गर्द काळोखात उजेड पेरण्यासाठी- एक आकलन
गर्द काळोखात उजेड पेरण्यासाठी- एक आकलन
इ. स. 1960 नंतर दलित साहित्य उदयाला आले. त्याच प्रामुख्याने कथा कविता आणि आत्मचरित्र यांना प्रमुख स्थान आहे .त्यामुळे हा कवी दलित कवितेतील एक आक्रमक आविष्कार आहे. या कवीचे भावविश्व एका वेगळ्या प्रकारे निर्माण झाल्याने जगण्याचे प्रचंड सामर्थ्य घेऊन जाणिवांच्या पातळीवर संयम, धैर्य, मानुषता, सडेतोडवृत्ती आणि अन्याय- अत्याचार विरुद्ध बंड करीत ही कविता शाश्वत सत्या जवळ जाते. साध्या आणि सोप्या पण गंभीर वृत्तीच्या कवितेचे हे एकमेव वैशिष्ट्य आहे .
संदीप गायकवाड हा कवी एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पिढीचा प्रतिनिधित्व करणारा एक दमदार कवी आहे .दलित कवितेचा वारसा चालवणारा कवी आहे .त्यामुळे या कवीचा काव्यसंग्रह सर्वसामान्य दलित माणसाच्या वेदना, आक्रोश आणि यातना एकाच वेळी व्यक्त करणारा एकमेव काव्यसंग्रह आहे.
दलितावर झालेल्या अन्याय हत्याचार व पाऊलखावली होणारी फसवणूक हा कवी अतिशय ताकदीने व्यक्त करतो. इतकेच नव्हे तर सभोवतालचे वातावरण हे परिपूर्णतः गचाळ आहे; जिथे दाद मिळणे दिवसेंदिवस अशक्यप्राय झालेले आहे. हे या कवीला माहित आहे. वाट्याला आलेले बहिष्कृत जीवन त्यामुळे होणारी वाताहात हृदयाला स्पर्श करून जाणारी आहे. त्या गचाड जीवनातून आपली कधीतरी सुटका होईल असा प्रबळ आशावाद कवी आपल्या कवितो मांडतो .
या कवीची कविता कोणत्याही आवर्तात, असमर्थ भोवऱ्यात न सापडतात तो सामान्य माणसात राहून त्यांचे दुःख आपल्या कवितेतून मांडतो. त्यामुळे हे दुःख तत्कालीक आहे. जीवनाचा शिरच्छेद करणाऱ्या या व्यवस्थेचा कवी निषेध करतो व म्हणून कवीच्या बोलण्यातून प्रचंड बंडखोर व्यक्ती आहे. विजेसारखा लखलखत्या आशावादी दृष्टिकोन आहे आणि समाजाला जागृत करून लढण्याचे सामर्थ्यही त्यात आहे.
या कवीची संपूर्ण कविता वैश्विक जाणिवेने परिपूर्ण आहे. पण कुठल्याही प्रकारचा हरवलेपणा त्यात नाही .तर सध्या कालीन परिस्थितीवर भाष्य करून या संग्रहात एक प्रकारची समुचितता साधली आहे. आपल्या संवेदनांना भाव व्याकुळ करून फक्त काव्याचा स्वानुभव घेणे व शब्दांना तिरकस प्रतिमा जोडून रंग व रेषा चौफेर उधळत राहणे हे त्या कवीचे अंतिम उद्दिष्ट दिसते. जीवन हे वनवास बनले आहे. हेच कवीच्या कवितेचे तत्वज्ञान आहे त्यामुळे ही कविता बांधिलकीचे काव्य आहे असे म्हणावे लागेल.
या कवीच्या कवितेचा एक विशेष म्हणजे या कवीवर कोणत्याही कवितेचा किंवा कवीचा प्रभाव आहे असे मुळीच जाणवत नाही. त्याचप्रमाणे वाङ्मयीन चोरी जे आपण म्हणतो त्याचाही लवलेशिया या कवितेत दिसत नाही .एकसुरीपणा नाही .तर संपूर्ण कविता डॉ. आंबेडकर फुले बुद्ध यांच्या प्रेरणेतून तर काही स्वानुभुतीतून निर्माण झाले आहेत हे कवितेचे एकमेव वैशिष्ट्य आहे .
