व्यक्तिविशेष

इंजि.प्रशांत इंगोले नव्या पिढीतील नेतृत्वाचा जाणीवगर्भ वाटसरू ..

इंजि.प्रशांत इंगोले..
नव्या पिढीतील नेतृत्वाचा जाणीवगर्भ वाटसरू ..

मानवी बदलाचे कारण विचार असतात.विचार फलश्रुती देतात आणि भ्रमनिराशाही. विचार जगण्यातील उमीद असतात आणि उन्मादही. म्हणून जीवनाच्या प्रवासात सम्यक विचार अधिक महत्वपूर्ण असतात.संघर्ष हा निसर्गाचा भाग आहे.त्यामुळे सृष्टीतील प्रत्येक जीवांचा संघर्ष हा अटळ आहे. जीवन जगत असतांना आपल्या दिशा नेहमीच स्पष्ट असायलाच हव्या.बहुतांश माणसे जीवनातील असंख्य दिशा चाचपळतील पण जेंव्हा संघर्षाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मात्र तिथे काडीमोड करण्यात धन्यता मानतात. मात्र गेली वीस वर्षांपासून आपल्या जीवनाच्या दिशा स्पष्ट करत अविरतपणे संघर्ष करणाऱ्या नांदेडच्या पटलावरील सामाजिक,राजकीय,धार्मिक,सांस्कृतिक नेतृत्वाचं नाव म्हणजे इंजि.प्रशांत इंगोले हे होय.कोणतेही नेतृत्व तेव्हाच पुढं येते जिथे न्याय, हक्क अधिकाराची वजावट परिस्थिती निर्माण होते.प्राथमिक, माध्यमिक ते इंजिनिअरिंगचे एम. टेक पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या या उच्यशिक्षिताचा नेतृत्ववादी प्रवासही अशाच वजावट प्रसंगातून उदयास आला.सुरुवातीच्या अकरावी बारावीच्या महाविद्यालयीन जीवनात डॉ.बाबासाहेब हे आपल्या जातीतील आहेत आपले महापुरुष आहेत येवढ्यापुरतेच माहीत आसताना बाबासाहेब काय असतात? त्यांचे विचार काय आहेत? आपल्या जीवनात त्यांचे काय महत्त्व आहे? या सगळ्या गोष्टीपासून ते अनभिज्ञ होते. पण पुढे चालून डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनिरिंग असोसिएशनचे शाखा अध्यक्ष असताना त्यांनी आयुष्यातील पहिली भीम जयंती इंजिनिअरिंगचे शिक्षण चालू असतानाच केली.तिथूनच डॉ.बाबासाहेब हे केवळ कला शाखेतील अभ्यासाचे भाग नाही तर आपल्या जीवणाचाच भाग आहेत ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे आपसूकच डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचाय लागले, समजाय लागले. त्यातून संविधान,न्याय ,हक्क अधिकार,शिक्षण , चळवळ या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होऊ लागला. आणि तत्कालीन वास्तव परिस्थिती म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अनंत अडचणी शिष्यवृत्तीचे प्रश्न,बजेट कमी असणे,वसतिगृहातील सोयी सुविधा या सगळ्या हक्काच्या पण वजावटीच्या प्रसंगातूनच त्यांच्यातील नेत्रत्व पुढे विकसित होत आलं.राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी याच सगळ्या गोष्टींची दखल घेतली आणि ज्या भीम शक्ती संघटनेचा दबदबा,लौकिक आणि समाजातील घटकांना न्याय देण्याची जी पद्धत आहे.आशा भीम शक्ती विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. महत्वकांक्षी माणसाला एक एक संधी हवी असते म्हणजे ते स्वतःला सिद्ध करतील पण इंजि.प्रशांत इंगोले यांनी ही संधी निर्माण केली. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी जेव्हा दर्जेदार शिक्षणाच्या ध्येयाने शहरात येतो पण या सगळ्या बाबतीतुन तो अज्ञान असतो आणि विशेषतः तत्कालीन परिस्थितीत आजच्या सारखी मोबाईल,इंटरनेट, या सारख्या प्रगत साधन संसाधनांचा अभाव होता त्यामुळे केवळ कुणाच्या नावाने एक चिठ्ठी घेऊन जायचे असा हा काळ होता.यात विद्यार्थ्यांचे ऍडमिशन ,वसतिगृह,भोजन या सगळ्या येणाऱ्या अडचणी सोडवताना विभागीय अधिकाऱ्यांना कोंडून घेण्याच्या प्रकारातही प्रशांत इंगोले यांचा सहभाग होता. या सगळ्या बाबतीत स्वतःला झोकून देऊन काम केले.
