वडील नावाची सावली त्याच्या आयुष्यातून कमी झाली; आईच्या कष्टात त्यानं वडिलांना पाहिलं नि अडचणींना तोंड देत हर्षद एबीबीएसच्या मापात…

वडील नावाची सावली त्याच्या आयुष्यातून कमी झाली; आईच्या कष्टात त्यानं वडिलांना पाहिलं नि अडचणींना तोंड देत हर्षद एबीबीएसच्या मापात…
आई-वडिलांकडून मिळालेली प्रेरणा ही लेकरांच्या स्वप्नांना बळ देते तर लेकरं ही आई-वडिलांच्या जगण्याची ऊर्जा असतात.म्हणून प्रत्येक दाम्पत्य आपल्या लेकरांना घडवण्यासाठी धपडत असतात.आणि जर लेकरांनीच लेकरांच्या कष्टाचं मोल केलं तर तो क्षण कायम अविस्मरणीय असतो. पण याच अविस्मरणीय क्षणाचं मोठं यश डोळ्यांनी पहायला हर्षदचे वडील हयात नाहीत. कैलास दत्तरामजी माने हर्षदचे वडील शिक्षणाप्रती प्रचंड अस्था .हर्षदने शिकावं, मोठं व्हावं, डॉक्टर व्हावे ही हर्षदच्या वडिलांची इच्छा. काल ‘नीट” चा निकाल लागला. हर्षदला तब्बल 537 मार्क्स पडले तो (ओबीसी) प्रवर्गातुन आहे.एमबीबीएस पात्रतेसाठी मापात बसणारे हे यश .हर्षद दहावी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. कधी कधी घरची परिस्थिती सधन असली तरी सगळं काही व्यवस्थितच असते असे काही नाही. हर्षदलाही अश्याच बऱ्याच अडचणींना समोर जावे लागले.त्या अडचणी इतक्या की,कधी कधी हे शिक्षण,या प्रक्रिया,ही सगळी कसरत नकोच असं वाटत होतं;मध्यंतरी त्याच्या कुटुंबातीलच नाहीतर गावचा आधारवड राहिलेले त्याचे आजोबा दगावले शिवपुरीच्या पंचक्रोशीतील मोठं नाव,30 वर्षापासून गावच्या ग्रामपंचायतीवर सत्ता त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचे अवसान गळाले. या धक्क्यातून सावरतो न सावरतोच तर पुन्हा एक धक्का हर्षदला बसला नि हर्षदच्या डोक्यावरील पितृछाया काळाने हिरावून घेतली.वडिलांच्या जाण्याने हर्षद पुरता कोलमडून पडला. धडपड करण्याची उमीद तो गमावून बसला; मनावर एकप्रकारचे ओझं पडलं यातून सवरतांना त्यानं आईच्या धडपडीत वडील पहिला. वडिलांच्याच स्वप्नासाठी त्यानं पुन्हा प्रयत्नांची नौका पुढे रेटली.त्याच्या कष्टातून त्यानं स्वतःला उद्याचा म्हणून डॉक्टर उभं केलं.या काळात त्याची आई ही नुसती आईच न राहता वडिलांचे कर्तव्य पार पाडण्यात ती मागे सरली नाही. हर्षदचे मोठं कुटुंब आहे.त्याच्या या यशात त्याच्या त्याची आई-वडील, आजोबा,काकां,मामा या सगळ्यांचा हातभार लागला. गावच्या अभिमानात भर पडली. गावातून तो एमबीबीएस डॉक्टर पात्रतेसाठी पूर्ण मापात खरा उतरलाय…
हर्षद कैलासराव माने या विद्यार्थ्यांने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन व त्याच्या उज्वल भविष्यासाठी लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा 💐💐
– मनोहर सोनकांबळे
(रायटर्समंच)
खूप खूप अभिनंदन हर्षद…
रायटर्स मंच चे धन्यवाद…