शिक्षण

निरक्षरता रक्ताळलेल्या जखमेसारखीच

निरक्षरता रक्ताळलेल्या जखमेसारखीच

माणसानं शिकावं, निरक्षर राहू नये असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण निरक्षरता…… ती जखमच आहे विद्यार्थ्यांंसाठी. ती जखम आहे पालकांसाठी आणि ती जखम आहे शिक्षकांसाठी. एखादी जखम तरी सुधरुन जाते. त्या जखमेचे व्रणही काही दिवसानं निघून जातात. परंतू माणूस निरक्षर असला ना. तर फार वाईट वाटतं. एखाद्या वेळी मनावरील खोल रुजलेला विचारही कदाचित निघून जातो. परंतू निरक्षर असलेल्या माणसाच्या मनावरील डाग कधीच निघत नाही. म्हणून ती जखम वाटते.
माणसानं शिकावं. शाळेत जावं. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यावे. असे सर्वजण म्हणतात. याचा अर्थ असा की माणसानं औपचारीक शिक्षण घ्यावं, अनौपचारीक नाही.
औपचारीक म्हणजे शाळेत जावून घेतलेले आणि अनौपचारीक म्हणजे शाळेत न जाता घेतलेले.
पुर्वीच्या काळी शाळा नव्हत्या. तरीही माणसांना ज्ञान असायचं. हे ज्ञान त्याला अनुभवातून मिळालेलं असायचं. घरचे आजी आजोबा, परीसरातील लोकं, परीसरातील वस्तू, परीसरातील वास्तू तसेच निसर्ग आपल्याला हवं ते शिकवीत असायचे. जे आज शाळेत शिकवलं जातं, ते काल वरील सर्व मुर्त अमुर्त व्यक्ती वा वस्तूच्या माध्यमातून मिळायचं.
विजेचा गडगडाट झाला की आता पाऊस येणार. परीसरातील बेडकं ओरडली की पाऊस येणार. कावळ्यानं अमक्या ठिकाणाहून काडी पकडली की यावर्षी एवढा पाऊस पडणार. त्यावरुन पिकांचा अंदाज बांधला जात होता. या गोष्टी काही अंशी शाळेत जावून शिकायला मिळायच्या नाहीत. ते सर्व ज्ञान अनुभवातूनच. तरीही निरक्षरता रक्ताळलेल्या जखमेसारखीच. हे वाक्य संयुक्तीक वाटत नाही.
होय, निरक्षरता ही रक्ताळलेल्या जखमेसारखीच आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. शिकणं महत्वपूर्ण गोष्ट आहे. त्याची कारणं खालीलप्रमाणे देता येतील.
१) निरक्षर व्यक्ती हा कुठेही जावू शकत नाही अन् जावू शकतो ते विचारत विचारत. समजा एखाद्यानं त्या निरक्षर व्यक्तीला चुकीचा पत्ता सांगीतला तर तो व्यक्ती चुकीच्या पत्त्यावर नक्कीच पोहोचू शकतो. म्हणून आपल्याला आजच्या काळात शिकणं महत्वाचं आहे.
२) निरक्षर व्यक्तीची अवस्था ही गुलामासाारखी असतेे. त्याला स्वतःचे मत ठामपणे मांडता येत नाही. तो हूशार असूनही त्याला समाजात चूप राहावं लागतं. म्हणून शिकणे महत्वाचे आहे.
३) शिक्षणानं माणूस शहाणा तर बनतो. परंतू कोणीही मुर्ख बनवू शकत नाही. त्यातच कोणी जास्तची अक्कल सांगू शकत नाही.
४) शिक्षणानं नवनिर्मीती करता येवू शकते. आपल्याला माहित असलेल्या ज्ञानाचं संप्रेषण करुन त्या ज्ञानाच्या आधारावरुन नवीन ज्ञान आपण मिळवू शकतो.
