दीक्षाभूमी गौरव ग्रंथ : क्रांतिकारी सृजनत्वाची ग्लोबल निर्मिती
दीक्षाभूमी गौरव ग्रंथ : क्रांतिकारी सृजनत्वाची ग्लोबल निर्मिती
जगातील बहुसंख्या क्रांत्या तलवारीच्या आणि युद्धाच्या माध्यमातून घडवून आलेले आहेत. प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ, प्रत्येक समाज स्वतःच्या ताकतीच्या बळावर श्रेष्ठ समजत आला आहे .ज्यांच्यामध्ये बळ तोच शिरजोर अशी म्हण आहे. पण भारतामध्ये १४ ऑक्टोबर १९५६ ला घडून आलेली क्रांती ही जागतिक क्षितिजावर नवसुर्याची प्रकाश घेऊन शांतीच्या बळावर निर्माण झालेली महाक्रांती आहे.
माणसाला माणूस म्हणून नाकारणाऱ्या सर्व धर्मावर तसेच माणसाचे अस्तित्व नाकारणाऱ्या विषमता वातावरणावर जबरदस्त आसूड आहे. १४ ऑक्टोबर १९५६ म्हणजे पृथ्वीवरील सर्व माणसाच्या माणुसकीला बहालत्व करणारा सुवर्णसोहळा होता. हा काही फक्त बौद्ध जनतेचा सोहळा असे काही म्हणत असले तरी हा सोहळा समग्र क्रांतीची चेतना होती. स्त्री-पुरुष, शोषित, धर्म, जात, वंश, पंथ ,भाषा पर्यावरण, वर्णभेद, गुलाम, मागास, पशुपक्षी इत्यादी प्राणी यांच्यामध्ये आमुलाग्र बदल घडवणारा क्रांतिकारी
समतेचा सोहळा होता .
त्या दिवसापासून जगाच्या पातळीवर आणि भारत देशात जो बदल झाला हा बदल कोणत्या स्वरूपाचा झाला बुद्ध धम्माची गती कशी आहे . बुद्धाच्या विचार कसा पुढे जाईल. त्याचबरोबर धर्मांतरानंतर आजचा भारत व जागतिक स्तरावरील बौद्ध धम्म यांचा विचार होऊ लागला.त्या अनुषंगाने दीक्षाभूमी सामाजिक, वाङ्मयीन, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्रांतीची चळवळ या प्रक्रियेवर आधारित दीक्षाभुमी गौरवग्रंथ एक महत्त्वाचा दस्तावेज आहे .
येणाऱ्या काळामध्ये दीक्षाभूमीची माहिती ज्याला हवी असेल त्यांना हा ग्रंथ दिशादर्शक ठरणार आहे . दीक्षाभूमी गौरव ग्रंथ जागतिक क्षितिजावर प्रथमच प्रकाशित झाला असून या ग्रंथाची भव्यता अतिशय मजबूत आहे. अतिथी संपादक माननीय यशवंत मनोहर म्हणतात, “दीक्षाभूमी गौरव करणारा ग्रंथ आपण तयार करावा हे या तरुणांना वाटणे ही बाबत मोठी अपूर्व आहे .त्यांच्या प्रतिभांना सुचलेल्या या कल्पनेचे मी मनापासून अभिनंदन करतो . तरुणांना अशा गोष्टी सुचने ही बाबत मोठी आश्वासक आहे. अशा तरुणांची संख्या असे वेगवेगळे उपक्रम सुचवणाऱ्या मनांची संख्या समाजात अशीच वाढत राहावी असे मला मनापासून वाटते. ज्या समाजातील तरुणांना अशी स्वप्ने पडतात तो समाज संकटांना संधी मानतो. संघर्षांना जिंदगी म्हणतो. तो समाज मग कधीही मावळत नाही”. पुढे ते संपादकीमध्ये लिहितात की, “दीक्षाभूमीवरून निघालेल्या प्रेरणांच्या वाटेने कोट्यावधी आयुष्य नक्षत्रांच्या दिव्यांनी बहरली, अनेक आयुष्यांचे सांस्कृतिक पुनर्वसन झाले . अनेक प्रतिभावांनी बाबासाहेबांना हव्या त्या प्रतिमासृष्टीची जगजगती निर्मिती केली .या प्रतिमासृष्टीतील चंद्र सूर्याच्या भाषेतून दीक्षाभूमी आता दुनियेची संवाद साधते .
