राज्य

साहेब शिक्षणाला काहीतरी दर्जा आहे की नाही?

साहेब शिक्षणाला काहीतरी दर्जा आहे की नाही.?

मुख्यमंत्री साहेबांच शिक्षण कुठ पर्यंत झालेले आहे माहित नाही? पण या पावसाळी अधिवेशनात धक्कादायक निर्णय घेतला आहे तो म्हणजे दहीहंडी स्पर्धेत भाग घेणारे सर्व नोकर भरतीत 5 टक्के आरक्षणाचा लाभ घेणार आहेत. म्हणजे “शिक्षणाच्या आईचा घो” गरजच काय आहे अभियंता, मेडिकल डी एड, बीएड, नेट, बी बी ए, एम बी ए, बी ए, एम ए, एम एस्सी, ई.पदव्या घेऊन विविध स्पर्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस लाऊन लाखो रुपये खर्च करून नोकर भरतीची तयारी करण्याची फक्त भाग घ्या दहीहंडी स्पर्धेत आणि मिळवा नोकर भरतीत 5 टक्के आरक्षण. याचा निश्चितच लाभ फक्त नी फक्त मुंबई, ठाणेला मिळेल. मुख्यमंत्री साहेब तुम्हांला आरक्षण कसे देता येते याची तोंड देखली माहिती तरी आहे का? कुठून ५% कोटा निर्माण करणार.? गोविंदा असल्याचे सर्टिफिकेट कोण देणार? हे असले आरक्षण कोर्टात सोडा, विधि मंडळातल्या चर्चेत तरी तुम्हांला मान्य करून घेता येईल का?

नशीब आहे महाराष्ट्राचे की एवढी बुद्धिवान मुख्यमंत्री लाभले, काही दिवसांनी देशी जो जास्त घेतो त्याला आरक्षण दिल जाईल, हे राजकीय नेते आपल्या राजकारण्यांसाठी युवकांचा जीव पणाला लावून हे राजकारण करत आहेत.. खेळाचा दर्जा काय,पाच टक्के आरक्षण काय. कोण गोविंदा हे कोणी ठरवायचं. याना निर्णय घेण्याची एवढी घाई झाली आहे की यांची उद्या खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही. मी किती चांगला मुख्यमंत्री हे सिद्ध करण्याच्या नादात हे हास्यास्पद निर्णय घेत आहेत. या आरक्षणाची अंमलबजावणी होऊच शकत नाही. आता तुमचे ४०, आमदार आहेत त्यांना पण आजन्म आमदारकी देऊन टाका म्हणजे प्रश्नच मिटला.. अख्खा महाराष्ट्र आणि इतर आजूबाजूचे राज्य ह्या निर्णयावर हसत आहेत. उद्या उच्च शिक्षण घेणारे काय विचार करत असतील साहेब.. जर गोविंदांना आरक्षण देणार असाल तर पारंपरिक खेळाला पण आरक्षण द्यावे, मंगळागौर लपाछपी, सोंगट्या, गोट्या, विटीदांडू , सुर पारंब्या, आणि इतर खेळ रम्मी लुडो पब्जी जुगार या खेळांना सुद्धा सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा विचार सरकार करणार का.?

साहेब आमच्या पोरांना काय..शेवटी शिक्षणाला काहीतरी दर्जा आहे की नाही ?मग अभ्यास करणाऱ्यांनी काय करायचं? वर्षानुवर्ष स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्यांवर अन्याय नाही का होणार?आम्ही छडीचे फटके, दप्तराचे ओझे, क्लासेस लावून, आईवडिलांनी त्यासाठी कष्ट उपसून पदवीधर व्हायचे, इथे आमची मुलं रात्रंदिवस कष्ट करून डोळे फोडून अभ्यास करत आहेत त्यानी आरक्षणा अभावी आत्महत्या करावी का?मुलांना एवढे पैसे खर्च करून शिक्षण देणारे आम्ही वेडे का! काय तरी विचार करा आरक्षण देताना इकडं मराठा समाज आरक्षणासाठी तडफडत आहे त्यांचा आधी विचार करा, मराठा समाजाचे सरसगट ओबीसीकरण करा, ओबीसी समाजाची जातिय निहाय जनगणना करा, आणि मराठा समाजाला आरक्षण द्या.. सरकारी नोकरी साठी प्रयत्ना ची पराकष्टा करणारा मराठा समाज यामुळे अजून खोल दरीत लोटला जाईल आरक्षण नाही दिल्यावर….

