अक्षरा सावळे हीचे नवोदय विद्यालय परीक्षेत यश
अक्षरा सावळे हीचे नवोदय विद्यालय परीक्षेत यश
नांदेड: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव येथील विद्यार्थीनी अक्षरा भीमराव सावळे हीने केंद्रीय जवाहरलाल नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.
जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीच्या आधारे दिला जातो. त्यात एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव येथील विद्यार्थीनी अक्षरा भीमराव साळवे हीने ८०पैकी ७५ मार्क्स घेऊन हे उज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता सहावीसाठी नवोदय विद्यालयातील शिक्षण घेण्यास ती पात्र झाली आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल
पप्पाकडील आज्जी आजोबा ललिताबाई गोपाळ सावळे ,मम्मीकडील आज्जी आजोबा गायबाई प्रभाकर दुधमाल,प्रमोद अशा अंकल आंटी ,मामा मामी मुंजाजी क्रांती ,जनाबाई देविदास सावंत सिद्धू इंगोले यांच्याकडून तसेच सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
[