराष्ट्राच्या भावना दुखवल्या आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. सावित्रिबाई पुतळा अनावरण सोहळ्यामधील राज्यपालांच्या वक्तव्यानंमध्ये राज्यपाल हे “सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या १० व्या वर्षी झाला असं राज्यपाल हसत हातवारे करताना सांगताना दिसतंय,त्यांचे पती १३ वर्षांचे होते, आता कल्पना करा या वयामध्ये लग्न केलेले मुलं-मुली काय विचार करत असतील, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं होतं, तसेच औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले ‘चाण्याक्यांशिवाया चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे बेताल वक्तव्य त्यांनी औरंगाबाद येथे महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत केले होते, आणि भारतातील शेवटचा बौद्ध राजा चंद्रगुप्त मौर्य यांनाही एकेरी उल्लेख करून त्यांना मानणाऱ्या बौद्ध समाजाच्या भावना दुखावले गेल्या आहेत. अश्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून आम्ही विद्यापीठात काळे झेंडे दाखवून वेगळ्या पद्धतीने निषेध करणार आहोत.
त्यामुळे विद्यापीठासमोर गाढवाची महापुजा करत, भोपळा फोडो आंदोलन तसेच नारळ फोडून शिरणी वाटप कार्यक्रम आंदोलन करत राज्यपालांचा निषेध करणार आहोत. अशी माहिती नॅशनल एसी एसटी ओबीसीचे स्टुडंट अँड यूथ फ्रंटचे जिल्हा प्रवक्ते मनोहर सोनकांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.