पावसाचा अंदाज पुन्हा काळजाचा ठोका वाढवणार
;आज आणि उद्या मुसळधार पावसासह ही शृंखला ३० जुलै पर्यंत कायम
पावसाचा अंदाज पुन्हा काळजाचा ठोका वाढवणार
;आज आणि उद्या मुसळधार पावसासह ही शृंखला ३० जुलै पर्यंत कायम
राज्यात सध्या काही जिल्ह्यात पाऊस हा कायम आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसह सर्वच सामान्यांच्या काळजाची धडधड वाढली असून अनेक शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
साहजिकच दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतक-यांना हजारो रुपयांचा अजून खर्च करावा लागणार आहे. शिवाय पहिल्यांदा पेरणी करण्यासाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च देखील वाया गेला आहे. यामुळे सध्या राज्यातील शेतकरी बांधव व इतर सामान्य जनता पावसाची उघडीप कधी होते याकडे लक्ष ठेऊन आहे.
सुरुवातीला पावसाची आतुरतेने वाट पाहणारा बळीराजा आता पाऊस उघडण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र राज्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचेच नाही तर सामान्य जनतेचेही मोठे नुकसान झाले असून खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांची नासाडी झाल्याचे शेतकरी व्यक्त करत आहे. यामुळे सध्या शेतकरी बांधव पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. मात्र, राज्यात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने शेतकरी बांधवांपुढे शेतीची कामे कशी करावीत? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज आता सार्वजनिक करण्यात आला आहे. पंजाबराव डख यांनी 30 जुलैपर्यंत चा हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात आज आणि उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, राज्यात पाऊस हा सुरूच राहणार आहे.
त्यामुळे शेतकरी बांधव व इतर सामान्य जनतेंनी पावसाचा अंदाज बांधून शेतीची व इतर कामे देखील सुरू ठेवली पाहिजेत. आज आणि उद्या पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा तसेच कोकण किनारपट्टीत मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.
आज आणि उद्या म्हणजे 20 जुलैपर्यंत राज्यातील चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा, नादेंड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, लातूर, परभणी, बिड, जालना, संभाजीनगर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. पंजाबराव यांच्या मते या कालावधीत पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ मध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
पंजाबरावं यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार आज विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. तसेच उद्यापासून अर्थात 20 जुलै पासून राज्यातील उत्तर महाराष्ट्रात आणि उर्वरित भागात सूर्याचे दर्शन होणारं आहे. मात्र, पुन्हा मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असून 23, 24 आणि 25 जुलै रोजी राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. तसेच 28, 29, 30 जुलै रोजी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९