Uncategorized
Trending

हिंगोली येथे 19 मे रोजी ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या नि:शुल्क प्रयोगाचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 17 : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षिणिक ध्येयांनी प्रेरित सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या नि:शुल्क प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतीबा फुले शिक्षणास माणसाचा तिसरा डोळा मानत. एका अविद्येने होत असलेले अनर्थ ते जाणून होते. त्यामुळे शिक्षणावर त्यांचा प्रगाढ विश्वास होता. या विश्वासातून त्यांचे सर्व कार्य प्रेरित झाल्याचे दिसते. ‘तृतीय रत्न’ हे याच प्रेरणेतून निर्मिल्या गेलेले नाटक आहे. आजच्या सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीत समाज प्रबोधनासाठी आजही हे नाटक समर्थ आहे. यातच या नाटकाचे यश आहे.

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून त्यांच्यासह 30 कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात दहा प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.

आपल्या जिल्ह्यात हिंगोली येथे दिनांक 19 मे, 2022 ला शिवाजी सभागृहात सायंकाळी 7 वाजता ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक भाप्रसे प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button