प्रत्येक शाळेनं विद्यार्थ्यांसाठी काय करायला हवं. असा जर विचार केल्यास किंवा हा विचार कोणालाही सांगितल्यास तो नक्कीच वेेड्यात काढेल. कारण कोणीही नक्की आणि हमखास सांगेल की शाळा विद्यार्थ्यांसाठी काय करेल, शिकवेल. अजून काय करणार.
मुख्यत्वे आजच्या परीस्थीतीत शाळा काय करेल, शिकवेल. या जुन्या गोष्टी झाल्या. या गोष्टी जुन्या म्हणजेच १९६४ आणि १९८६ च्या शैक्षणिक धोरणातील झाल्या. आता नवीन शैक्षणिक धोरण तयार करताना या जुन्या गोष्टी टाकून द्यायच्या आहेत. तसेच नवनवीन गोष्टी घ्यायच्या आहेत. तसेच शिक्षकांनीही केवळ शाळेत राहून विद्यार्थ्यांना शिकवायचंच नाही आहे, तर त्यांना शिकवीत असतांना त्या शिकविण्यात रंजकता आणायची आहे. तसेच अशी रंजकता केवळ निर्माण करतांना त्यांना स्वयंअध्ययन करायलाही प्रेरीत करायचे आहे.
मुख्यतः शाळेत प्रवेश देतांनाच काही बदल करायचे आहेत. तो बदल म्हणजे ज्या ज्या विद्यार्थी वर्गाला शिकायचे आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यायचा आहे. या व्यतिरीक्त त्यांना विशेष सोयी देखील पुरवायच्या आहेत. जसे कर्णबधीर विद्यार्थ्यांना पुढे बसविणे. अंध विद्यार्थ्यांना रँम्प लावून देणे. त्यांना ब्रेल लिपीद्वारे शिकविणे. तसेच जर मुलगा जास्त वयाचा असेल आणि तो जर शाळेत गेला नसेल तर त्याला तो ज्या वयाचा असेल, त्या वयानुसार त्याला शाळेत टाकणे. तसेच त्याला जरी त्या वर्गातील अभ्यास येत नसला तरी अतिरीक्त पुरक अध्ययन घेवून शिकविणे. विद्यार्थ्यांना नाचून बाळगून शिकविणे. या सर्व गोष्टी शिक्षकाला आपल्या शिकविण्यात आणायच्या आहेत.
शाळा म्हणून शिक्षकाला विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असतांना ही जी अपंग मुले आहेत. त्या मुलांकडे लक्ष देत असतांना आणि त्यांच्यासाठी शाळेत सोयी करीत असतानाच आणखी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे त्यांचा उपचार. कारण जी मुलं अस्थीव्यंग आहेत. त्यांचे पालक हे अडाणी असतात. त्यांना आपल्या अस्थीव्यंग मुलाला उपचारासाठी कुठे न्यावे याचे साधे गणित कळत नाही. ते उपचारच करीत नाही. त्यामुुळं अशा विद्यार्थ्यांना जर शिकवायचे असेल तर आपण पुरेसा न्याय देवू शकत नाही. म्हणून अशा विद्यार्थ्यांवर उपचार झाला तर त्यांना पुरेपूर शिकविता येईल. म्हणूनच उपचार.
दुसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे जी मुलं शाळाबाह्य आहेत. अशा मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षण प्रवाहात आणायचं आहे. असे करीत असतानाच ती मुले शाळेत कंटाळवाणी होणार नाहीत हेही पाहायचे आहे. त्यासाठी त्याला वस्तुनिष्ठ ज्ञान द्यायला हवं.
विशेष बाब ही की त्या विद्यार्थ्यांना अजिबात मारायचे नाही. तर त्यांना प्रेमानं कुरवाळायचं असून त्यांना प्रेमानच हाताळायचं आहे. आता तो कुंभाराच्या मातीचा गोळा उरलेला नाही. त्याच्याजवळ आज ज्ञानभंडार आहे असं नवीन शैक्षणिक धोरण सांगतं. मग शिक्षकाला काय करायचं आहे तर त्याच्याजवळ जे ज्ञान आहे. त्या ज्ञानाला पाठ्यपुस्तकातील ज्ञानाशी जोडायचं असून पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा संबंध व्यवहारीकतेशी जोडायचा आहे. तेव्हाच त्या ज्ञानाचं उपयोजन करता आलं असं मानता येईल. आता सामान्य विद्यार्थी…… विकलांग मुलांकडे लक्ष पुरवता पुुरवता कधी कधी सामान्य विद्यार्थी वर्गाकडेही लक्ष देता येणे शक्य होत नाही. तेव्हा हेही शिक्षकांनी लक्षात ठेवायला हवं की अशा विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होणार नाही. त्यांनाही सर्वकष सातत्यपुर्वक ज्ञान मिळवता यावं. यासाठी शिक्षकाने प्रयत्न करायला हवा. जेणेकरुन अस्थीव्यंगच नाही तर सामान्य मुलेही शिकू शकतील. मुखत्वे विद्यार्थ्यासाठी शाळेनं असं काही करायला हवं की ते कोणत्याही परीस्थीतीत मागेच राहणार नाही व ते सातत्याने पुढे जातील हे तेवढंच सत्य आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०