अडेगावात मानव विकास मिशनची बससेवा सुरू
;संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिषभाऊ झाडे यांचा लढा फलदायी
अडेगावात मानव विकास मिशनची बससेवा सुरू
;संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिषभाऊ झाडे यांचा लढा फलदायी
सुनील शिरपुरे/झरीजामणी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मानव विकास योजनेंतर्गत शालेय मुलींसाठी तालुक्यात बस सेवा सुरु नव्हती. बस येत नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज नाहक त्रास सहन करावा लागत होता. गावामध्ये बस नसल्याने विद्यार्थी खाजगी वाहनाने प्रवास करत होते. गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास अनेक अडचणी येत होत्या. मात्र या गावातील शिक्षण घेणा-या मुलींची संख्या वाढल्याने संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आशिष झाडे यांनी पुढाकार घेऊन आगार व्यवस्थापकाकडे मानव विकास मिशन बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. या मागणीला प्रतिसाद देत आगार व्यवस्थापक प्रमुखांनी बससेवा सुरु करण्याचे मान्य करून आज ६ रोजी गावात बस सुरू करण्यात आली. गावात बस येताच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत बसचे जल्लोषात स्वागत केले. एवढेच नव्हे तर चालक व वाहकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित बंडू केलझलकर, रवी कडुकर, दुष्यांत काटकर, दिपक हिरादेवे, संदीप आसुटकार, अक्षय ठुनेकार, सचिन कडुकर, विलास ठावरी, संजय आसुटकार, मोनू शेंगर उपस्थित होते.