बहुजनांच्या संदर्भाने विद्यापीठ सिनेट सदस्य उमेदवार कसा असावा..?
भारताला शोषणव्यवस्थेचा इतिहासात लाभलेला आहे. हजारो वर्षांपासून करण्यात आलेल्या शोषणाचे कारण शिक्षणाचा अभाव (अर्थातच शिक्षणाचा नसलेला अधिकार )आणि हीच शोषणव्यवस्था नेस्तनाबूत करण्याचे हत्यार म्हणजेच शिक्षणच होय.त्यामुळे शिक्षण हेच एकमेव असे हत्यार आहे ज्यातून सर्वप्रकारचे परिवर्तन शक्य आहे. आशा या मानबिंदू असलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील निर्वाचित प्रतिनिधित्व कसे असले पाहिजे याचे चित्र जेंव्हा डोळ्यासमोर उभे राहते तेव्हा त्यास आजच्या आणि भविष्यकालीन समस्या यांचाही उहापोह होणे गरजेचे असल्याने त्या दृष्टीने साजेसं प्रतिनिधित्व हे आजच्या शिक्षित पदवीधर नव तरुणांनी व अन्य पदवीधारकानी या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. मुळातच उच्यशिक्षणातील समस्या या तितक्याच भेडसावणाऱ्या आहेत जितक्या आजच्या दैनंदिन जीवनातील समस्या या तुम्हा आम्हा सर्वसामान्य, गरीब, पीडित,शोषित,मागासवर्गीय घटकांना भेडसावत आहेत.त्यामुळे दिवसेंदिवस उच्य शिक्षणातील होणारी वाताहत शिक्षणव्यवस्थेत होणारे कमर्शियल व्यापारीकरण, आणि मानवी मूल्यांना छेद देऊन कॉर्पोरेट पोषक शैक्षणिकीकरण हा आजच्या शिक्षणव्यवस्थेचा हातखंडा तर आम्हाला आमच्या गरजांना विशेषतः वंचित,दुर्लक्षित केंद्रित शिक्षण असणे गरजेचे आहे.प्रश्न जेव्हा विद्यापीठीय शिक्षणाचा येतो तेव्हा महत्वाचे आहे ते म्हणजे उच्य शिक्षणातील आमच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि उच्य शिक्षित होऊन विविध क्षेत्रात त्यांनी बळकावलेल्या जागा म्हणून केवळ उच्यशिक्षण हेच आमची हातोटी नाही तर उच्य शिक्षणातून प्राप्त पदव्याच्या आधारे आम्हाला आमच्या गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळावी अशी शिक्षणव्यवस्था जिवंत ठेवणे ही आजची प्राथमिक गरज बनली आहे.विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी असतात त्यांच्या ऍडमिशनपासून ते पदवी प्राप्त करण्यापर्यंत .कधी शिष्यवृत्तीचे प्रश्न तर कधी ,कधी विद्यापीठांतर्गतचे प्रश्न, बहूजन विद्यार्थ्यांना विनाकारण टार्गेट करून मानसिक छळ करणे M.phil ,phd, च्या विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास देणे या व अन्य घटनांचे पेव कित्येक विद्यापीठ आणि कॉलेजेस मधून घडते ही उच्यशिकणातील वास्तविकता आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या भूमिका आणि त्यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी दिलेले लढे,विविध परिवर्तनवादी विद्यार्थी चळवळीच्या भूमिका या नेहमीच विद्यापीठात पहावयास मिळतात.पण ज्या ठोस भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतात त्यासाठी कोणत्याही परिस्थितीला समोर जातात आणि विद्यापीठीय शिक्षण हक्कांची जतन करतात अशाच चळवळीतून आगामी काळात होऊ घातलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापीठ सिनेट सदस्य उमेदवार म्हणून बहुजन समाजातील या तोडीचे नेत्रत्व सिनेट सदस्य म्हणून निवडून जाणे ही आजची आपली गरज आहे. केवळ आणि केवळ सिनेट सदस्य निवडून देणे ही जरी प्रक्रिया वाटत असली तरी आम्हाला बदल घडवून आणणारे उमेदवार निर्माण केले पाहिजे.शिक्षणव्यवस्थेत काय काय घटना घडतात या पेक्षा कोणत्या प्रकारच्या घटना घडवून आणून आमचा उच्यशिक्षणातील पाया मजबूत होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशा ह्या विस्तारित करणे गरजेचे आहे. आज घडलीत बहुतांश विद्यापीठात चाललेल्या विविध विचारधारा ह्या विद्यापीठीय,बाह्य राजकारण आणि विचारधारेला सक्षम बनवत आहेत.विद्यापीठ परिक्षेत्रात चालणाऱ्या विचारधारेचा विचार केला असता इथल्या प्रस्तापितांनी आपल्या कक्षा अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे.आम्हाला या प्रस्तापित विचारधारेच्या नांग्या ठेचून काढत असताना मानवी मूल्यव्यवस्था संवर्धित करणारी विचारधारा पेरणे गरजेचे आहे त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेचे शिक्षण आणि समाजनिर्मिती करत असताना मतदानक्षम पदवीधरांनी या बाबींचा सद्सद्विवेकाने विचार करावा एवढीच अभिलाषा…
(मनोहर सोनकांबळे)
8459233791,8806025150
एम .फिल.संशोधक विद्यार्थी
माध्यमशास्त्र संकुल,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)