Travel

यात्रा करू नये!

यात्रा करु नये!

यात्रा……..सध्या यात्रेचं खुळ चर्चेत असून यात्रेला जास्त महत्व आलं आहे. त्या माध्यमातून आत्मीक बळ वाढत असलं तरी अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. कोणी पंढरपूर यात्रा तर कोणी बद्रीनाथ केदारनाथच्या यात्राही करीत असतात. तसेच कोणी कैलासमानसरोवर, अमरनाथ नागद्वार आणि महादेवाच्या यात्रा करीत असतात. यात्रेनुसार जत्रेलाही जास्त महत्व आलं आहे.
पुण्याच्या भागाचा विचार केल्यास तिथे असलेल्या जेजूरी देवस्थानाला भेट देण्यासाठी लोकं अवश्य जातात. देवस्थानाबाबत व यात्रेबाबत कोल्हापूरला असलेल्या महालक्ष्मीचा जास्त उदोउदो होतो. त्यातच तुळजापुरची भवानीदेवी. ती तर शिवरायांचं आराध्य दैवतच ठरली. याशिवाय विदर्भात असलेली माहूरची रेणूका, अमरावतीची अंबा, नागपूरची भवानी व कोराडीची जगदंबा ह्या देव्या सुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत.
देशात विदेशात केवळ देव्याच प्रसिद्ध आहेत असे नाही. तर पंढरपूरचा विठ्ठल महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानलं जातं. तसेच लोकं दरवर्षी दिवाळीच्या दिवशी शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनालामजातात. त्यातच शनिशिंगणापूरच्या शनिमुर्तीचंही दर्शन करतात. तसेच ते जर विदर्भातील असतील तर शेगावच्या गजानन महाराजाचं दर्शन घेवून परत येतात.
हे महाराष्ट्रातील देवस्थान……..कोणी गणपतीपुळेला जावून गणपतीचंच नाही तर तिथे असलेल्या समुद्राचंही दर्शन घेतात. इथे असलेला समुद्र हा उभाट असून त्याच्या लाटा पाहण्यासारख्या आहेत. यात्रा करण्यात केवळ हिंदूच समोर नाहीत तर मुस्लिम समुदायही पुढं आहे. कोणी मुंबापुरीच्या हाजीअलीलाही जातात. तर कोणी नागपूरच्या ताजबागला आवर्जून येत असतात. कोणी मक्का मदिनालाही जातात. यात ख्रिश्चन समुदायही मागे नाही. नाताळच्या दिवशी आवर्जून गोव्याच्या चर्चमध्ये गर्दी असते. तसेच बौद्ध बांधवही मुंबईच्या चरेचगेटला तसेच नागपूरच्या दिक्षाभुमीलाही आवर्जून भेट देत असतात. अलिकडे नागपूर जिल्ह्यातील ड्रगन पैलेसलाही महत्व प्राप्त होत आहे. यात्रेचा विचार केल्यास भीमाशंकरचा ज्योतिबाही काही मागे नाही.
यात्रा…….यात्रेला जाणे म्हणजे भाविकांचे श्रद्धेचं स्थान. त्यांची खुप मोठी श्रद्धा असते. म्हणून लोकं यात्रेला जात असतात. कोणी लांबच लांबचा प्रवास पायी करीत असतात. त्याला विठ्ठलाच्या भाषेत वारी म्हणत असतात. अशी यात्रेला जाणारी माणसं काही कमी नाहीत. त्यातच ज्या लोकांच्या जास्त यात्रा झाल्या ती मंडळी आवर्जून अभिमानानंर सांगत असतात की माझ्या एवढ्या यात्रा झाल्या. माझ्या तेवढ्या यात्रा झाल्या. त्यातच या यात्रा करणा-या मंडळींना देव मानून ते परत येताच त्यांचा उदोउदो केला जातो.
यात्रेला प्रत्येक धर्मातच विशेष महत्व आहे. मग तो कोणताही धर्म का असेना. लोकं आपआपल्या श्रद्धेनं यात्रा करीत असतात. कोणी यात्रा करतांना त्या त्या देवावर प्रचंड विश्वास ठेवत असतात. त्यातच कधी कधी कावळा फांदीवर बसताच जशी फांदी तुटते. तसा काही चमत्कारही होतो. त्यातच त्या चमत्काराला त्या दैवतीकरणाचं स्वरुप प्राप्त होत.
