स्प्रुट लेखन

निसर्गाची किमया: हतबल माणसं!

निसर्गाची किमया: हतबल माणसं!

निसर्ग……..निसर्गाची किमया मोठी न्यारी आहे. नागद्वारलाही एक दरबार नावाचं स्थळ आहे. एकदा एक व्यक्ती असाच तो दरबारात गेला असता त्यानं पाहिलं की एक किडा भगवान शिवाच्या पिंडी तयार करतो. तशा तिथं लहानमोठ्या पिंडी होत्या. त्या लहानमोठ्या पिंडी लहानमोठे किडे बनवीत होते.
किती निसर्गाची किमया की हे किडे भगवान शिवाच्या लहानमोठ्या पिंडी बनवतात. त्यांच्यात ती कला आहे. याबाबत एक गोष्ट सांगतो. एकदा एका मुंगीनं एका मधमाशीला प्रश्न केला की तू नित्यनेमानं शहद गोळा करतेस. परंतू तो स्वार्थी मनुष्य तुझं शहद नेहमी चोरुन नेतो. त्याबद्दल तुझं मत काय? तुला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही काय? त्यावर मधमाशी म्हणाली,
“वाटते ना. बरंच काही वाटते. ही स्वार्थी माणसं फक्त माझं शहदच चोरतात ना. माझी कला तर चोरु शकत नाही.”.
मधमाशीचं बरोबर आहे. कारण अजुनही कुत्रीम शहद कसं तयार करावं याचा शोध लागलेला नाही. ती कला आहे आणि ती कला मधमाशीनंच जोपासली आहे. निसर्गाची किमया एवढी आहे की ज्या मुंगीला आपण साधारण म्हणतो. त्या मुंगीचं आपण घर पाहिलेलं नाही. ते घर साधारणतः आपल्याही घरापेक्षा मोठं असतं. जर जमीन खोदून पाहिलं ना. तर आपल्याला ते दिसेल. हे संशोधनार्थी सिद्ध झाले. झाडांनाही जीव असतो. तेही श्वास घेतात. अन्ननिर्मीती करतात. त्यांनाही विजेचा झटका लागतो. हे प्रयोगांती जगदिशचंद्र बोस नावाच्या एका शास्रज्ञानं सिद्ध केलंय. आजही अशा चमत्कारीक गोष्टी निसर्गात घडतात. विशिष्ट मोसमात पाऊस येणे, उन तापणे आणि थंडी वाजणे ह्या चमत्कारीकच गोष्टी आहेत. परंतू ते कळायला मार्ग नाही आपल्याजवळ.
आम्ही देव त्यालाच मानतो. ज्याला चमत्कार करता येतात. अलिकडे असे चमत्कार करणारे गल्लोगल्ली तयार झाले आहे. काही लोकं मुरमु-यापासून रुपये देखील बनवून दाखवतात. मग असे जर रुपये बनतात. तर त्यांना रस्त्यारस्त्यावर भिक्षा का बरं मागावी लागते? प्रश्न आहे ना हा विचार करण्यालायक. बरोबर आहे. कारण ती हातचलाखी आहे. हे हातचलाखी करणारे लोक कधी रुमाल काढतात तर कधी कबूतर. एक नाही, जोड्याच्या जोड्या काढतात. हा माणसाचा चमत्कार. त्याच चमत्कारानं आपण भाळतो आणि त्या माणसाच्या बोलण्यानुसार आपण त्याच्या बोलण्याला बळी पडतो आणि अंधश्पद्धेच्या आहारी जातो. मग तो सांगतो की अमूक ठिकाणी गुप्तधन आहे. ते मिळेल, परंतू त्या ठिकाणी एक नरबळी द्यावा लागेल. मग काय, आपली लालसा आपल्याला तसा बळी देण्यास बाध्य करते. शेवटी नरबळीसाठी शोधाशोध सुरु होतो. असा शोधाशोध घेत असतांना मोठ्या माणसांचा बळी आपण देत नाही.लहान मुलं बघतो. कारण लहान मुलांना गायब करणं तेवढं धोक्याचं नसतं. मोठी माणसं गायब करणं तेवढं कठीण. मग मोठ्या माणसांना गायब करण्याऐवजी लहान मुलं गायब केली जातात. ती नरबळी दिली जातात. परंतू धन काही मिळत नाही. ही वास्तविकता आहे. शेवटी ते धन मिळवून देणाराही पैसे ऐंठून मोकळा होतो.
