मुची येथे पेसा ग्रामकोष समिती पुनर्गठन करण्याबाबत चर्चा
मुची येथे पेसा ग्रामकोष समिती पुनर्गठन करण्याबाबत चर्चा
प्रतिनिधी
सुनील शिरपुरे, झरीजामणी
झरीजामणी तालुक्यातील मुची या गावात गेली काही वर्षांपासून ग्रामकोष समितीची निवड अद्याप करण्यात आली नाही. १९९६ मध्ये पेसा कायदा अमलात आला आणि हा कायदा आदिवासी समाजासाठी एक वरदान असे मानले जाते. या कायद्याचं तंतोतंत पालन करण्यासाठी ग्रामकोष समितीची स्थापना केली जाते व त्या समितीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सचिव तर दोन सदस्य असतात. ग्रामस्थांची अशी मागणी आहे की, मुची हा गाव पेसा मध्ये असल्यामुळे तिथे ग्रामकोष समितीची स्थापना फक्त तोंडातोंडी आहे, अशी तक्रार गावक-यांच्या वतीने करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुची येते त्वरित ग्रामकोष समिती पुनर्गठन करून नविन अध्यक्ष, सचिव, नेमावे करिता आज समस्थ मुची येथील ग्रामवाशी आपले समस्या या बैठकीत उपस्थित केलेत. त्यात ग्रामपंचायत सदस्य सोनेराव टेकाम, रवींद्र टेकाम, देविदास आत्राम, सीताराम टेकाम, गणेश टेकाम,मंगल आत्राम, बाळा आत्राम, सुरेंद्र टेकाम, अविनाश आत्राम आदी उपस्थित होते.