शालिनी पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी वाईट वक्तव्य केले त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी केलेला रास्ता रोखो यामुळे त्यांच्यावर व इतर २१ जनावर गुन्हा ३५३ चा नोंद झाला .पण समाजातील काही प्रतिष्ठित चळवळीच्या माणसांनी त्यांची बेल करून घेतली.त्यानंतर हेच आंदोलने, मोर्चाचे प्रकार अधिक गतीने वाढत गेले. एका मातंग समाजातील सरपंच महिलेला जात पडताळणीसाठी केवळ पन्नास रुपयांसाठी केल्या जाणाऱ्या अडवणुकीसाठी जाब विचारला असता शासकीय कामात अडथळा म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ताळेबंदीच्या पूर्वी राज्याचे सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणातील दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद केली असता या विरोधात धनंजय मुंडे यांचा पहिला पुतळा जाळण्याचे काम प्रशांत इंगोले या जाणीवगर्भाने केले आणि सांगून दिले की अनुसूचित विद्यार्थ्यांना दिली जाणारी परदेशी शिष्यवृत्ती जर बंद केली गेली तर नुसते नांदेडच काय उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचे पुतळे जाळण्यात येथील. या घटनेचा पडसाद असा आला की, लगेच संध्याकाळी दुसऱ्या दिवशी हा निर्णय माघे घेण्यात आला.भीम शक्ती संघटनेच्या माध्यमातून कानपूर येथील घटना,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची घटना आशा अनेक घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको ,मोर्चा, आंदोलने मोठ्या प्रमाणात वाढले. प्रशांत इंगोले या व्यक्तिमत्वाला सामजिक जाणीव आहे.करूण मनाचा हा माणूस सामजिक,राजकिय, धार्मिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक कार्यात नेहमीच हिरेरीने सहभागी नोंदवतो. प्रशांत इंगोले असे म्हणतात की, स्मशानभूमीचे प्रश्न,दलित वस्तीचा निधी या संदर्भात शासनस्तरावरून नेहमीच गैरवापर केला जातो.त्यामुळे यावर कोणी बोलायला तयार नसताना एकूण बजेटच्या २०टक्के वाटा हा अनुसूचित जाती व जमातीचा घटनात्मक वाटा असल्याने आमचाच निधी आम्हाला देऊन इथले खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी हे श्रेय घेतात.नांदेड महानगरपालिकेतील दलित वस्तीचा निधी दलित वस्त्यातील रस्त्यासाठी खर्च करावा मुख्य रस्त्यासाठी अन्य निधी वापरावा ह्या कळीच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित झाले पाहिजे अशीही त्यांची नेहमी भूमिका राहिली आहे.आपण सामजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यासोबत काम करत असताना एक वेगळीच ऊर्जा आपल्यात होती.ज्या अर्थाने त्यांनी शिक्षण आणि विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेऊन फाईव्ह स्टार दर्जाचे वसतिगृह निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. तसेच मागासवर्गीय तरूण नोकरीच्या माघे न लागता उदयोग व्यवसायाकडे वळला पाहिजे यासाठी अनेक तरूणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्यामुळेच आणि हा पुढील तीस वर्षाचा बदल आजच झाला असल्याने त्यांना प्रस्तपितांनी सत्तेपासून वंचित ठेवले आहे .आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकजण हा प्रतिभावंत असून शोकांतिका एकच आहे की एक आंबेडकर दुसऱ्या आंबेडकरांचे ऐकत नाही,आंबेडकर चळवळीत नेमकी रचनात्मक बांधणी नाही.आपण केवळ इव्हेंट पुरतेच एकत्र येतो ,पेटून उठतो पण नंतर एकमेकांना विचारतही नाही.या बाबीचे चिंतन प्रशांत इंगोले नेहमीच वदवून दाखवतात. स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवातही आपण सत्तेपासून वंचित असून स्वाभिमानी प्रतिनिधी आजपर्यंत सभागृहात गेलेच नाहीत.