चळवळ संपली तर शोषितांचे अस्तित्व धोक्यात -प्रा. विजय आठवले
चळवळ संपली तर शोषितांचे अस्तित्व धोक्यात –
प्रा विजय आठवले
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीने भारतातील शोषित समूहात आत्मभान निर्माण करून लढण्याची दिशा दिली भारतासाठी दिशादर्शक ठरलेल्या आंबेडकरी चळवळीला राजकीय स्वार्थासाठी, संपविल्या जात आहे ,
बौद्ध,बहुजन ,मागासवर्गीयांचे प्रश्न गंभीर होत असताना चळवळ संपली, तर लढण्याची धग संपेल,शोषितांचे हक्क नाकारल्या जातील , शोषितांचे अस्तित्व धोक्यात येईल म्हणून चळवळीला बेईमान होऊ नका असे आवाहन सम्राट अशोक ब्रिगेड संस्थापक प्रा विजय आठवले यांनी केले
दिनाक 31 जुलै रविवारी शासकीय विश्राम गृह अकोला येथे आयोजित सम्राट अशोक ब्रिगेड सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट अशोक ब्रिगेड अकोला जिल्हा ध्यक्ष प्रा सुरेश मोरे सर हे होते तर महासचिव निरंजन भाऊ वाकोडे, प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे,भारत वानखडे,प्रा शैलेश इंगळे प्रा सुनील कांबळे,प्रभाकर कवडे दादा गौतम वाघमारे डी आर गवई ओमप्रकाश इंगळे उमेश इंगळे रोहित जगताप अड भूषण घन बहादूर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत ,मूर्तिजापूर,तेल्हारा, बार्शी टाकळी, तालुका अध्यक्ष निवड, प्रामाणिक लोकांना संघटनेत जुळवून घेणे,भीमा कोरेगाव प्रकरण गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन उभे करणे,अकोला जिल्ह्यात सम्राट अशोक प्रतिष्ठान माध्यमातून सम्राट अशोक यांचे स्मारक, पुतळा,निवासी स्टडी सेंटर, उभारण्यासाठी सभासद नोंदणी अभियान,तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिने ट,पदवीधर निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,सम्राट अशोक ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश मोरे सर यांनी आंबेडकरी समूह,शोषित समूहाच्या हितासाठी अहोरात्र झटत असलेले सम्राट अशोक ब्रिगेड संघटन आहे संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले ,तर महासचिव निरंजन वाकोडे यांनी सम्राट अशोक ब्रिगेड चळवळीचा शेवटचा आवाज असून समाजाने साथ दिली पाहिजे असे मत व्यक्त केले
प्रास्ताविक प्रा सुनील कांबळे यांनी तर आभारप्रदर्शन सूत्रसंचालन प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे यांनी मानले