बुद्ध क्रांतीची विल्हेवाट व दलितांचे हिंदुकरण!
बुद्ध क्रांतीची विल्हेवाट व दलितांचे हिंदुकरण!
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी संपुर्ण हयातभर अविश्रांत जन जागृती करून माणुसकीची जाण आणली. स्वाभिमान शिकविला. माणूस म्हणुन जगण्यास मन तयार केले. ज्या व्यवस्थेने मानुसपण नाकारले तिची शव चिकिस्ता करून नविन जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. सतत सामाजिक लढे उभारून अन्याय रूढी विरूद्ध संघर्ष केला. व्यवस्थेपुढे आव्हान उभे केले. ज्या ग्रंथांनी मानसाला पशुवत जगणयास बाध्य केले त्या ग्रंथाचे जाहीर होळी करून करून तो धर्मच नाकारला. नविन जीवन मूल्य समता,स्वातंत्र्य,बंधुत्व,न्याय, प्रज्ञा, शील,करूना, या जीवन मुल्यावर आधारित धम्माचे१४/१०/१९५६ला सार्वजनिक रीत्या अनुसरण केले. बुद्ध धम्म स्वीकारला आपल्या लाखो अनुयायांना धम्माची दीक्षा दिली. नवीन दृष्टी नवचेतना निर्माण केले जुन्या धर्माच्या सर्व परंपरा नाकारून घरातील देव, देव्हारा गावकुसाबाहेर फेकले. म्हणून लोक माणूस म्हणून जगण्यास प्रवृत्त झाले. गुलामी झिडकारली नविन परंपरांची सुरुवात केली. नविन बुद्ध विहाराची उभारणी करून नव सकृतिची निर्मिती केली. पंचशीलेचे पालन करण्याकरिता घरातील कोंबडे बकरे पाळणे सुद्धा बंद केले. जो कोणी घरी कोंबडे बकरे पालन करील त्यांच्यावर सामाजिक दंड बसविण्यात येत होता. एकमेकाना अभिवादन करताना जयभिम चा उच्चार करीत. नविन जीवनपद्धतीचा अंगिकार केला. गरीब असु दे पण स्वाभिमानाने जगण्यास सुरुवात केली. दोन संस्कृती निर्माण झाल्या. एकपारपारिक हिन्दु व्यवस्थेने दिलेली संस्कृती व बुद्ध धम्माची आंबेडकरांनी दिलेली नव संस्कृती एक संस्कृती विषमता गुलामी निर्माण करणारी तर दुसरी समता स्वातंत्र्य बंधुभाव निर्माण करणारी.
गाव तिथे पंचशिलेचा झेंडा निळा झेंडा उभारला जाऊ लागला.डा बाबासाहेब आंबेडकर व भगवान तथागत गौतम बुद्धांचे पुतळे उभारुन आपली ओळख निर्माण केली. पुतळे उभारून नविन प्रतीमा समाजा समोर उभी केली. पोलादी संघटना व त्यात जीवास जीव देणारे सर्वस्व अर्पण करून संघटनेकरिता राबणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण झाली. नव संस्कृती साठी लढणारी लढाऊ संघटना होऊन गुलामीत पडलेल्या समाजात नवजीवन जगण्याची आशा निर्माण झाली. ही नवी आंदोलनाची अशीच घोडदौड सुरू राहिली तर लवकरच हिन्दु जीवन पद्धतीला व त्यांच्या धर्माला आव्हान उभे होऊन ती नष्ट होते की काय? ही भिती निर्माण झाली. ते भयग्रस्त जीणे जगु लागले. त्यांनी आपल्या गुलामा करवी वर्णव्यवस्थेनुसार शुद्र गणल्या गेलेल्या इतर मागास वर्गीय बहुजन समाजाला सुलवणे सुरू केले. त्यांच्या भुंकण्यास भिमसैनिकानी भिक घातली नाही. त्यांच्या कमरडयात लाथ घालुन कु कु करणयास भाग पाडले.अनेक संघर्षास तोंड दिले. ब्राह्मणी व्यवस्था षडयंत्र रचनेची तयार करीत होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिक्षा दिल्यानंतर केलेल्या भाषणात बुद्ध धम्मात अनेक गडुळ पाणी साचले आहे. त्याला नाली करून ते साफ करायचे आहे म्हणजे पारंपारिक बुद्ध धम्मात अनेक संप्रदाय निर्माण झाले त्याला नाकारून नवीन बुद्धधम्माचे अंगीकार करण्याची घोषणा केली त्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाची निर्मिती केली. ज्या चमत्कारी गोष्टी आहेत त्याला बगल देऊन वस्तुनिष्ठ कारणमीमांसा केली. मानवाला विवेकपूर्ण, बुद्धिनिष्ठ, वैज्ञानिक पद्धतीने जगण्याची नवीन दृष्टी दिली तर्कावर आधारित बुद्धीच्या कसोटीवर खरी उत्तरणारीच बुद्धाची वाणी ठरते ही नव जाणीव करून दिली.
