संपादकीय

धम्मचक्र प्रवर्तन दिन संभ्रम आणि वास्तव..

धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संभ्रम
लेखक- राजू बाेरकर

धम्मचक्र प्रवर्तन दिनाला ईतकी वर्षे हाेऊनही आपण आपल्यातील अज्ञान दरवर्षी ऊजागर करित आहाेत.आपल्या लाेकांमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाविषयी आजही संभ्रम आहे.चित्ताची द्वीधा अवस्था आहे.बाैद्ध साहित्याचे आपल्यात गाढे अभ्यासक आहेत.त्यामुळे अनेकांचे अनुभव वेगळेवेगळे आहेत.एकाणं दिलेली माहीती दुसरा अभ्यासक,विचारवंत फेटाळुन लावताे.त्याचा वेगळाच अभ्यास असताे.त्यांची वेगळीच माहिती असते.त्यामुळे साध्या निरक्षर माणसांपासुन साक्षर माणसांपर्यंत चिलबिचल अवस्था आहे.म्हणूनच दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन काेणता?हा प्रश्न आंबेडकरी जनतेतुन चर्चेला येताे.याविषयी एकमत नसल्याने आणि दिक्षाभूमी समीतीने स्पष्टता केली नसल्याने दरवर्षी दिक्षाभूमीवर दसरा आणि १४ आँक्टाेबर अशा दाेन दिवशी दाेन विचारांचे लाेक गर्दी करतात.आंबेडकरी जनता आपल्या हुशारीसाठी फार प्रसिद्ध
आहे.त्या हुशारीमुळेच ही जनता राजकीय आघाड्यांवर कायम अपयशी झाली.धार्मिक क्षेत्रातही काहीसे असेच चित्र आहे.ईथेही दाेन गटांत विभागणी झालेली दीसुन येते.धार्मिक क्षेत्रातील विभागणीचा किंवा दाेन विचासरणीचा आपण थाेडक्यात विचार करुयात….
दसरा की १४ आँक्टाेबर याविषयी आंबेडकरी जनतेतील द्वीधा अवस्था ही सुमारे १९७२/७३ पासुन चर्चेत आलीय असं अभ्यासकांचं मत आहे.खासकरुन तरुणांकडुन अशी विचारणा हाेऊ लागली.तरुणांच्या किंवा आंबेडकरी जनतेच्या प्रश्ऩाला ऊत्तर म्हणून राजा ढालेंनी, ” अखिल दलीतांचा क्रांती दिन” हा लेख लिहून ‘ नवा काळ ‘ मध्ये १३ आँक्टाेबर १९७६ राेजी प्रकाशित केला.राजा ढाले साहेबांच्या मते धम्म क्रांती दिनाचा वर्धापन दिन १४आँक्टाेबरलाच व्हावा.
एन जी कांबळे यांनी , ” अशाेक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन ” नावाचा ग्रंथ लिहून २००६ मध्ये प्रकाशित केला.मात्र या ग्रंथावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय.ब्राम्हणशाही आणि काँग्रेसशाही हे दाेन शत्रु आंबेडकरी चळवळीचे मारेकरी आहेत,हे सर्वांना ठाऊक आहे.या ग्रंथाला विराेध करण्यामागील कारण समजुन घेणं गरजेचं आहे.आंबेडकरी चळवळीला बबन लव्हात्रे हे नाव माहीत आहे.त्यांनी कांबळेंच्या ग्रंथावर काही आक्षेप नेांदविले आहेत.ते समजुन घेणंही महत्वाचं आहे . त्यांनी घेतलेले आक्षेप आंबेडकरी जनतेला विचार करायला लावणारे आहेत.ते म्हणतात,रा.सू.गवईंच्या हातात दिक्षाभुमीची सर्व सुत्रे एकवटली आहेत.१५/४/१९६७ राेजी पुण्यात शनिवारवाड्यासमाेर काँग्रेसच्या यशंतराव चव्हाणांनी दादासाहेब गायकवाडांच्या खांद्यावर हात ठेऊन युती केली.या युतीतुनच १९६८ ला महाराष्ट्र विधान परिषदेचे ऊपसभापती म्हणुन रा.सू.गवईंचा शपथविधी पार पडला. १२ मे १९६८ ला बुद्ध जयंती प्रित्यर्थ दिक्षाभुमीवर भदंत आनंद काैषल्यायन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते स्मारकाचा पायाभरणी समारंभ पार पडडला.पण त्यामुळे गटातटाच्या राजकारणाला ऊधाण आलं.दुफळी निर्माण झाली. १९७० पर्यंत नागपुर येथे रावण दहनाची प्रथा नव्हती.परंतू रिपब्लिकनच्या दुफळीतुन १९७१ मध्ये दसरा,विजयादशमीच्या दिवशी कस्तुरचंद पार्क येथे प्रथमच रावणाचा पुतळा जाळण्यात आला.
