मराठा सेवा संघ जागतिक विचारपीठ..
मराठा सेवा संघ जागतिक विचारपीठ..
सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आज एक सप्टेंबर अतिशय आनंदाचा दिवस आजच्याच दिवशी म्हणजेच ३२ वर्ष आधी मराठा सेवा संघाची स्थापना झाली. त्याकाळी मराठा सेवा संघ नावाच एक रोप रुजवलं होतं. त्याचाच आज 33 कक्षा रुपी फांद्यांनी मोठा वटवृक्ष बहरलेला आपल्याला दिसतो. अशा माननीय, सन्माननीय एडवोकेट ,इंजिनीयर संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ शिवश्री खेडेकर साहेब व रेखाताई यांना आम्हा सर्व मराठा बहुजन बांधवांना कडून व माझ्या कडून धन्यवाद देतो व नतमस्तक होतो. आपल्या देशामध्ये अनेक महामानव होऊन गेलेत. त्याचबरोबर आत्ताच्या पाहण्यात शिक्षण महर्षी भाऊ साहेबांचे नाव आपण मोठ्य आदराने घेतो. त्याच प्रमाणे माननीय शिवश्री खेडेकर साहेबांचे नाव देखील सुवर्ण अक्षरात
लिहिल्या गेले पाहिजे, व जाईल ही आम्हास खात्री. त्याचे कारण ज्या माणसाने निस्वार्थभावनेने किंवा समाजातील अडी अडचणी पाहून व त्यांना आलेल्या अडचणी आपल्याला रेखांकन या पुस्तकांमधून वाचायला मिळतात. की त्यांना नोकरी व्यवसायामध्ये कशा अडचणी आल्यात व ते त्या अडचणी ला कसे सामोरे गेलेत, याच कारणाने मराठा बहुजन समाजामध्ये अशा अडचणी येऊ नये. यासाठी मराठा बहुजनांना जागे करावे,बोलते करावे,पहाते करावे, चांगल्या-वाईट विचाराची जाण व्हावी, यासाठी मराठा सेवा संघाची स्थापना केली. मराठा सेवा संघ हे फक्त एक संघटना नसून संपूर्ण मराठा बहुजनांचे कुटुंब आहे. साहेबांनी महाराजांचे विचार आचार आणि त्यांच्यासारखं लढवय्ये कसं व्हायचं हे आपल्याला आत्तापर्यंतच्या काळात नुसतेच सांगत आलेत,पण हे आपण कसे घेता, कसं घेतलं हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे. संघटनेचे तत्त्व महत्त्वाचे आहेत, विचार महत्त्वाचे आहे ,संघटना ही आपल्यासाठी नसून आपण संघटनेसाठी आहोत, हा विचार ज्यांनी ज्यांनी जाणला तो आपल्या आयुष्या मध्ये काहीतरी घेऊ त्याच प्रमाणे असे म्हणता येईल आपण दोघेही एकमेकांसाठी पूरक आहोत ही भावना सर्वांमध्ये रुजली गेली पाहिजे. हे विचार कसे रुजवतो लोकांपर्यंत कसे पोहोचवता हे सर्व एकनिष्ठेने करणे गरजेचे आहे.विचार संपत नसतो या विचाराला तैवत ठेवणे आपले सर्वांचे काम आहे…
1990 साली खेडेकर साहेबांनी निवडक सहकार्याना घेऊन लावलेल रोपटं आज 32 वर्षाचं अथांग पसरलेल वटवृक्ष झालं. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे मूळ साहित्याच्या व प्रचारक साहित्याच्या जोरावर पुस्तकाच्या किंबहुना इतिहासाच्या गर्भात हात घालून मेंदूची मशागत करतात.केडर बेस कार्यकर्ता हीच मराठा सेवा संघाची संपत्ती आहे. अनेक कृतिशील प्रबोधनात्मक कार्यक्रम देऊन जन सामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी अनेक प्रचारक, लेखक, वक्ते व केडर बेस कार्यकर्ते याच मरठा सेवा संघाने घडवले.माझ्या सारख्या असंख्य तरुणांना स्वतःच्या मेंदूने विचार करण्यास भाग पाडल किंबहुना हातातील दगड काढून पुस्तकं दिल स्वतःच्या धडावर स्वतःच मस्तक ही शिकवण खेडेकर साहेबांनी व मराठा सेवा संघाच्या प्रचार प्रसार करणाऱ्या प्रत्येकाने ही संकल्पना मनात आणि मेंदूत कोरली आणि नशिबावर किंवा ग्रह ताऱ्यावर नव्हे तर स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेऊन कर्तृत्वानं फळी निर्माण झाली.