एमसीक्यू परीक्षा पध्दतीसाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे भव्य धरणे आंदोलन
एमसीक्यू परीक्षा पध्दतीसाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे भव्य धरणे आंदोलन
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या चालू स्त्राच्या परीक्षा या एमसीक्यू पद्धतीने घेण्यात याव्या यासाठी कुलगुरूंकडे विद्यार्थी मागणी करत आहेत पण अद्यापही त्यावर विद्यापीठाने निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांनी भव्य धरणे आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
मागील दोन वर्ष लाकडाऊनमुळे ऑनलाईन पद्धतीन परीक्षा घेण्यात आल्या आहेत तसेच एसटी महामंडळाचा मागील नऊ महिन्या संप आणि सहा महिण्याचा अभ्यासक्रम दोन महिन्यात्य पूर्ण केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा पुरेसा वेळ मिळाला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेच्या निमित्ताने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.चालू सत्राच्या परीक्षा ह्या एमसीक्यू ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्या या मागणीसाठी विद्यापीठात भव्य आंदोलन सुरू आहे. एसी एसीटी स्टुडंट अँड यूथ फ्रंटचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ डी.हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील नरबाग,प्रकाश दिपके,प्रा. सतिश वगरे, मनोहर सोनकांबळे ,डॉ.प्रवीणकुमार सावंत या विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ विद्यापीठाच्या एमसी हॉलमधे जाऊन डॉ.डी हर्षवर्धन यांनी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्यासमोर या निमित्ताने विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या परीक्षा परिस्थितीच्या निमित्ताने प्रश्न उपस्थित केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्रकुलगुरू डॉ.जोगेंद्र सिंह बिसेन,कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नेटके यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ.डी.हर्षवर्धन यांनी
केलेल्या चर्चेत असे म्हटले की,आजच्या परिस्थितीचा विचार करता ही एमसीक्यू परीक्षा ऑफलाईन याच सत्रासाठी घेण्यात यावी यासाठी मागणी केली आहे.यावेळी विद्यपीठाच्या इमारतीसमोर अनेक विद्यार्थ्यांचा जमाव पहावयास मिळाला.
जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत विद्यपीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर
आपण बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात संकेत नरवाडे, प्रथमेश लाठकर, ज्ञानेश्वर लेडंगे ,शैलेश इंगळे ,महेश पाठक, सांची गायकवाड ,अनुश्री शिंदे पवन पाटील ऋषिकेश डहाळे, यासह अन्य विद्यार्थी आहेत.