कमजोरी हेरली!
नविन जीवन मूंल्यावर आधारित व्यवस्था आकार घेत होती. परंतु अल्पावधीतच डॉक्टर आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. आंदोलन रुपी वादळाला घाबरलेली ब्राह्मणी व्यवस्था सावरून तिचे लचके तोडण्यास सज्ज झाली. अपरिपक्व, स्वार्थी, सत्तालोलुप, स्वाभिमान शुन्य अशांना शोधुन ह्या पोलादी संघटनेला कमजोर करण्यासाठी षडयंत्र रचुन आपले जाळे पसरविले. त्यात अडकलेल्यां मोहरकयाला आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना सत्तेचे गाजर दाखवून त्यांना संघटना फोडण्यास प्रवृत्त केले तत्वनिष्ठ, चारित्र्यवान,बुद्धीवादी असणार्या कार्यकर्त्यांना पक्षाबाहेर जाण्यास बाध्य केले. त्यांच्याविषयी समाजात अनेक प्रकारचे गैरसमज पसरवून त्यांची बदनामी केली त्यांची प्रतिमा मलीन केली समाज बहिष्कृत करण्यास समाजास प्रवृत्त केले हि पोलादी लढाऊ संघटना त्यांच्या दावनीला बांधली. चळवळीतुन जो वचक निर्माण झाला होता. संस्कृतीला पर्यायी संस्कृती देऊन सांस्कृतिक लढ्यास प्रारंभ झाला होता. तो कमी करून त्यात समझोता करण्याचे वातावरण तयार केले. संस्कृती विरोधी लढ्याची गती कमी केली
ब्राह्मणी व्यवस्थेने पुढाऱ्यांना आपल्या मंचावर बोलावून त्यांचा गौरव करून लढाईची तीव्रता कमी केली.
डाॅ.बाबासाहेबांनी दिलेल्या बाविस प्रतिज्ञेचे पालन होत नाही. तर परत हिन्दु सण साजरे करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे समाजात जो वचक होता तो कमी झाल्यामुळे समाजातील लोक आपल्या पद्धतीने वागण्यास मोकळे झालेत. गणपती सार्वजनिक पणे बसवून त्याची पुजा केली जाते. देवीचा घट बसविला जातो. तेच लोक आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करण्याचा दावा करतात. बुद्ध विहार परिवर्तन चळवळीचे केंद्र व्हायला पाहिजे असे डॉक्टर आंबेडकरांची इच्छा होती. बौद्ध भिक्षू हा पूर्णवेळ समाजसेवक बनवून त्यांनी बुद्ध धम्म क्रांती च्या गाडीला तीव्र करावे परंतु आज बुद्ध विहार गटबाजी राजकारणाचे केंद्र बनत आहेत प्रत्येक गोष्टीतून सत्ता व संपत्ती मिळविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे सत्ता संघर्षासाठी त्याचा उपयोग केला जातो राजकीय पक्षात अनेक गट निर्माण झाली त्याच प्रमाणे बुद्धधम्म चळवळीत सुद्धा तट पडलेले आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे भांडण सुरू आहेत तिची शकले झाली आहेत. बुद्ध भिक्षु यांची सुद्धा एकसंघता नाही. परित्राण पाठा सारखे कार्यक्रम घेऊन समाजाला पुन्हा पूजा पाठात गुंतविण्याचे काम सुरू आहे त्यांना धार्मिकतेत गुंतवून त्यांच्यातील क्रांतिकारित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाबासाहेबांनी व्यवस्था परिवर्तनाचा लढा तीव्र केला होता. त्याला स्थगिती देऊन त्यांची गती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. शिक्षण हे सुद्धा मध्यम श्रीमंत लोकच घेऊ शकतात. गरीब माणूस ह्या शिक्षण स्पर्धेत मुलाला उतरवू शकत नाही त्यांच्याबद्दल कोणतीही ही ओरड केली जात नाही तर जे सुसंपन्न आहेत. त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी आंदोलन केल्या जात आहेत. त्याला