राजकीय

संभाजी ब्रिगेड शिवसेनेची युती नवक्रांतीची मशाल

संभाजी ब्रिगेड शिवसेनेची युती नवक्रांतीची मशाल
-संतोष बादाडे
बंधू-भगिनीनों संभाजी ब्रिगेड ने गेल्या ३० वर्षात महाराष्ट्रामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतीक, धार्मिक, प्रचार प्रसार क्षेत्रात अग्रणी भुमिका घेवुन काम केलेले आहे, संभाजी ब्रिगेड हि युवकांच्या हातात पुस्तक देवुन मस्तक घडविणारी संघटना आहे आणी पुस्तकाने मस्तक सशक्त झाले की ते कुणापुढेही नसमस्तक होत नाही की हस्तक होत नाही अशी संभाजी ब्रिगेड शिव शाहु फुले आंबेडकर भगतसिंग आण्णाभाऊ व प्रबोधनकारांच्या विचाराने चालणारी, आणि संत नामदेव, संत तुकाराम, संत संताजी, संत चोखामेळा, संत कबिर संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आध्यात्मिक वारसा घेवुन चालणारे विचाराने परीपक्व संघटन आहे.महाराष्ट्रातील १ ते ४ पर्यंत मराठी शाळामध्ये इंग्रजी शिक्षण सुरु करण्यासाठी केलेले कार्य असो, छत्रपती शिवरायांच्या जन्मतारखेचा प्रश्न असो, शिवरायांचे गुरु राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आहेत हे समाजाला सांगणे असो, की हा विषय पुस्तकात समाविष्ठ करण्याचा असो,अठरा पगड जातीतील तरुणांनी स्पर्धा परीक्षे कडे लक्ष द्यावे म्हणून स्पर्धा परीक्षेची केंद्र उभे करणे, प्रत्येक जिल्ह्यात मराठा सेवा संघाच्या सोबतीने राहुन वाचनालय, होस्टेल, पतसंस्था उभी करण्यात सिहांचा वाटा उचवणारी भारतातील एकमेव संघटन संभाजी ब्रिगेड आहे. महाराष्ट्रामध्ये लाखो रुपये खर्च करुन अद्यावत वाचनालये, प्रशस्त मुला मुलींसाठी होस्टेल उभे करुन अनेक गोर गरीबांच्या मुलांना राहण्याची सोय उपलब्ध करुन देणे ते सुध्दा शासनाच्या मदतीशिवाय लोकसहभागातुन असेल लोक उपयोगी कामे संभाजी ब्रिगेड करत आहे आणी करत राहणार आहे.
इतिहासातील अनेक चुका लक्षात आणुन त्यात शासनाला सुधारणा करण्यास भाग पाडणारे संघटन म्हणजे संभाजी ब्रिगेड.अनेक पातळीवर कमि अधिक प्रमाणात लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार संघटन म्हणजे संभाजी ब्रिगेड होय.संभाजी ब्रिगेड ने आजवर सामाजिक क्षेत्रांत अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले आहेत ज्यातुन अगदी गावपातळीपर्यंत आजचा चिकित्सक व वैचारिक स्वावलंबी युवक घडलेला दिसतोय. आणि संभाजी ब्रिगेडच एक वैशिष्ट हे की आजवर संभाजी ब्रिगेडचा एकही आमदार खासदार नसताना ब्रिगेड चा कार्यकर्ता हा केवळ विचारांच्या बळावर ब्रिगेड शी आजही एकनिष्ठ आहे. म्हणजेच सत्ता असो वा नसो पण ब्रिगेड वैचारिक परिवर्तनात कधीच जिंकलेली आहे… परंतु जर समाजोपयोगी विधायक कामांच्या माध्यमातुन सर्वसामान्यांना न्याय मिळवुन द्यायचा असेल तर राजसत्ता ही आपल्याकडे हवीच आणि त्याच साठी संभाजी ब्रिगेड ने राजकीय पक्षात रुपांतर करुन राजकीय बांधनी चालु केलीय.आज महाराष्ट्र भर अनेक ग्रामपंचायता ह्या संभाजी ब्रिगेड च्या ताब्यात आहेत जेथे ब्रिगेड चे मावळे अनोखे उपक्रम राबवत जनतेला योग्य न्याय मिळवुन देत आहेत…

ज्या संघटनेच्या मुशीतून आम्ही तयार झालोत अशा संभाजी ब्रिगेडचा हा क्रांतीकारी निर्णय म्हणजे प्रचंड मोठा आनंदोत्सव होय. या निर्णयाचा आम्हांस सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व घटना आहे. शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही हे विधान ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब यांनी विधानसभेत केले त्या दिवसापासून शिवसेना आमच्या आदरास पात्र ठरली. प्रबोधनकार ठाकरे आणि खेडेकर साहेब यांच्या विचारांचा आज मिलाप होऊ पाहतो आहे. महाराष्ट्रात नवी राजकिय क्रांती घडेल यात मुळीच शंका नाही…

