संपादकीय

खरच पुरुषांंना स्वातंत्र्य आहे काय?

आजचा काळ धकाधकीचा आहे. या काळात संविधानानुसार पुरुष आणि महिलांना समान स्थान दिलेले आहे. त्यानुसार सर्वांना समान संधीही प्राप्त झालेली आहे. त्यानुसार प्रत्येक स्री पुरुष समानतेने वागत आहे. असे असतांना आजही सत्तर प्रतिशत महिलांना विशेष स्थान प्राप्त आहे. काहींना नाही. अजुनही त्या पुरुषांच्या हातच्या कळसुत्र्या बाहुल्याच ठरत आहेत.
भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झालेले असून भारतीय संविधान हे १९४९ ला बनलं. तसेच ते २ जानेवारी १९५० ला लागूही झालं. त्यानुसार महिला व पुरुषांना समान अधिकार मिळाले. परंतू त्याच अधुकाराचा गैरवापर होताना दिसत असून आज पुरुषांवर अत्याचार होत असलेले दिसत आहेत. आज विवाह होवून घरात पत्नी म्हणून आलेली महिला पुरुषांना आपल्या हातचे कळसुत्री बाहुले तर बनवतेच. तसेच अत्याचारही करते. असे वास्तविक चित्र आज जनमानसात अगदी स्पष्टपणे दिसत आहे. त्यानुसार आज घरी विवाह होवून आलेली महिला सर्वात प्रथम आपला वचक निर्माण करण्यासाठी आपल्या पतीच्या नातेवाईकांना तोडते. त्यानंतर सुरु होते तिचा अत्याचार.
वास्तविक जीवनात स्रीला कमजोर समजत पुरुषांना ताकदवार समजलं जातं. त्यानुसार ती पुरुषांवर. अत्याचार करुच शकत नाही. असं चित्र दिसतं. परंतू ते धांदात चुक आहे. आज बरेचसे पतीवर्ग कित्येक आपल्या पत्नीचा मार खातांना दिसतात. ही देखील एक शोकांतिकाच आहे. परंतू बरेचसे पुरुषवर्ग आपल्या इगो समस्येमुळे आपली नाचक्की होवू नये म्हणून गप्प राहतात. बरीचशी पती असलेली पुरुष मंडळी स्रीयांपुढं लोटांगण घालत तिचे शब्द न् शब्द ऐकतात व तिच्या माहेरच्या मंडळींची सेवाही करतात. परंतू ब-याचशा घरात ती मात्र आपल्या पतीच्या नातेवाईकांना टाळते. ती त्यांची सेवा करीत नाही. उलट ती ज्या मायबापांनी त्याला जन्म दिला. त्याच मायबापांना वूद्धाश्रमात टाकायला सांगते. त्यावेळी विचार येतो की आपण विवाह नसता केला तर बरे झाले असते. ही मानसिकता आज प्रत्येक घराघरातून पाहायला मिळते.
आज अशी नवीन नवरी म्हणून घरी आलेली मुलगी आपल्या म्हाता-या सासूसास-यांना नीट जेवनही देत नाही. रात्रीचं जेवन सकाळी अर्थात शिळं जेवन त्यांना मिळत असतं. त्यातच हे शिळं जेवन खावून समजा पोटात काही गडबड झालीच तर त्यांना रुग्णालयात नेण्याऐवजी त्यांना जेवनच मिळत नाही. याला स्री अत्याचार नाही म्हणता येईल तर काय? हाही स्री अत्याचारच आहे. परंतू याकडे लक्ष कोण देतं, कोणीच नाही. कारण म्हाता-या माणसाचं आज कोणीच ऐकायला तयार नाही.
आजही साधा चष्मा तुटला तरी पुरुष बोलण्याच्या आधी ती स्रीच बोलते की कशाला गरज आहे चष्म्याची. त्यातच डोळे तपासणे दूरच.
