पँथर म्हटलं की आजही आपल्या अंगात एक वेगळाच जोश संचारताना दिसतो.ज्या दलित पँथर चळवळीच्या माध्यमातून हजारो निर्भिड पँथर निर्माण झाले. त्याच दलित पँथर चळवळीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष या वर्षी अभिमानाने साजरे केले जात आहे. सत्तरच्या दशकात दलित,आदिवासी यांच्यावर प्रस्थापितांकडून मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केले जात होते. अन्याय अत्याचाराने सीमा पार केली होती. तेथूनच एक नव्या युगाच्या चळवळीचा जन्म झाला. ती चळवळ म्हणजे… “दलित पँथर” …या चळवळीने आक्रमक भूमिका घेत आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारास आपल्या शैलीने उत्तर देत या होणाऱ्या अन्याय,अत्याचाराला पायबंद घालण्यासाठीचा प्रयत्न केला.२९ मे १९७२ साली दलित पँथर चळवळीचा उदय झाला. या चळवळीचा उदय होण्या मागे अनेक कारणे होती त्यामधे समाजातील बांधवांवर होणारे अत्याचार हे एक प्रमुख कारण ठरले. यामुळे नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार, अविनाश महातेकर, अरूण कांबळे,भाई अरुण संगारे या तरुणांनी ही चळवळ उभारून या चळवळीचा भार आपल्या खांद्यावर घेतला बघता बघता या चळवळीने जोर धरत फार दुरवर ही चळवळ पसरली महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली तसेच भारतभर तसेच भारताबाहेर (लंडनमध्ये) सुध्दा पँथर चळवळीचा झंझावात निर्माण झाला.या चळवळीने चिरडला गेलेल्या समाजाचे आत्मभान जागृत केले. स्वाभिमाना बरोबरच आपल्या वर होणाऱ्या अत्याचाराला जश्यास तसे उत्तर द्यायचे हे सुद्धा शिकवले. दलित पँथरचा धगधगता इतिहास हा काळाच्या पडद्यावर कोरून ठेवला आहे.तरीही आज काही लोक पँथर चळवळीला मार्क्सवादी (कम्युनिस्ट) यांच्या मार्गावर चालणारी चळवळ म्हणून टीका करताना दिसतात. पण एखाद्या अभ्यासकाने ती टिका करत असताना त्याचे संदर्भ हाताळावे तसेच त्या चळवळीची असलेली प्रखर आंबेडकरवादी भूमिका ही त्यांचे आंबेडकरी चळवळीशी असलेले घट्ट नाते सांगते हे समजुन घ्यावे. हि बाब सगळे गैरसमज दुर करण्यास मदत करते. पँथर चळवळीने निर्माण केलेला आत्मभान जागृत करणारा लढा व त्यासोबतच आंबेडकरी चळवळीचा विचार व आंबेडकरी चळवळीशी प्रामाणिकता यावरच आंबेडकरी समाजाचे भवितव्य अवलंबून आहे.दलित पँथर चळवळ जरी अल्पायुषी ठरली असली तरी तो विचार अजुन संपलेला नाही..
“जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा” ..
डॉ बाबासाहेब आंबेडकर ..
बहिष्कृत भारत 1927…..
(निलेश वाघमारे -नांदेड ८१८०८६९७८२)