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा रयतेचे राज्य हा विचार पुढे नेऊन जिजाऊंना अपेक्षित सुराज्य निर्मितीकरिता पुढे टाकलेले विश्वसनिय पाऊल आहे,सर्व धर्मियांनी घेऊन राज्य कारभार चालविणे, अठारा पगड जातीच्या बहुजनांना एकसंघ ठेऊन त्यांच्या अपेक्षा व सामान्य माणसाचा विकास, राज्याचा समताेल विकासाची बहुसुत्री राबविणे करिता हे आनंदाचे पाऊल आहेत, खबरदारी ही आहे कि दाेन्ही पक्षांनी स्वत:ची ताकद प्रत्येक मतदारसंघात ओळखुन चांगल्या वैचारिक प्रकल्भ विचारांच्या वारसा असलेली व प्रत्येक पक्षातील लाेकांची चाचपणी सुरु करुन समिती नगर व ग्राम आणि शहर समित्या निर्मिती तात्काळ करणे गरजेचे आहे.या आधी ही संभाजी ब्रिगेडने राष्ट्रवादी काँग्रेस अन काँग्रेस सोबत पण युतीसाठी प्रस्ताव ठेवलेले होते पण हे दोन्ही पक्ष सत्ते नसताना यांना संभाजी ब्रिगेड आठवायची अन सत्ता आल्यावर याना संभाजी ब्रिगेडचा विसर पडायचा ही वास्तविकता आहे.आता उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे सत्ता नसताना संभाजी ब्रिगेड त्यांना साथ देत आहे आणि संभाजी ब्रिगेड अन सेना दोघांच्या कडेही युवक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे अन याचा संभाजी ब्रिगेड व शिवसेनेला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच फायदा होईल. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे वैचारिक केडर बेस आहेत हे मोठा पॉईंट आहे अन उद्धव ठाकरे हे सुद्धा सध्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांच्याकडे वळलेले आहेत त्यामुळे आता शिवसेना ब्रिगेड सोबतगेल्यामुळे बऱ्याच जणांना मळमळ होणे स्वाभाविक आहे…

शिवसेना अन संभाजी ब्रिगेड यांची युती झाल्याची घोषणा होताच, बऱ्याच मनुवादी लोकांच्या पोटात गोळा उठलेला दिसतोय आणि मुळव्याध खवळल्याला दिसतोय.सत्तेसाठी मुस्लिम लीग सोबत जाऊन देशासीबत गद्दारी करण्याचा इतिहास असणाऱ्या विचारधारेच्या लोकांनी सेनेने कोणाशी युती करावी हे शिकवू नये.. ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झाली म्हणून संभाजी ब्रिगेड ला कमी लेखत रेशीमबाग वाले शिवसेनेला विनाशकाली विपरीत बुध्दी म्हणून डिवचण्याचा प्रयत्न केला, पण या मनुवादी लोकांना जास्त नाही तर इतकंच लक्षात घ्यावं की तुमच्या हजारो वर्षाची धार्मिक दहशतवादाचा बुवाबाजीचा थोतांड कर्मकांडाचा बुरखा एकदा नाही तर क्रित्येकदा संभाजी ब्रिगेडने टराटरा फाडला आहे. हे न समजायला तुम्ही काही अज्ञानी नाही..बावनकुळे व देवेंद्र फडणवीस यांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघात घालवलेले आहे. त्यांना चांगले माहीत आहे कॅडर काय असतो ते. उलट संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता एक उत्कृष्ट कॅडरच आहे. संघटन कसे चालवावे, कसे मजबूत करावे हे संभाजी ब्रिगेडला चांगले ठाऊक आहे.आज संभाजी ब्रिगेडचा राजकीय जनाधार फार कमी आहे परंतू सामाजिक कार्य मात्र वाखानन्याजोगे आहे. आज जी सेनेसोबत राजकीय युती झाली त्याचा प्रत्यक्ष फायदा ह्या दोन्ही पक्षाला होईल याबद्दल दुमत नाही. संभाजी ब्रिगेडचे चांगले वक्तृत्व ही त्यांची जमेची बाजू आहे. ते एक सामान्य माणसं असल्याने भ्रष्टाचाराचा लवलेशही नाही. यांना कसे रोकावे हा फार मोठा गहन प्रश्न सध्या फडणवीस साहेबांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पडलेला आहे म्हणून आज त्यांचा जळजळाट होते आहे..

शिवसेनेची गद्दारांनी साथ सोडली पण आता पडत्या काळात संभाजी ब्रिगेड सोबत आली आणि मनुवादी विचारसरणीच्या लोकांचा नांगा ठेचायचा असेल तर झालेली युती योग्य आहे आणि संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ते काम येत्या काळात नक्की करणार खरंतर युती शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची झाली पण आग ना काँग्रेसच्या ना राष्ट्रवादीच्या गोटात लागली पण भाजपच्या आणि RSS च्या बुडाखाली वणवा पेटला आणि का फक्त भाजपच्या बुडाखाली आग लागली ह्याचं कारण शोधा कारण RSS चा आणि भाजपचा बुरखा फक्त आणि फक्त संभाजी ब्रिगेड च फाडू शकते हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवल आहे.असेही पतित पावन, सनातन आर.एस एस. बजरंग दल हिंदू जनजागृती शिवप्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद सारख्या असंख्या छोट्या मोठ्या संघटना भाजपासाठी काम करतात अन भाजपा त्यांना आर्थिक तसेच राजकीय रसद पुरवत आहेत…

शिवसेनेने फक्त संभाजी ब्रिगेडला आर्थिक ताकद देणे महत्त्वाचे आहे,येणाऱ्या काळात शिवसेना संभाजी ब्रिगेड हे महाराष्ट्रासाठी चांगले राजकीय समीकरण असणार आहे.शिवसेना संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचं पाहून चहूबाजूंनी प्रस्थापित पक्ष, नेते, पुढारी, काही मोठमोठ्या कर्मठ लोकांच्या मनात धडकी भरलीय. ही काही सामान्य गोष्ट नसून एक वैचारिक क्रांती आहे. आता परीवर्तन व बदल हा अटळ आहे.. संभाजी ब्रिगेड ची हातातील लेखणीही भारी आहे..
आरंभ हैं प्रचंड, हम लडेंगे और जीतेंगे भी…
✍️ संतोष शकूंतला आत्माराम
बादाडे पुणे – 9689446003
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र …
🤝📖🖊️🚩💐

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button