५) अलिकडच्या काळात शिक्षण ही महत्वपूर्ण कृती ठरली आहे. शिक्षण जर नसेल तर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोण हा वाईट असतो. समाज निरक्षर व्यक्तींकडे हीनतेच्या नजरेतून पाहात राहतात. त्यामुळं साहजीकच आपल्या मनात न्युनगंड तयार होत असतो. तो न्युनगंड हा वाहत्या रक्ताळलेल्या जखमेसारखाच असतो. याचाच अर्थ असा की न शिकणा-या व्यक्तीचा लोकं पाहिजे त्या प्रमाणात मानसन्मान करीत नाहीत.
६) न शिकणा-या माणसाला न शिकल्याचे शल्य जीवनभर सतावत असते. एक प्रकारे शिकणे महत्वाचे आहे. परंतू हे हे शल्याचे बोलणे मानवी मनाचा तीळपापड केल्याशिवाय सोडत नाही. यासाठी शिकणे महत्वपूर्ण गोष्ट आहेे.
७)शिकल्याने आपली भावी पिढीही सक्षमपणे तयार करता येते. त्या पिढीला तयार करताना अडचणी उद्भवत नाहीत.
८) शिक्षणानं उदरनिर्वाहाचं साधन तयार करता येतं. जो जेवढा जास्त शिकेल, त्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करता येतं हे तेवढंच खरं आहे.
९) शिक्षणानं खरी सुखप्राप्ती मिळत असते.
१०)शिक्षण जर असेल तर कोणी कोणावर अत्याचार करु शकत नाही. कोणी जर अत्याचार केल्यास तो वेळेवरच लक्षात येतो व त्या अत्याचाराविरुद्ध वेळेवरच दादही मागता येते. यासाठी शिकणे महत्वाचे आहे.
आज जो व्यक्ती शिकत नाही, त्याला स्वतःला मनाची लाज वाटत असते. त्यातच कोणीही त्याचा पदोपदी अपमान करीत असतो. असा जेव्हा अपमान होतो, तेव्हा कोणीही त्या अपमान कर्त्याला ब्र देखील म्हणू शकत नाही. अर्थात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतात. तो पिल्यास माणूस गुरगुरणार. परंतू माणूस शिकलाच नाही तर त्याला ते कळणार कसं?
आजच्या डीजीटल काळात महत्वाचं आहे शिक्षण. तेही शाळेत जावून. घरी राहून नाही. कारण आज जग चंद्रावर पोहोचलेले आहे. आजचा काळ हा घरातील चार भिंतीत उदरनिर्वाह करण्याचा नाही तर विदेशातही परीभ्रमण करण्याचा आहे. आता लोकं असे म्हणतील की शिकलं नाही तर तो व्यक्ती जगू शकत नाही काय? होय, जगू शकतो, परंतू त्या जगण्याला अर्थ काय? जगू तर किड्या मुंग्याही शकतात. परंतू माणसाच्या जगण्यात आणि किड्यामुंग्यांच्या जगण्यात फरक आहे की नाही. हे ज्याला चांगलं कळतं. त्याला शिक्षण म्हणजे काय असतं? शिक्षणाचे महत्व काय? हेही चांगलं कळतं. तो असे उटपटांग प्रश्न विचारण्याऐवजी शिक्षणावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत करतो. तो यथायोग्य शिकतो नव्हे तर त्या शिक्षणाचा वापर आपल्या जीवनात करुन आपले जीवन सुखकर बनवतो हे मात्र निश्चीत. महत्वाचं म्हणजे माणसानं शिकावं, निरक्षर राहू नये म्हणजे झालं. एवढंच इथे सांगावसं वाटते. निरक्षरतेच्या जखमेचा डाग कोणीही आपल्या मनावर कोरु नये म्हणजे झालं. तो डाग किंवा ते व्रण माणूस मरेपर्यंत आयुष्यातून मिटवू शकत नाही आणि वेळ निघून गेल्यावर कोणी कितीही प्रयत्न केला तरी शिकू शकत नाही. म्हणूनच विशिष्ट वयात शाळेत जावून शिक्षण घेतलेलं बरं. तिच तुमच्या आयुष्यातील पहिली कमाई आहे हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button