आज दीक्षाभूमी फक्त भारताची राहिली नसून ती समग्र विश्वाची प्रेरणाभूमी आहे असे मत डॉ.यशवंत मनोहर मांडतात तसेच दीक्षाभूमी गौरव ग्रंथाचे शिल्पकार प्रा. दीपक कुमार खोब्रागडे प्रस्तावनेत लिहितात की,” दीक्षाभूमी गौरव ग्रंथाच्या माध्यमातून आम्ही अतिशय दुर्मिळ माहीती लोकांना उपलब्ध करून दिली. दीक्षाभूमीचा इतिहास हा या निमित्याने लोकांपुढे येईल मला विश्वास आहे. हा ग्रंथ अनेक वर्षेपर्यंत लोकांना मार्गदर्शन करेल. अनेक संशोधकांना संदर्भ घेता येतील. इतक्यात चांगल्या स्वरूपात बाहेर आलेला आहे . दीक्षाभूमीवर आतापर्यंत कोणीही असे धाडसाचे कार्य केले नाही. हे कार्य आमच्या हातून घडले त्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. बौद्ध धर्माचा प्रसार व प्रसारासाठी दीक्षाभूमी शिवाय कोणतेही मार्गदर्शकस्थळ नाही . त्याची प्रचिती आता लोकांना आली आहे. त्यासाठी हा ग्रंथ उपयोगी पडेल असाच मला विश्वास आहे.” असे आपले मत त्यांनी व्यक्त केले आहे.
बौद्ध धम्माची ध्वजा जागतिक स्तरावर फडकवण्यासाठी दीक्षाभूमी शिवाय पर्याय नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा समाज, धम्म माणूस ,निर्माण करायचा असेल तर दीक्षाभूमीरला केंद्रित मानले पाहिजे तेव्हाच ते कार्य पूर्ण होऊ शकेल.
दीक्षाभूमी गौरव ग्रंथ काढणे सहसा सोपे नव्हते, पण बहुजन साहित्य प्रसार केंद्र प्रकाशक माननीय सूजित मुरमाडे यांनी हा ग्रंथ अतिशय मेहनत घेऊन पूर्णत्वास नेला आहे. त्यांचा या कार्याला निळा सलाम आहे .दीक्षाभूमी गौरव ग्रंथ मध्ये अनेक विचारांचे मोहोळ आहे. या ग्रंथांमध्ये अनेक विचारवंतांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या अंगांनी दीक्षाभूमीच्या गौरव केलेला आहे. तसेच उत्कृष्ट भाषेचा उपयोग करून लेखांमध्ये सुसंगता दिली आहे. दीक्षाभूमी ज्या स्वरूपात त्यांना हवी आहे त्या स्वरूपात भाष्य केले आहे. या गौरव ग्रंथात फक्त लेखनच नाही तर धम्मदीक्षेचे साक्षीदार डॉक्टर कृष्णकांत डोंगरे ,चंद्रकांत मुंगले, शांताराम पोटदुखे यांनी पाहिलेल्या धम्मातर सोहळ्यावर चर्चा सुद्धा आहेत. तसेच विविध विचारवंत नेते समाजसेवक यांच्या मुलाखती सुद्धा घेण्यात आलेले आहेत. शेवटी दीक्षाभूमी चा इतिहास सांगितलेला आहे. दीक्षाभूमी गौरवग्रंथ हा क्रांतिकारी सृजनोत्सवाची ग्लोबल निर्मिती असून सर्व समाजाच्या मानवाला उपयोगी असणारा हा महान ग्रंथ आहे. समाजात नव्हे आत्मभान निर्माण करण्याची प्रेरणा देणारा सूर्यग्रंथ ठरेल असे मला वाटते. आतंकवाद, जागतिक स्तरावर धर्माचे, वर्णाचे, भाषेचे, पंथाचे ,जातीचे, आर्थिकतेचे शोषणनाचे जे वादळ निर्माण झाले आहे किंवा होत आहे या वादळाला शांत करण्याचे काम दीक्षाभूमी गौरवग्रंथ करेल अशी मला आशा आहे .
एकंदर हा गौरव ग्रंथ उत्कृष्ट बांधणीचा असून मुखपृष्ठ व मलपृष्ठ ग्रंथाच्या अंतरंगातील अविष्कार करत आहे ग्रंथाची अक्षर संपदा शशीभोवती यांची आहे तर दुर्मिळ छायाचित्रे चंद्रकांत मुंगले यांनी दिली आहेत. मुखपृष्ठ सजावट निलेश कांबळे मुंबई यांची आहे तर मुद्रक रेनबो अपसेट अँड पॅकेजिंग नागपूर यांनी केलेला आहे. सहयोग म्हणून 1000 रुपये आहे. दीक्षाभूमी गौरव ग्रंथ खंड एकचे प्रकाशन करणारे संपादक दीपक कुमार खोब्रागडे ,सुजित मुरमाडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा चिंतितो…
संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००