शिक्षण

आम्हालाही शिकविणे गरजेचेच

समावेशीत शिक्षण
अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना शिकविताना कोणत्या गोष्टीचा अध्यापन पद्धतीत विचार करावा? असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. कारण अशी मुलं शिकवितांना शिक्षकाला फार त्रास होत असतो.
अध्ययन अक्षम याचा अर्थ असा की शिकण्यास तयार नसणारे. याचाच अर्थ असा की ज्यांचा बुद्ध्यांक अतिशय अल्प असा आहे.
महत्वपूर्ण वस्तूस्थिती अशी की ज्याचा बुद्ध्यांक अति अल्प आहे. अशी मुलं कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाही. त्यांना कितीही चांगलं शिकवलं तरी. कारण ते आपल्याच तालात मग्न असतात.
अशी अध्ययन अक्षम असलेली मुलं…….. त्यांना शिक्षणक्षेत्रात विकासाच्या टप्प्यावर नेत असतांना त्यांच्यात उत्साह भरण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकाला तारेवरची कसरत करावी लागते. कारण एकच एक गोष्ट अशा मुलाला वारंवार शिकवावी लागते. जी गोष्ट शिकवितांना नाकी नव येतं. याचं कारण म्हणजे त्याची विस्मरण शक्ती. ती मुलं, त्या मुलांना जेही काही शिकवलं तरी ते सारं एका क्षणात विसरत असतात.
अशी मुलं शिकवितांना काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहेत. ते महत्वपूर्ण मुद्दे असे.
१) वस्तू दाखवणे
अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना शिकवायचे असेल तर वस्तू दाखवूनच शिकवावे लागते. ती वस्तू त्या विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायमची टिकते. कारण तसं जर शिकवलं नाही तर त्या विद्यार्थ्यांना काहीच कळत नाही व पाहिजे त्या प्रमाणात ते विद्यार्थी ज्ञानसंपादणूक पातळी संपादन करु शकणार नाहीत.
२) चित्रफिती वा चित्रफलक दाखवणे.
अशा अध्ययन अक्षम असणा-या मुलांना शिकवायचे झाल्यास त्यांना अशा चित्रफिती दाखवणे गरजेचे आहे. ते ज्ञान त्यांच्या अद्ययावतपणे चिरकाल लक्षात राहात असते.
३) कार्टून फिल्म दाखवणे.
अशा विद्यार्थ्यांना कार्टून फिल्म जास्त आवडत असतात. तेव्हा शिक्षकाने ज्या कार्टून चित्रपटाला कुसंस्काराचं माध्यम समजलं जातं. त्या कार्टून चित्रपटाचा वापर अशा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नक्कीच करावा. जेणेकरुन तो अनुभव अशा विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहिल.
४) सहल व शिबीर आयोजन.
अशा विद्यार्थ्यांसाठी शिबीर व सहलीचे आयोजन करावे. जेणेकरुन त्यांना वस्तूस्थितीचं ज्ञान यथायोग्य मिळेल व तो अनुभव चिरकाल त्यांच्या स्मरणात राहिल.
५) क्रिडास्पर्धेतील सहभाग व आयोजन.
अशा विद्यार्थ्यांसाठी क्रिडास्पर्धा आयोजीत कराव्यात. तसेच त्यांचा आवर्जून त्या स्पर्धेत सहभागी करुन घ्यावे. जेणेकरुन त्यांनाही शिक्षणात रंजकता वाटेल.
महत्वपूर्ण गोष्ट ही की आपण ऐकले असेल की जे शास्रज्ञ झाले, कलावंत झाले. त्यांचाही बुद्ध्यांक लहाणपणी कमीच होता. जसं सचिन तेंदूलकर लहाणपणी पाहिजे तेवढे हुशार नव्हते. परंतू आज ते क्रिकेटचे भगवान आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. थॉमस अल्वा एडीसन हा विजेच्या बल्बचा शोध लावणारा शास्रज्ञ. तो कधीच शाळेत गेला नाही. परंतू त्यानं विजेचा शोध लावला. तसेच त्याने वेगवेगळे शोध लावले. याचा अर्थ असा त्यांचा बुद्ध्यांक अभ्यासाच्या बाबतीत कमी होता असा नाही. फक्त तो बुद्ध्यांक शाळेतील पाठ्यपुस्तकात रमला नाही तर सचिनचा क्रिकेटमध्ये रमला व थॉमसचा विजेच्या बल्बमध्ये वा संशोधनात.
अलिकडे अशी भरपूर मंडळी आहेत की जी अजिबात शाळेत गेली नाहीत. परंतू मोठी झालीत. लहानपणी त्यांना वेडंच म्हटलं जाई. परंतू कालांतरानं ते थोर शास्रज्ञ झाले. काही चित्रपट अभिनेते झाले तर काही कलावंतही.
महत्वाचं म्हणजे शिकायला विद्यार्थी अध्ययन अक्षम आहे. त्यांचं कसं करावं? हा प्रश्न महत्वाचा नाही. तो पुढे चांगला निघावा. तसेच त्याच्याही बुद्धीचा देशासाठी वापर व्हावा ही आशा बाळगणं महत्वाची गरज आहे. कदाचित त्याच विद्यार्थ्यांमधून एखादा शास्रज्ञ निघाला तर…… बस…… याच गोष्टीसाठी त्याला शिकवणे गरजेचे आहे. बाकी आपण सर्वजण जाणतोच आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button