महिलांना आजही दुय्यम स्थान!

महिलांना आजही दुय्यम स्थान!
*महिलांना आज दुय्यम स्थान असलेलं दिसत आहे. निरनिराळी व्रतवैकल्ये आजही स्रियांना जेवढी करावी लागतात. तेवढी पुरुषांना करावी लागत नाही. साधं वडसावित्रीचं वडपूजन असो वा करवाचोथचे व्रत, पुरूषांना कधीही वडाला धागा बांधावा लागत नाही. तसेच स्रियांसाठी वा त्यांचं आयुष्य वाढावं म्हणून पुरूषांना नसतं. परंतू स्रियांना हे व्रत तर करावं लागतं. पुरूषांचं आयुष्य वाढावं म्हणून. तसेच स्रिया राजकारण, शिक्षण, अवकाश या क्षेत्रात पुढे गेल्या असल्या तरी त्यातही दुय्यम स्थानच दिसतं. खरं तर स्रियांचीही प्रगती व्हावी. दुय्यम स्थान दिसू नये.*
महिलांना पुर्वीही दुय्यम स्थान होतं. आजही दुय्यम स्थान आहे. काल या दुय्यम स्थानानुसार सीता, उर्मीला, मांडवी, श्रृतकिर्ती या महिलांनी पुरुषांचा अत्याचार सहन केला. हे त्रेतायुगात घडलं तर द्वापरयुगात द्रोपदी, कुंती, गांधारी इत्यादी स्रियांनी अत्याचार सहन केला. आजही असा अत्याचार महिलांवर होत आहे. कारण आजही महिलांना असलेलं दुय्यम स्थान.
ज्यावेळी देश स्वतंत्र्य झाला. त्यानंतर या देशात संविधान बनलं व संविधानानुसार महिलांनाही समान स्थान मिळालं. त्यानुसार महिला आज शिक्षण, राजकारण, अवकाश या सर्वच क्षेत्रात आघाडीवर गेल्या आहेत. आज महिला कल्पना चावला व कैसर विल्यमच्या रुपात अंतराळात गेली आहे. परंतू याचा अर्थ असा नाही की महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी आहे.
महिला आपल्या कुटूंबाची आर्थीक परिस्थिती पाहून कामाला जात असतात. कामाच्या ठिकाणी पुरुषांची भुरटी नजर त्यांच्यावर पडत असते. अपवाद याला काही महिलाही अाहेत. त्या महिला संविधानाचा वापर करुन आपल्या बॉसवरही आरोप लावून त्यांना ब्लँकमेल करतात व कामाचा स्वतःवरील ताण कमी करुन घेतात.
काही काही घरीही पत्नी म्हणून येणा-या महिलांना दुय्यम स्थान जाणवतं. महिलांनी डोक्यावर पदर घ्यावा. तिनं कपाळावर कुंकू लावावा. तिनं खाली मान टाकून राहावं. तिनं असं वागावं तसं वागावं. अशा नानावीध गोष्टी. ह्या गोष्टी ज्या घडतात. त्या गोष्टीही स्रियांचं दुय्यमच स्थान दाखवतात. आज स्रिया अवकाशात गेल्या, राजकारणात मोठमोठ्या पदावर गेल्या तरी स्वतःचे निर्णय स्वतः घेवू शकत नाही. राजकारणाचा विचार केल्यास त्यांचे पुरुषच कोणतेही राजकारणातील निर्णय घेतांना दिसतात. तसेच शिक्षीका म्हणून नोकरीला लागतात, तेव्हाही शाळेत काही काही निर्णय स्वतःच्या मतानं घेतांना दिसत नाही. आपल्या पतीच्या मतानं घेतात. आजची स्री स्वतंत्र्य असली तरी बालपणात आपल्या मायबापाच्या दबावात असतीत आणि पतीच्या घरी पतीच्या दबावीत. जेव्हा पती मरण पावतात, तेव्हा त्या मुलांवर अवलंबून असतात. याला स्रीचं स्वातंत्र्य म्हणता येते का?
पुर्वीच्याही काळी तेच झालं. उर्मीलाचं मन तोडून लक्ष्मण वनवासात गेला, तेव्हा उर्मीलाला दुय्यमच समजलं गेलं. द्वापर युगात भानुमतीचा तिच्या इच्छेनुसार विवाह झाला नाही. हेही दुय्यमच स्थान होतं.
महत्वाचं म्हणजे संसाररथाची जी दोन चाकं असतात. त्यामध्ये स्री ही संसाररथाचं एक चाक आहे व पुरुष दुसरं. जर एक चाक कमजोर असलं किंवा तुटकं असलं तर तो रथ चालूच शकत नाही. तसंच स्रियांचे आहे. विशेष सांगायचं म्हणजे स्रियांनाही प्रथम स्थान द्यावं. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांनाही संविधानानं जे समान स्थान दिलं आहे. ते द्यावं. जेणेकरुन त्यांनाही समाधानानं व सन्मानानं जगता येईल व स्वतःचा विकास करता येईल. हे तेवढंच खरं अाहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०