“बौद्ध धर्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या श्रेष्ठत्वावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आला नाही. आपली दृष्टी स्पष्ट असण्याबाबत बौद्ध धर्माव्यतिरीक्त कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी (चित्त संस्कारासाठी) इतकी सखोल योजना प्रस्तुत करण्यात आली नाही.”
_ई. जे. मिल्स (आधुनिक विश्वातील महान विद्वान). “तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही.मुळात भारताची जगभरातली खरी ओळख आजही ‘बुद्धांचा देश’ म्हणूनच आहे. याच भारतातून जगभर प्रसार झालेला बौध्द धम्म अजूनही या सबंध जगाचे प्रतिनिधित्व करत असतो. याच मार्गाने चालून कित्येक राष्ट्रांनी आपली प्रगती साधली आहे तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानाने संपूर्ण जगाला व्यापुन टाकले आहे. कुठल्याही अंधश्रद्धा, कर्मकांडाला थारा नसलेला संपूर्ण विज्ञानावर आधारित असलेला बुद्ध धम्म त्याची आता झपाट्याने वाढ होत असताना दिसत आहे. इसवी सन पूर्व 563 या वर्षातील वैशाख पौर्णिमेस सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला .एक राजपुत्र असूनही वयाच्या २९व्या वर्षी राजवैभव त्यागले हा असा एक शाक्य तरुण होता.ज्याने बहुमत विरोधात असतानाही आपला युद्ध न करण्याचा आग्रह सोडला नाही, त्या त्याने स्वतः हून गृहत्यागाची शिक्षा स्वीकारली .त्याने घर सोडले, गरिबीचे व्रत स्वीकारले, भिक्षेवर जगणे पसंद केले.त्याने घर सोडले तेंव्हा या जगात त्याची काळजी घेणारे किंवा ज्याला आपले म्हणता येईल असे कोणी त्याच्या सोबत नव्ह्ते.हा त्याचा सर्वोच्च त्याग होता ते अद्वितीय धैर्य होते म्हणून त्याला सार्थपणे शाक्यमुनी किंवा शाक्यसिंह असे संबोधले जाते. वयाच्या ३५व्या वर्षी त्याने या जगातील मानवाच्या दुःख मुक्तीचा मार्ग शोधला आणि वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत त्याचा प्रचार केला. एकूण ४५वर्ष महान अश्या प्रज्ञेची आणि करुणेची शिकवण बहुसंख्य लोकांना देत राहीला . म्हणूनच आशिया खंडाचा प्रकाश असलेला महापुरुष म्हणून तथागत बुद्धांची ओळख संपूर्ण जगाला आहे.. जवळपास बाराशे वर्षापर्यंत बुद्ध धम्म चांगल्या स्थितीत टिकून होता .राजा बिंबिसार, अजातशत्रू, प्रसेनजित, अनाथपिंडक, सम्राट अशोक,हर्षवर्धन, अश्या कितीतरी राजाचे व उपासक उपासिका यांचे योगदान बुद्धधम्म वाढविण्यासाठी राहिले आहे.राजा अशोकाने तर बुध्द धम्म वाढविण्यासाठी केलेले कार्य अपूर्वच आहे जगात त्यास तोड नाही ८४,००० ठिकाणी विविध स्वरूपात शिलालेख लेणी, चैत्य, स्तूप, शिलास्तंभ निर्माण करुन बुध्द धम्म टिकवून ठेवण्याचे महान कार्य केले नेपाळ ,अफगाणिस्तान, पाकिस्तान या ठिकाणी प्रत्येकी दोन आणि भारतात ३६ शिलालेख सम्राट अशोकाद्वारे लिहिलेले पुरातत्व विभागास उत्खननात सापडले आहेत. शिवाय भारत आणि भारताबाहेर शेकडो ठिकाणी पुरातन बुध्दकालीन अवशेष सापडले आहेत अन् आजही सापडतात यावरून बौध्द धम्म किती विस्तृत होता हे समजते.आशिया खंडातील वेगाने पसरणारा धर्म म्हणून बौध्द धर्माची ओळख आहे. बौध्द धम्माच्या व्याप्ती आणि तत्वज्ञानाबद्दल जगातील प्रसिद्ध अश्या लोकांनी त्यांची मते नोंदवली आहेत.. त्यामध्ये बौध्द धम्म जिवनाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे दिसते काही जगप्रसिद्ध व्यक्तींची मते… १)”बौद्ध धर्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अर्हत, तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे. तो तत्त्वज्ञ, तसाच श्रेष्ठतम सदाचारीही असला पाहिजे. बौद्ध धर्मात ज्ञान हे मुक्ती (निर्वाण)साठी अनिवार्य मानले गेले आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक कारण आहे. (दुसरे कारण लोभ किंवा तृष्णा होय.) ह्या उलट ख्रिश्चन आदर्श पुरुषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. जगातल्या दु:खापैकी पुष्कळशी दु:खे दृष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत.”
डब्ल्यू. टी. स्टेस, ग्रंथ – बौद्ध धर्माचे नीतिशास्त्र (Buddhism Ethics)
२)”बौद्ध धर्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या श्रेष्ठत्वावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आला नाही. आपली दृष्टी स्पष्ट असण्याबाबत बौद्ध धर्माव्यतिरीक्त कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी (चित्त संस्कारासाठी) इतकी सखोल योजना प्रस्तुत करण्यात आली नाही.”
ई. जे. मिल्स, ग्रंथ – बौद्ध धर्म (Buddhism)
३)”दीर्घकाळापर्यंत मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजवला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वत:च्या तत्त्वानुसार स्वशासनाचा स्वीकार करावा. बौद्ध धर्म ही जगातील पहिली नैतिक विचारधारा आहे, जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन (स्वशासन) करण्याची शिकवण दिलेली आहे. म्हणूनच प्रगतिशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता आहे.”
इ. जी. टेलर, ग्रंथ – बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा (Buddhism and Modern Thought) अश्या अनेक पाश्चिमात्य देशांनी सुद्धा बौध्द तत्वप्रणालीला व बौध्द धम्माच्या तत्वांना अंगिकारून आपले जिवन सुखमय बनवले आहे. “डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात…”माझ्या मतानुसार बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याची तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, असे माझे माझे पक्के मत, सर्व धर्मांचा २१ वर्षे सखोल अभ्यास केल्यावर झाले आहे.”
बौध्द धम्म अमुलाग्र समाजपरिवर्तनाचा मार्ग आहे.हा बौध्द धम्म देऊन तथागत बुद्धांनी या विश्वातील मानवाच्या कल्याणाची एक मोठी सुविधा निर्माण करून ठेवली आहे म्हणून प्रत्येकाने आचरणात आणावयासारखा सोपा आणि साधा विज्ञानवादी धम्मच या जगाला तारक ठरू शकतो.अशा महान धम्म देणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन “बुध्द हे खुप उंच शिखर आहे. आपल्याला त्याची सुरुवात तर दिसते पण अंत नाही”……..
निलेश वाघमारे, नांदेड (8180869782)