आज अशीच अंधश्रद्धा पसरत आहे. निसर्गाच्या चमत्कारावर आम्ही विश्वासच करीत नाही. विश्नास करतो माणसाच्या अनैतिक चमत्कारावर. जो चमत्कार आपल्याला गुन्हेगार बनवू शकतो.
निसर्गाची माया अफाट आहे. त्यावर विश्वास केलेला बरा. कारण निसर्ग हा आपला तारणहार आहे. पालनहारही आहे. यासाठीच यात्रा करावी लागते. त्यातच तो देव नसला तरी त्याला देव संबोधले जाते. पाऊस न आल्यास धावा केला जातो आणि जास्त पाऊस आल्यासही धावा केला जातो. आज निसर्गशक्ती एवढी बळकट आहे की ज्यावेळी पुरस्थिती निर्माण होते. तेव्हा मोठमोठ्या इमारती वाहून जातात. अशा स्थितीत एक तणाचं झोपडं शिल्लक राहातं. आहे ना चमत्कार. मागे बद्रीनाथ केदारनाथला पूर आला. सारं वाहून गेलं. परंतू त्या बेलपिंडीवरील ते बेल चिकटून राहिलं. हा चमत्कारच नाही का?
नागद्वारलाही असाच चमत्कार आहे. त्या उंच उंच टेकड्या. त्यातच त्या टेकड्यावरुन पायी चालणारी ती माणसं. त्या टेकड्या नागाच्या आकाराच्या असून ती माणसं त्या नागाच्या फण्यावरुन चालतात. परंतू ती दगडं कोसळत नाहीत. वा भक्ताला कोणत्याही स्वरुपाची इजा होत नाही. अनहोनीचंही स्थळ असंच आहे. अनहोनीचं स्थळ म्हणजे बाजूलाच गरम पाणी आणि बाजूलाच थंड पाणी.
महत्वाचं म्हणजे माणसानं नवनवीन शोध लावले. तंत्रज्ञान विकसीत केलं व विकसीत करीत आहे. परंतू त्या तंत्रज्ञानापुढं निसर्गाची हार दिसत नाही. माणूस कितीही पुढे जाईल. परंतू निसर्गाला जिंकू शकत नाही. निसर्ग फक्त परीक्षा पाहात आहे माणसाची. हं, माणूस कुत्रीमतेनं बटाट्याच्या झाडाला टोमैटो लावू शकतो. परंतू तसा स्वाद देवू शकत नाही. माणूस मशिनीनं जमीनीला छिद्र पाडू शकतो खुप खोलवर. परंतू ज्या जागेत पाणीच नाही. त्या जागेवर कितीही खोल मशिनद्वारे छिद्र पाडलं तरी पाणी मिळवू शकत नाही. असं चर झालं असतं तर भुस्खलन, भुकंप यावर विजय मिळवता आला असता. अवकाळी येणा-या पावसाला रोखलं असतं, तसेच न येणा-या पावसालाही बोलावलं असतं. माणूस हे साध्य करु शकतो. कारण तो हूशार आहे. तो नवनवीन शोध लावत आहे. कारण थोडंसं टच करुन माणूस एका जागेवरुन सर्व जगाची माहिती मिळवीत आहे. कारण माणूस हतबल नाही. परंतू माणसानं हेही लक्षात ठेवावे की हे जेव्हा संपुर्णतः साध्य होईल. तेव्हा ही सृष्टीच राहणार नाही. हिचा विनाश होईल. भुस्खलन, भुकंप आणि पुुुराच्या त्सुनामीच्या माध्यमातून. कारण माणूस कितीही तंत्रज्ञान विकसीत करीत असला तरी माणूस हतबल आहे. निसर्ग नाही. हेही तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button