हे म्हातारपण. या म्हातारपणात शरीरात रक्त कमी तयार होतं. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीही कमी होत असते. या काळात वेगवेगळे आजारही बळावतात. डोळ्यावर मोतियाबिन्दू आलेला असतो. त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं असतं. परंतू घरी मुलगा हा आपल्या पत्नीचंच ऐकत असतो. कारण ती त्याला सर्रास धमकी देते की माझं जर ऐकणार नसशील तर मी माहेरी किंवा तुला सोडून चालली जाईल. अर्थात निघून जाईल. हे वक्तव्य ती त्यावेळी करते, ज्यावेळी तिला दोन मुलं झालेली असतात. काही पुरुष हे विकृत मानसिकतेचे असतात. ते काही अशा महिलांचं चालूच देत नाहीत. काही मात्र चांगल्या स्वभावाचे असतात. त्यांना भीती वाटते की खरंच त्याची पत्नी त्याला सोडून गेली तर…….. कारण तसे इतर मित्रांच्या बाबतीत घडलेलं असतं.
म्हातारी माणसं मात्र आपण पुर्व जन्मात काही पाप केलं अशी मानसिकता ठेवून गप्प बसतात. बिचारे आपला मुलगा सुखी राहावा अशी मानसिकता बाळगून. काही काही महिला तर याच स्वातंत्र्याचा फायदा घेवून त्यांचा पती जीवंत असतांना परपुरुषांशी संबंध ठेवतात. ते पतींनाही दिसतं. परंतू तो काहीही बोलू शकत नाही. कारण मुलं झालेली असतात आणि तेव्हा भीती वाटते की आपली ही पत्नी आपल्यालाच नाही तर आपल्या मुलाबाळांनाही सोडून त्या परपुरुषासोबत निघून जाईल. मग आपल्याच मुलाबाळांची आबाळ होईल. ती तशी जातेही. असं बरेचदा घडलेलं आहे. काही अंशी केवळ महिलाच जबाबदार असतात असेही नाही. पुरुषही तेवढ्याच प्रमाणात जबाबदार असतात. हे तेवढंच सत्य आहे.
पुरुष हा स्रीला दुषणे देणारा व्यक्ती. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण ती कितीही चांगली वागली तरी तिला तो दोष देत असतो. याच मानसिकतेतून समजा ती एखादे वेळी कोणाशी बोललीच तर पुरुषवर्ग तिच्यावर शंका घेतो. त्यात त्याला असंख्य वेदना होतात. अशा वेदना की तो कोणाला त्या वेदनेविषयी सांगू शकत नाही. प्रसंगी तो त्या वेदना विसरण्यासाठी तो व्यसनाचा आधार घेतो. मुख्सतः दारुचा. ही त्याची दारु दिवसेंदिवस वाढत जाते. ती एवढी वाढते की ती त्यांच्या पत्नींना सहन होत नाही. मग घटस्फोट व रोजची भांडणं इत्यादी गोष्टी घडतात.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की आजच्या काळात संविधानाचं राज्य आहे. त्यानुसार प्रत्येकजण कायद्यासमोर समान आहे. कोणीच लहान वा मोठा नाही. मग ते लहान बालक असेल वा एखादा वयोवृद्ध व्यक्ती. ती स्री असेल वा तो पुरुष. ते झाड असेल वा एखादा प्राणी. प्रत्येकाला कायद्यानुसार जगण्याचा अधिकार आहे. तेव्हा आजच्या काळात कोणी कोणाचा गुलाम नाही. त्यामुुळं महिला असो की पुरुष यांनी एकमेकांना कमजोर समजू नये वा गुलामागत वागणूक देवू नये. पुरुषांनी स्रीयांना समानतेचा अधिकार द्यावा. कारण तसा अधिकार संविधानानं दिलेला आहे. तिला सर्व गोष्टी करण्याचं बंधन नसावं. तसंच स्रीयांनीही संविधानानं स्वातंत्र्य दिलं म्हणून उहापोह करु नये. स्वातंत्र्याचा स्वैराचार करु नये. पुरुषांची मानसिकता लक्षात घेवून त्यावर अत्याचार करु नये. तसेच म्हाता-या सासूसास-यांवर तर अजिबात नाही. तेही तुमच्या मायबापासारखेच असतात. हे लक्षात घ्यावे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button