कवी संदीप गायकवाड यांच्या काही कविता म्हणजे समतेचे एक घरटे बांधू, गर्द काळोखात उजेड पेरण्यासाठी ,आई क्र ३ , शांतिदूत, महायुद्ध ,भीमचक्र ,संघर्षाची पहाट, दिशा इत्यादी कवितांमधून जातिभेद, उच्चनीचता ,अज्ञान ,आईच्या
बुद्धाच्या कर्तुत्वाचे महात्मा ,निःपक्ष पातीपणा असमर्थता ,चीड,जातीच्या नावाखाली होणारे लिलाव ,भीम चक्राचे कर्तुत्व ,सत्यांवेशीवृत्ती, समता प्रस्थापित करण्याची अपार जिद्द, बहिष्कृत जीवनातून सुटका, आपुलकी, जिव्हाळा, वाट्याला आलेले रक्तरंजित जीवन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंबेडकरांनी केलेले अलौकिक कर्तृत्वाचे वर्णन ओळ लक्षात घेतली तर आपली शहनिशा होईल.
लिहिले कागदावर
माझ्या जीवनाचे अधिष्ठान
सर्वांच्या आयुष्यातील
ते एक सोन्याचे पान ….
यातून कवी संविधानाचे महत्त्व विशद करतो. या कवीची भाषा अगदी साधी सोपी आणि सरळ आहे. त्यामुळे हे कविता सर्वसामान्य वाचकांच्या अंतकरणाला भिडणारी बोध आणि उद्बबोधक करणारी आहे. म्हणूनच वाचक लुब्ध झाल्याशिवाय राहत नाही.
य कवी संदीप गायकवाड यांची कविता सवर्णाविषयीची चीड,
दलितांच्या हिताची तटजोड व अपमानित जीवनातून कायमची सुटका व्हावी असे व्यक्त करणारी आहे. आणि त्यासाठी हा कवी धडपडतानाही दिसतो. या समाजातील विषमता नष्ट होऊन समता ,स्वातंत्र्य ,बंधुता आणि सामाजिक न्याय हे माणुसकीचे तत्व समाजात निर्माण होऊन मानुषता उदयाला यावी असे कवीचे इप्सित आहे.
या कवीने भविष्यात यापेक्षा प्रकल्प कविता लिहून दलित कवितेतील आपले नाव टिकवून ठेवावे. पण यासाठी अव्वल दर्जाची कविता लिहिण्यात एवढेच महत्त्वाचे आहे. अन्यथा काळाच्या प्रवाहात लोप पावल्याशिवाय राहणार नाही. या कवीने लिहिलेल्या काही कविता आंबेडकरी जाणिवांच्या कविता आहेत. आणि त्याचा मी उल्लेख हि केलेला आहे .कारण कविता ही हृदयाला स्पर्श करून जाणारी , चिरकाल स्मरणात राहणार असावी. तिच्यात वस्तुनिष्ठता, तटस्थपणा आणि कालसापेक्ष सत्य असणे तेवढेच महत्त्वाचे असे मला वाटते.
उदा.
आशेच्या दिशेने
निराशेची वाट असते
आयुष्याच्या चढउतारात
क्षणभंगुर सुखाची साथ असते…..
ही कविता एका सत्याचा बोध करून देणारी आहे .अशीच कविता पुढे तुम्ही देखील लिहावी अशी मनीषा व्यक्त करून भविष्यात तुमच्या आगामी नूतन साहित्यकृतीकिरता आणि तुमच्याकरिता सुयश चिंतितो.
प्रा.वामन दाभेकर
जाटतरोडी नागपूर
कवितासंग्रहाचे नाव:
गर्द काळोखात उजेड पेरण्यासाठी
कवी-संदीप गायकवाड
प्रकाशक :महाराष्ट्र मराठी साहित्य मंडळ नागपूर
किंमत ६० रूपये
मो.९६३७३५७४००