मुख्यमंत्रीसाहेब आता शिक्षण घ्यायला नको का.कारण यांचे कार्यकर्ते बनायचे आणि गोविंदा बनायचे दहिहंडी दरवर्षी फोडायची मग सरकारी नोकरी मिळेल, जो पर्यंत चायवला व रिक्षावाले सरकार चालवतील तो पर्यंत पुस्तकं वाले घरीच बसतील.. दहीहंडी ला खेळाचा दर्जा देऊन मराठा बहूजन तरुणांची घर उध्वस्त करण्यापेक्षा राजकारण्यांची व दहीहंडी आयोजकांची मुलं शेवटच्या थरावर उभी राहिली पाहिजे असा कायदा बंधनकारक करावा. गोविंदा पथकांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे – भाजप सरकारने घेतला घेतलेला आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देणं हे एकवेळ समजू शकतो पण सरकारी नोकरी.?खरं तर वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांवर खऱ्या अर्थाने हा अन्याय आहे असं मला वाटतं कारण अनेक वर्ष अभ्यास करून कुठेतरी आपल्याला नोकरी मिळेल अशी विद्यार्थ्यांना आशा असते त्यात त्या जागा अशा प्रकारे इतर मार्गाने भरल्या जात असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं.? राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होताना दिसून येत आहे त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा.. आणि मराठा बहुजनांनो खेळा, हात पाय मोडुन घ्या, जिवन बरबाद करा, यांची पोर खासदार/आमदार बनवणार आणी गरीब सामान्यांची गोविंदा पथकात घालून मारणार.. गोविंदा असल्याचे सर्टिफिकेट कोण व कसे देणार ? या साठी पण पडताळणी समिती असेल का ? कितीही शिस्तबद्द खेळ असला तरी जीवघेणा आहेच हे नाकारता येत नाही. त्यामुळं ऎवढ्या सवलती देऊन तरूण पोरांना आकर्षक वाटावे म्हणून करत असाल तर एक लक्षात राहू द्या. यात कोनी मेला तर त्याची फक्त बातमी होते पण सगळा मनस्ताप हा घरातल्यांना सोसावा लागेल…
मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब…गोविंदा चे गेले वांदे.. कुरघोडी करा आता खांद्यावर खांदे.. जगण्याचे आता मिटले वांदे….

महाराष्ट्रात दरवर्षी ५% गोविंदाला सरकारी नोकरी? गोविंदा आहे की नाही कसं ओळखणार? काय निकष आहेत? की नुसत्या घोषणा?मुख्यमंत्री साहेब शाळा बंद करा. गोविंदा गोविंदा होण्यासाठी शिक्षणाची गरज नाही, लहान वयातच मुलं थर रचण्याचा सराव करतील.. शेवटी शिक्षणाला काहीतरी दर्जा आहे की नाही ? आम्ही छडीचे फटके, दप्तराचे ओझे, क्लासेस लावून, आईवडिलांनी त्यासाठी कष्ट उपसून पदवीधर व्हायचे आणि देश किंवा राज्य अशा लोकांनी चालवायचे म्हणजे शिक्षणाचा घोर अपमान आहे आणि शिक्षणाच्या आईचा घो च की…
✍️ शिवश्री संतोषबादाडे
जिल्हाध्यक्ष पुणे 9689446003
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,
महाराष्ट्र राज्य… 💐❣️🤝

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button