यात्रेत हौसे, नवशे व गवसे जात असतात. हौसे म्हणजे जे चमत्कार मानत नाहीत. परंतू आनंदानं जातात. नवशे म्हणजे जे चमत्कार मानतात. त्यातच नवश करतात व नवशं पूर्ण करण्यासाठी अगदी आनंदानं जातात व गवसे म्हणजे जे मनात लहर आली तर जातात. ह्या गवसे प्रकारात काही आस्तीक व काही नास्तीक माणसांचा समावेश होतो. आस्तीक म्हणजे देवाला मानणारे व नास्तीक म्हणजे देवाला न मानणारे.
यात्रेबाबत विचार केल्यास पुर्वीही यात्रा होत असत. यात्रा ही परंपरा पुर्वापार चालत आलेली आहे. त्यातच पुर्वी जास्तीत जास्त लोकं नवश करायचे. ते नवशं पूर्ण होताच यात्रा करायचे. यात कोणी कोणी कोंबडं बकरंही कबूल करायचे. मग पुर्वी गाड्या नसल्यानं खाचर बंडीवरुन वा पायी यात्रा करायचे. आता मात्र साधनं निघालेली आहेत.
आताही नवशं कबूल केला जातो. कोणी कोंबड्या बक-याचा नवश करतात. परंतू देव काही बकरा, कोंबडा खात नाही. परंतू देवाला बदनाम करुन बिचा-या मुक्या जनावरांचा नाहकच जीव घेतला जातो.
यात्रेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास देशात सर्वात कठीण यात्रा नागद्वार व अमरनाथची मानली जाते. अमरनाथला बर्फावरुन चालत जावं लागतं आणि इथं पहाडावरुन. बरीच कमी मंडळी नागद्वारच्या यात्रा करीत असतात. परंतू ज्याचा भक्तीभाव आहे. तो नागद्वारची यात्रा अवश्य करतो. या नागद्वारच्या यात्रेत पहाडी चढणे व उतरणे असल्याने शरीरात जर वर्षभरात रक्तवाहीण्यात काही जंग चढला असेल अर्थात कोलेस्टेरॉल आला असेल, तर तो साफ करण्याचं काम होतं. कारण पहाडी चढण्या उतरण्यात पुर्ण अंगातील अवयव काम करीत असून रक्त सपाट्यानं धावत असतं. त्यातूनच असा पहाड चढण्यातून शरीरातील विषारी घटक घामाद्वारे शरीरातून बाहेर निघतात व शरीराला पुढील काळात असाध्य रोगापासून दूर ठेवलं जातं.
महादेवाच्या यात्रेतही अगदी तसंच आहे. महादेवाच्या यात्रेत पहाडी चढण्याची उतरण्याची योजना असल्यानं अशा यात्रा वर्षभरातून एक तरी करावी असं जनमताचं म्हणणं आहे. ज्याला असं पहाड चढणं जमत नाही ती मंडळी पंढरपूरसारख्या वा-या वा उजैनच्या महाकालच्या दर्शनाच्या कावडयात्रा करीत असतात. कित्येक मैलावरुन पायी पायी चालत जाणे. महत्वाचं म्हणजे पायी चालणे हा व्यायाम असून पुर्वजांनी त्यात भक्तीभाव टाकून त्याला यात्रेचं स्वरुप दिलं आहे. कारण माणूस केवळ बैठे काम करीत असे. तो पायी चालत नसे. आताही ब-याच ठिकाणी पायी चालायची सोय नाही. आजही काही मंडळी केवळ बैठे काम करीत असतात. त्यातच त्यांना वेगवेगळे असाध्य रोग जडलेले असतात. हे रोग होवू नयेे व शरीरातील रक्त वहन व्हावं व नेहमी धावतं राहावं, म्हणून पुर्वीच्या काळी राजेमहाराजे आपले राजवाडे उच टेकडीवरच बांधायचे. याचं कारण म्हणजे शत्रूपासून संरक्षण व स्वशरीराचं संरक्षण. ते महाराजे शरीरावरही विशेष प्रेमच करीत होते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
यात्रा……..ही यात्रा करीत असतांना त्या यात्रेत आपली सेवा करणारी बरीच मंडळी असतात. या मंडळीत काही मंडळी ही अतिशय गरीब असून ते कपाळावर टिळा वावण्याचं काम करतात. काही लिंबू पाणी विकतात. काही उकडलेली बोरं तर काही तळलेल्या पोपटच्या घुग-या, काही उकडलेले चणे तर काही शेंगदाणेही विकतात. काहीजण ताक आणि काहीजण मका, बाजरीच्या पोळ्याही विकतात. असे जिनश विकणा-या काही मुली ह्या आवर्जून नट्टापट्टा केलेल्या असतात. त्या मुली अतिशय अल्प वयात विवाह केल्यासारख्या मंगलसुत्र परीधान केलेल्या दिसत असतात. त्यातच काही कुवा-या मुली पार्वतीचा मेकअप करुन व वेष धारण करुन टिळा लावण्यासाठी रस्त्यारस्त्यावर उभ्या असतात. परंतू आम्ही भाविक यात्रा करतांना अशा तरुण मुलींचे आपल्यासोबत फोटो काढतो व ती आपली बायको आहे असे त्यांना चिडवून त्यांच्या मजबूरीचा फायदा घेत असतो. त्यातच काही लोकं शांपल म्हणून याच मुलींना दारु मागतात व माल अच्छा नही है म्हणत पुढची वाट धरतात व त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतात.