गेली 32 वर्ष मराठा सेवा संघाच्या प्रचाराने सामाजिक स्थित्यतंर घडवून आणले आहे.या जडणघडणीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले ते काही काळ टिकले व संपले.आम्ही मात्र खरं ते घासून ठासून सांगणार आणि प्रबोधनाची अखंड परंपरा चालू ठेवणार मराठा सेवा संघांच पुस्तकं मस्तक इतक जालीम औषध आहे की कोणत्याही मनुवादी जखमेवर त्यातून येणारा शब्दनंशब्द चिकित्सक पोस्तमार्टम करणारा आहे. कर्मकांड अंधश्रद्धा,पंचांग मुहूर्त भविष्य भूत, प्रेत,भटशाही,भयशाही नेस्तनाबूत करून सत्यशोधक मानवाला मानव जोडणारा शिवधर्म विश्वधर्म मराठा सेवा संघाची देणं आहे..
एक काळ होता छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर फक्त हिंदु-मुस्लिम दंगली घडवण्यासाठी केला जायचा. परंतु, शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन ही चुकीची परंपरा बंद केली. शिवरायांच्या नावाचा गैरवापर करणारे खरे चेहरे उघडे पाडले आणि खरे, वास्तव, लोकावश्यक शिवराय जनमानसांत रुजु केले. एक काळ होता, लोकांना जिजाऊ माँसाहेब या व्यक्तिमत्वाचे फारसे कुणाला गांभीर्य नव्हते. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन “जिजाऊंचे अधिकृत चित्र” तयार करुन घेतले. नंतर त्यांच्या पत्नी रेखाताई खेडेकर या आमदार असताना ते चित्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत केले आणि त्याचेच तैलचित्र महाराष्ट्र विधानसभेत बसवले. जिजाऊंचा खरा इतिहास समोर आणला. जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथे “मातृतिर्थ उभे” करुन आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सुरु केला. जिजाऊंना प्रेरणास्थान मानुन मानवतावादी विज्ञानवादी “शिवधर्म” स्थापन केला. एक काळ होता, घोषणा देताना लोक जय भवानी जय शिवाजी या घोषणेतुन नकळत शिवरायांचा ‘एकेरी’ उल्लेख करायचे. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन महाराजांचे होणारे अवमुल्यन थांबवले आणि इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख सरांनी जन्मास घातलेला “जय जिजाऊ जय शिवराय” हा आदरयुक्त जयघोष जनमासात रुजु घातला. आज “जय जिजाऊ” या अभिवादनाशिवाय तुमच्या आमच्या संवादाची सुरुवात होत नाही. एक काळ होता, महाराष्ट्रात शिवरायांच्या जन्मतारखेबद्दल वाद होता.त्यामुळे शिवप्रेमींमध्ये शिवजयंती संबंधी संभ्रमावस्था होती. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन या मुद्द्यावर जनजागृती केली. रेखाताई खेडेकर आमदार असताना त्यांच्या माध्यमातुन विधानसभेत यावर व्यापक चर्चा घडवुन आणली आणि “शासनाच्या माध्यमातुन १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची खरी व अधिकृत तारीख निश्चित केली. किल्ले शिवनेरीवर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महाराजांचा पाळणा गाण्याचा व मराठा सेवा संघाच्या वतीने शिवजयंती सोहळा हे उपक्रम सुरु केले, एक काळ होता, मराठा-बहुजन समाजातील युवकांचे “वैचारिक भान” सनातन्यांच्या क्रुर षड्यंत्रामुळे हरपलें होते, समाजाच्या मनुष्यबळाचा गैरवापर केला जात होता. