चित्रपट

शॉर्ट फिल्म (लघुपट) म्हणजे नक्की काय

शॉर्ट फिल्म (लघुपट) म्हणजे काय

शॉर्ट फिल्मची पक्की अशी एकच एक व्याख्या नाहीये. दोन तीन प्रचलित व्याख्या बघू म्हणजे याबाबत चित्र थोडे स्पष्ट होईल.

फिचर-लेन्थ फिल्मपेक्षा कमी लांबीचा चित्रपट म्हणजे शॉर्ट फिल्म अशी एक व्याख्या आहे. आता यासाठी फिचर-लेन्थ फिल्म हा शब्द आधी समजून घ्यावा लागेल.
फिचर या इंग्लिश शब्दाचा यासंदर्भात अर्थ आहे प्रमुख, मुख्य, महत्वाचा भाग, जास्त, इ. आणि फिल्म हा शब्द फिल्मस्ट्रीप पासून तयार झाला आहे. पूर्वी चित्रपटांचे पातळ प्लास्टिक सारख्या पदार्थाची रिबन सारखी उभी सलग पट्टी असायची, त्यावर चित्रपट छापलेला असायचा. त्याला मराठीत चित्रफीत म्हणतात. ती पट्टी लोखंडी रिळाला गोल गुंडाळलेली असायची, त्याला चित्रपट रीळ म्हणायचे. नंतर डिजिटल सिनेमा आला आणि रीळ इतिहासजमा झाले. पण फिल्म शब्द राहिला.
चित्रपटगृहात व्यावसायिक चित्रपट दाखवताना एक जास्त लांबीचा (कालावधीचा) मुख्य मनोरंजनपर कथात्मक (नॅरेटिव्ह) चित्रपट (फिचर-लेन्थ फिल्म) आणि त्यासोबत काही कमी लांबीच्या (कालावधीच्या) शॉर्ट फिल्मस् – बातम्या, डॉक्युमेंट्री, कार्टून फिल्म असे दाखवण्याचा प्रघात सुरु झाला. फिचर-लेन्थ फिल्म साधरणतः ८० मिनिट ते २१० मिनिट इतक्या कालावधीची आढळते.

दुसरी व्याख्या – ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट आणि ऑस्कर अवॉर्ड देणाऱ्या AMPAS या दोन संस्थेच्या व्याख्येनुसार जास्तीतजास्त ४० मिनिट कालावधीचा (सर्व टायटलसह) चित्रपट म्हणजे शॉर्ट फिल्म.

लो बजेट किंवा नो बजेट असलेली छोट्या विषयावरची कमी कालावधीची फिल्म म्हणजे शॉर्ट फिल्म अशीही व्याख्या आढळते, यातील ‘छोटा विषय’ हा भाग मला खटकतो कारण कथित छोट्या विषयावर फिचर-लेन्थ फिल्मही बनू शकते आणि मोठ्या विषयावरही शॉर्ट फिल्म बनू शकते.

व्यावसायिक फिचर-लेन्थ फिल्म या कथात्मकच (नॅरेटिव्ह) असतात, त्या सिनेमात काहीतरी कथा सांगितलेलीच असते. कथात्मक फीचर-लेन्थ फिल्म आणि कथात्मक शॉर्ट फिल्म यांच्यातील एक महत्वाचा फरक म्हणजे फिचर-लेन्थ फिल्ममध्ये एक मुख्य कथा आणि काही उपकथानके असतात, तर शॉर्ट फिल्ममध्ये फक्त एकच कथा असते, उपकथानके नसतात.

शॉर्ट फिल्म या कथात्मकच असतात असे नाही. कथेशिवाय पण शॉर्ट फिल्म्स असतात.

वरील व्याख्या पाहता, शॉर्ट फिल्मचे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे असतात –
१. कमी लांबी / कालावधी
२. लो बजेट किंवा नो बजेट
३. कथात्मक असेल तर एकच कथा असते आणि कथा सादर करताना वेगवेगळे प्रयोग केले जातात.
४. कथा असलीच पाहिजे असे नाही, कथेशिवायच्या अपारंपरिक पण शॉर्ट फिल्म्स असतात.

शॉर्ट फिल्मचे कालावधीनुसार खालील प्रमाणे उपप्रकार पडतात
१. मायक्रो शॉर्ट फिल्म – साधरणतः ५ मिनटांपर्यंतची फिल्म
२. शॉर्ट शॉर्ट फिल्म – साधरणतः १० ते २० मिनटांपर्यंतची फिल्म
३. मिडीयम शॉर्ट फिल्म – साधरणतः १५ ते ३० मिनटांपर्यंतची फिल्म
४. लॉन्ग शॉर्ट फिल्म – २५ ते ३० मिनिटांपेक्षा जास्त कालावधीची फिल्म

या उपप्रकारांचे कालावधी पण पक्के नाहीत, फिल्म फेस्टिवल्स नुसार हे कालावधी कमी जास्त असतात.

शॉर्ट फिल्ममध्ये डाक्युमेंट्री, ऍनिमेशन फिल्म्स यांचा पण समावेश होतो फक्त त्यांचा कालावधी कमी असणे गरजेचे असते.

– मितेश ताके, पुणे
9890601116

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button