वरील संदर्भाचा एकुण अर्थ असा की,दिक्षाभुमीला बाैद्धांचं धार्मिक केंद्र म्हणून त्याचा वापर कमी आणि राजकीय राजकीय अड्डा म्हणून अधिक वापर केला गेला.ईथे लव्हात्रे साहेब गवईंचा राजकिय प्रवास सांगत असले तरी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेच दुसऱ्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी निरक्षर भाेळ्या आंबेडकरी जनतेला भुलथापा देऊन दिक्षाभुमीवर बेालवुन बाबासाहेबांच्या कल्पनेतील पक्षाला मुर्त रुप दिलं गेलं.रिपब्लिकन पक्षाची दिक्षाभुमीवर स्थापना करुन दसऱ्याच्या मागे फीरविणारे दुसरेतिसरे कुणी नसुन समाजाचे प्रतीनिधित्व करणारे आपले नेते आहेत.
बाबासाहेबांनी १३ आँक्टाेबर १९३५ ला धर्मांतराची घाेषणा केल्यानंतर त्यांनी केलेल्या लेखणात,भाषणात कुठेही, ‘ अशाेक विजयादशमी ‘ असा शब्द वापरला नाही,असं मत लव्हात्रेंनी आपल्या, “१४आँक्टाेबर ,विजयादशमी की दसरा या पुस्तकात व्यक्त केलं आहे.लव्हात्रेंनी चिनी प्रवासी ह्युएनसंग, डाँ. एडवर्ड थाँमस ,डाँ.जे. एफ. फ्लीट, आणि प्रा.पी एल. नरसू ईत्यादींच्या ग्रंथातील दाखले दीलेत.त्यात ८ शुक्ल-१३ आँक्टाेबर बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची तारिख ठरविली आहे.बुद्ध काळातील कालगणना ही ही चांद्रमास पद्धतीची हाेती. पंधरा दिवस अमावशा आणि पंधरा दिवस पाैर्णिमा मिळुन ३० दिवसांचा महिना मानला जात असे.आजही जुनी निरक्षर माणसं अशी कालगणना करतांना दिसतात.आता पाश्चिमात्य पद्धतीची कालगणना सर्वांना ठाऊक आहे.ही साैर कालगणना आहे.चांद्रमास पद्धतीनुसार ८ शुक्ल म्हणजे आजच्या कालगणनेनुसार १३ आँक्टाेबरची मध्यरात्र म्हणजेच १४ आँक्टाेबर,असा सबंध जाेडला गेला.बाबासाहेबांनी म्हणूनच ही तारीख ठरविली असावी असा तर्क केला गेला.पूराव्यांवरुन त्याला बळकटी येते.
श्रीराम आपटेंनी संस्क्रुत ईंग्लिश डिक्षणरी सिहिली.त्यात पान ५०९ वर विजया= आय.एन.आँफ दुर्गा_ असा अर्थ सांगितला आहे.म्हणजे विजया दशमी याचाच अर्थ दुर्गा दशमी हाेय. तसेच सिमाेल्लंघन ही ३०० वर्षांची मराठ्यांची प्रथा आहे. आता राजा ढालेंचं मत बघा, ” ज्या सांस्क्रुतीक विव्हात एकाच दिवशी दुर्गापुजा, रावणदहन आणि सिमाेल्लंघन अशा अनेक गाेष्टी एकत्र येतात आणि त्याला एकाचवेळी विजयादशमी अथवा दसरा आदी नावाने ओळखला जाताे, जाे सण घटस्थापणेपासुन ९ दिवस ९ रात्र साजरा करुन शेवटी विजयादशमीत परावर्तीत हाेताे असा दहा दिवस चालणारा सण हा आपला म्हणजे बाैद्धांचा असु शकत नाही. ”
वरिल काही पुरावे पाहीले तर वास्तवाचं भान यावं.साहित्यिक बबन लव्हात्रे म्हणतात, १४ आँक्टाेबर ही बाबासाहेबांच्या जीवनातील अतिशय महत्वाची तारीख आहे.म्हणून धम्मचक्र प्रवर्तनदिन साेहळा,वाढदिवस हा १४ आँक्टाेबरलाच व्हावा.मी स्वतः लव्हात्रे साहेबांच्या मताशी सहमत आहे.कारण बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्याची दखल घेतांना आपण त्याच तारखांना महत्व देताे.मग जागतीक पातळीवर ज्या धम्म साेहळ्याची नाेंद झालीय ताे साेहळा दिन आपण १४ आँक्टाेबरलाच न करता ईतर दिवसांच्या,दसऱ्याच्या पाठीमागे का लागताे? अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे एखाद बाळ १४ तारखेला जन्माला आलं तर त्याचा वाढदिवस आपण १३ किंवा १५ तारखेला करत नाही ताे वाढदिवस १४ तारखेलाच हाेताे.मग बाबासाहेबांच्या जागतीक कार्याची दखल घेऊन १४ आँक्टाेबरलाच धम्मचक्र प्रवर्तन दिन साेहळा का करु नये?
रिपब्लिकन नेत्यांनी दिक्षाभुमीवर जाे राजकीय खेळ मांडला त्याला पायबंद घातलं जाणं गरजेचं आहे.दिक्षाभुमीवर काेणत्याही रिपब्लिकन नेत्यांना राजकीय डावपेचांची नवटंकी करण्यास विराेध करावा.समितीचे काही नियम असावेत.त्यात राजकारण्यांसाठी विशेष आचारसहिंता असावी. ईतर नेत्यांना दिक्षाभुमीवर येऊन घाेषणाबाजी करण्यास मनाई असावी…….अशा अनेकविध सुचना सुचवता येतील.
—————–समाप्त——————-
लेखक राजू बाेरकर
लाखांदूर
जि.भंडारा
७५०७०२५४६७
*******************************

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button