जे अनुसूचित जातीच्या आरक्षणातून निवडून जातात ते लोक कधी अनुसूचित जातीच्या प्रश्नावर न बोलता दुसऱ्याच्या दावणीला बांधले जातात.राजकीय चळवळीपेक्षा शैक्षणिक ,सांस्कृतिक चळवळ महत्वाची आहे. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता हा आर्थिक सक्षम असला पाहिजे. दर रविवारी विहारात एकत्र येऊन विचार विनिमय केले पाहिजे.आपलेच प्रश्न हे आपणास एकत्र येऊन सोडविले पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांना पार्लमेंट्री भाषा समजते.त्यांचे नेतृत्व स्वाभिमानी असल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची नितांत गरज असल्याचेही प्रशांत इंगोले म्हणतात. आज घडीला नांदेडच्या सामाजिक,राजकीय,धार्मिक, सांस्कृतिक घडामोडीमध्ये इंजि.प्रशांत इंगोले हे नाव प्राधान्य क्रमाने पुढे असते.मितभाषी ,संवेदनशील मन असणाऱ्या या माणसांचा प्रचंड जनसंपर्क असून .वेळ काळाच भान न ठेवता लोकांच्या मदतीला धावून जाणे ,गोर गरीब,गरजू,विद्यार्थ्यांना, दान,व त्या त्या स्वरूपातील मदत करून अडचणी दूर करणाऱ्या या माणसाने आपल्याला कार्याला जगासमोर दाखवण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. तर अशी अनेक कार्य ते हिडन वर्क स्वरूपात करतात हे त्यांचे एक विशेष वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कार्याचा बोभाटा न करता आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता जेवढे जे शक्य आहे ते ते काम करणाऱ्या या माणसाने नांदेड जिल्ह्यातील अनेक लोकसमूहाच्या मनात घर निर्माण केलेल्या या माणसांचे नांदेड शहरातील विविध परिजणांनी व्यापलेलं त्यांच संपर्कातील कुटुंब हे त्यांच्या लौकिकार्थाची साक्ष देतो. दान परमिता ही कशा पद्धतीने आणि किती मोठ्या मनाने करावी ही खास बाब त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. अगदी लॉक डाऊनच्या काळात नेमकाच लॉक डाऊन लागला आणि नांदेडमध्ये असलेला एक मोठा विद्यार्थी वर्ग संकटात सापडला मेस बंद सगळच बंद त्यात रूमच्या बाहेर पडणे अशक्य झाल्याची परिस्थिती लक्षात घेता आशा विद्यार्थ्यांना व गरजूंना आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवून नांदेड घरपोच अन्नदान करणाऱ्या या माणसांनी बरेच दिवस या विद्यार्थ्यांना या संपूर्ण काळात मोठा आधार दिला. कारण भुकेचा प्रश्न मोठा असल्याने यावेळी संचारबंदीच्या काळात एकही भूकबळी गेला तर जिल्हा प्रशासन जबाबदार असेल अशी ताकीद दिली असता याची गांभीर्याने दखल घेऊन मोठ्या वृत्तपत्रांनी इंजि.प्रशांत इंगोले यांच्या या भूमिकेला प्रशासनासमोर मांडले आणि तेव्हा कुठे कोरोनाच्या नावावर जनसामान्यांचा होणारा कोंडमारा थांबत गेला.अशा अनेक कार्यांचा उल्लेख करताना इंजि.प्रशांत इंगोले हा उमीदपूर्ण भरलेला आशावाद दिवसेंदिवस विस्तारत चाललेला आहे.त्यांच्या सुस्वभावातुन अनेक माणसांचा जोडला जाणारा हा कारवा म्हणजे त्यांच्यातील नेतृत्वगुण, संघटन कौशल्य,प्रत्येक घटनेचा बांधता येणारा अचूक अंदाज,दूरदृष्टी, आणि सर्वप्रकारच्या जाणिवेतून उभा राहिलेला विस्तारपट होय.आशा या नव्या पिढीतील सर्व प्रकारच्या जाणीवगर्भ नेतृत्वाच्या वाटसरूस जन्म दिनाच्या हार्दिक मंगल कामना व यशोशिखराच्या संपूर्ण वाटा उत्तरोत्तर विस्तारत जावो हीच सदिच्छा…!

-मनोहर सोनकांबळे
8459233791
( संशोधक विद्यार्थी, माध्यमशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button