वैभव प्रशांत इंगोले ९३.८० टक्के गुणांनी एसएससी परीक्षा उत्तीर्ण
वैभव प्रशांत इंगोले ९३.८० गुणांनी एसएससी परीक्षा उत्तीर्ण
नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ,चळवळीतील सक्रिय युवा व्यक्तिमत्त्व इंजि.प्रशांत इंगोले यांचे सुपुत्र वैभव प्रशांत इंगोले यांनी नुकत्याच लागलेल्या निकालातून दहावी परीक्षेत मोठ्या गुणांनी यश संपादन केले आहे.
इंजि.प्रशांत इंगोले हे सुपरिचित व्यक्तिमत्त्व असून सामाजिक, राजकीय ,धार्मिक,सांस्कृतिक कार्याबरोबरच त्यांचे चळवळीत नेहमीच योगदान असते.अशा व्यक्तिमत्वाचे सुपूत्र वैभव इंगोले यांनी दहावी परीक्षेत ९३.८० %गुण मिळवून मोठे यश संपादन केले आहे. वैभव इंगोलेने मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी कनिष्क सोनसळे, इंजि.अमोल गोणारकर, राष्ट्रपाल गोणारकर यांच्यासह मिञ परिवाराकडून वैभव प्रशांत इंगोलचा या यशाबद्दल सत्कार करण्यात आला आहे.