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन हे षड्यंत्र हाणुन पाडले. मराठा-बहुजन समाजाला वैचारिक दिशा दिली. युवाशक्तीला विधायक कार्यासाठी प्रेरित केले. युवकांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे आवाहन करुन समाजात जाणिव जागृती केली. व्यवसायासाठी तरुणांना प्रोत्साहन दिले. एक काळ होता, शिवचरित्र,शंभुचरित्र या विषयांवर लिहण्याबोलण्यावर मनुवादी वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे समाजात “चुकीचा इतिहास” पेरला जात होता. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन या विषयावर बोट ठेवले.इतिहासाच्या पुनर्लेखनाचे महत्व समाजाला पटवुन दिले. शिवराय व शंभुराजेंचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोचवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक शिवशाहिर, इतिहास संशोधक, वक्ते, लेखक, चित्रकार, नाटककार कवी यांची मोठी फळी निर्माण केली. मनुवाद्यांची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडुन काढली. एक काळ होता, महाराष्ट्रात मराठा-दलित, मराठा मुस्लिम व मराठा-बहुजन असा वाद निर्माण करुन अनेकांनी आपल्या राजकिय पोळ्या भाजुन घेण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली होती.परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन हा मुद्दा हाताशी घेतला आणि बुध्द तुकोबा शिवराय फुले शाहू आंबेडकर-अण्णाभाऊ भगतसिंग या महापुरुषांच्या साखळीची ओळख समाजाला करुन दिली. समाजाच्या सर्व स्तरांत सांमजस्य आणि जातिभेद मिटवण्याच्या आपुलकीची भावना रुजवली. महाराष्ट्रात एक जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण केले. जातीय दंगलीपासुन समाजाला मुक्त केले. एक काळ होता, वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठा बहूजन समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांना अनुल्लेखाने टाळण्याची मोहीम सनातनी वर्गाकडुन चालविली जात होती.परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन सनातन्यांची चाल हाणुन पाडली. सर्व क्षेत्रातील मराठा-बहुजन व्यक्तिमत्वांना पुढे आणले. समाजाला त्यांची ओळख करुन दिली. त्यांच्या कार्याला आणि विचारांना पाठबळ दिले.. मराठा सेवा संघाच्या ३१ वर्षांच्या वाटचालीत वैचारिक नापीक समाजाला सुपीक केले. सामाजिक शेतातील अज्ञान, अहंकार, भोळेपणा आणि वैचारिक गुलामीचे तण काढुन सार्वजनिक जीवनातील सत्कार्याचे खत वापरुन उत्तम मशागत केली. मराठा बहुजन समाज जो बोलत नव्हता पण आज त्याच्या हातात लेखणी देऊन त्याना लिहायला, वाचायला, बोलायला, महापुरुषांच्या विचारधारेवर चालायला शिकवले…
मी जे घडलो ते मराठा सेवा संघामुळे सलाम मराठा सेवा संघाच्या विचारधारेला आज माझ्यासारखे जे अनेक युवक वेगवेगळ्या विषयांवर निर्भीपणे सडेतोड रोखठोक व्यक्त होतात, त्यासाठी मराठा सेवा संघाचा खुप मोठा आधार राहिलेला आहे..
झुंजार ही लेखनी,
घडवू दे अंग – अंग..!
साऱ्या जगाला कळू दे,
मराठा सेवा संघ..!!
✍️संतोष शकूंतला आत्माराम
बादाडे – 9689446003
मराठा सेवा संघ..📚
सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना व भारतीय जनतेस वर्धापन दिनाच्या शिवमय शिवस्पर्शी शिवशुभेच्छा..📖
जय जिजाऊ जय शिवराय जय भारत
🙏🏻🙏🏻🚩🚩📚📚🖊️🖊️💐💐