महत्वाचं म्हणजे तो भाग डोंगरावर असून तिथे पोळी भाजी वगळता खायला भरपूर मिळतं. ती मंडळी जंगलातील वेगवेगळे जिनस गोळा करतात व ते स्वतः न खाता आपल्याला चारतात आणि आपण त्यांच्या मजबुरीचा फायदा घेवून त्यांना लुबाडतो आणि हे विसरतो की ते आहेत म्हणूनन आपली यात्राही आहे. ते जर नसतील तर आपण त्या डोंगरद-यात बर्फाच्छादित प्रदेशात खरंच यात्रा करु शकू काय? याचा अर्थ नाही असा आहे.
विशेष म्हणजे आपण हे लक्षात घ्यायला हवं की ते आहेत म्हणून आपली यात्रा आहे. त्यामुळं त्यांच्या मजबूरीचा फायदा घेवून त्यांना आपण लुबाडू नये. आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म सपाट भुभागात झाला की ज्या भागात चांगलं आणि भरपूर पीकतं. पैसाही भरपूर मिळतो. त्यामुळं त्यांची मजबूरी नक्कीच विसरु नये. नाहीतर पुढील जन्मी आपलाही जन्म त्याच भागात होवून आपणही एक एक पैशासाठी तरसू. मग लोकंही आपला फायदा घेतील व क्या माल है, ये मेरी औरत है म्हणत आपल्यासोबत फोटो काढतील. त्याला व्हायरल करतील हे तेवढंच खरं आहे.
यात्रा……..यात्रेला अंधश्रद्धेचे स्वरुप येवो की अजून कोणते स्वरुप येवो, यात्रा महत्वाची. परंतू अलिकडे काही लोकांनी यात्रेला सडवलं आहे. नागद्वार किंवा महादेवाच्या यात्रा करणारी बरीचशी मंडळी दारु पीत चालतात. तसेच त्या दारुच्या नशेत घाण घाण शिव्याही देत असतात. हे काही बरोबर वाटत नाही. कोणाच्या मजबूरीचा फायदा घेणे हा गुन्हाच आहे हा मानवनिर्मीत गुन्हा असून तो मानवाच्या न्यायाच्या कक्षेत असला तरी त्या गुन्ह्यावर न्यायदेवता अंध असल्यानं बघत नाही. परंतू ही न्यायदेवता मानवनिर्मीत आहे, निसर्गनिर्मीत नाही. परंतू निसर्गनिर्मीत अशीही एक देवता आहे की जी त्सुनामी आणते. भुकंप आणते, दुष्काळ पाडते, ओला सुका आणि पहाडाचंही भुस्खलन करते. ती आपलंही पाप उघड्या डोळ्यानंच बघते. तेव्हा आपण हे लक्षात घ्यावं. त्या निसर्गदेवतेला थोडंतरी घाबरावं. नाहीतर ती निसर्गदेवता आपल्याच वस्तीत कधी भुकंप आणून वा कधी पूर आणून वा कधी असाध्य रोगाची महामारी आणून आपल्याला केव्हा नेस्तनाबूत करेल हे सांगता येत नाही. म्हणून वेळीच असा त्या निष्पाप जीवांचा फायदा घेण्यापुर्वी सावधान झालेलं बरं.कुणाची छेड न काढलेली बरी. अन् जर अशा कोणाच्या मजबूरीचा फायदाच घ्यायचा असेल तर यात्रा न केलेली बरी हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button