सर्वांच्या उन्नतीचे आंदोलन असे नाव दिले जात आहे. बुद्ध धम्म हा भटक्या आदिवासी समाजात पोहोचला पाहिजे. त्यासाठी मिशनरी कार्य सुरू केले पाहिजे बुद्ध विहारात ह्यसाठी योजना तयार करून त्या कार्यान्वित केल्या पाहिजे तरच बुद्ध धम्म चळवळीला गती येईल लोकांचे प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे जो शोषित समाज आहे त्याची मुक्तता झाली पाहिजे जो दुखी आहे त्याचे दुःख निवारण करून त्यांना जगण्याचा मार्ग दिला पाहिजे समाजात पसरलेली अंधश्रद्धा नष्ट करून समाजाला डोळस करणे आवश्यक आहे. धम्मचक्र प्रवर्तनाचे कार्य गतीशील करणे आवश्यक आहे. यासाठी सातत्याने चळवळ सुरु असणे आवश्यक आहे. समाजात नैराश्याचे वातावरण आहे. तरूण मुलं चंगळवादात फसत आहे. आरक्षणामुळे अनेक लोकाना सत्तेत प्रशासनात मोठं मोठी पदे मिळाली आहेत.त्यामुळे संपत्ती जमा झाली आहे. त्या संपत्तीचा समाजाचा स्थर उंचावण्यासाठी खर्च करून प्रयत्न झाला पाहिजे. परतु चैनीच्या वस्तू खरेदी करून पैसा ऐष आराम व चैन करण्यात खर्च केला जातो. ज्या समाजाच्या बलीदानामुळे पदे उपभोगीत आहेत . त्या समाजाचा विसर पडतो.
ही जागृती नाही!
राष्ट्रिय सेवक संघाचे लोक कितिही मोठे झाले असतील. मोठया पदांवर असतील तरी ते संघा प्रति समर्पित असतात. गुरुदक्षिणेच्या नावाने गुप्तदान करीत असतात विषमतावादी संघटना वाढण्याचे हे एक कारण आहे निस्वार्थी समर्पित कार्यकर्ते असल्यामुळे त्यांचे संपूर्ण भारतभर जाळे पसरले आहे. फुले-आंबेडकरी चळवळीत वरील गोष्टीचा अभाव आहे त्यामुळे बहुसंख्यांनी असून सुद्धा ते कमजोर आहेत ब्राह्मणी गुलामी पक्की होत आहे विषमतावादी सर्वच फळ्यावर आक्रमक आहेत. तर फुले आंबेडकरी चळवळ फुटीरते च्या शापामुळे विभाजित आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होत आहे त्याची जाणीव समता वाद्यांना होणे अत्यंत गरजेचे आहे.
सांस्कृतिक दृष्ट्या विषमता वादी समाजात नवनवे प्रयोग करून समाजात एकता निर्माण होऊ देत नाही. तर जातीय उतरंडीचा फायदा घेऊन एकमेकांना विभक्त ठेवित असतात. मूर्ती प्रतिष्ठापना देवळात पूजन भजन-कीर्तन यासारखा मारा सुरू आहे. पुर्वी देवी फारच कमी ठिकाणी बसविली जात होती. आता त्याचे सार्वजनिकरण करून मोठ्या प्रमाणात देविचा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी राष्ट्रिय सेवक संघाचे प्रशिक्षित कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. धार्मिक उत्सव साजरा केल्यामुळे धार्मिक भावना पक्क्या होत असून एकदा तो धार्मिकतेत गुंतला की त्यात तो अडकून पडतो गुलामिच आपले जीवन समजतो. आजच्या तरूणाला मोठ्या प्रमाणात ह्यात गुंतविले जाते. विषमतावादी संस्कृती, ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी कार्य आयोजित करून समाजाला नादी लावल्या जाते त्यामुळे आपोआपच ह्या संस्कृतीचे रक्षक तयार होतात समतावादी संस्कृतीचे लोक विभाजित असल्यामुळे त्यांचा प्रभाव समाजात कमी दिसून येतो ही संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ह्यादृष्टीने विचार करून समतावादी संस्कृतीचा लढा तीव्र होईल ही अपेक्षा करूया.
विनायकराव जामगडे मो. ९३७२४५६३८९, ७८२३०९३५५६