“शिक्षण आमचा देव” या काव्यसंग्रहाचे संभाजीनगर येथे प्रकाशन

“शिक्षण आमचा देव” या काव्यसंग्रहाचे संभाजीनगर येथे प्रकाशन
प्रतिनिधी
सुनील शिरपुरे/झरीजामणी
झरीजामणी या आदिवासी बहुल तालुक्यातील प्रा.देविदास गायकवाड यांच्या *”शिक्षण आमचा देव”* या काव्यसंग्रहाचे नुकतेच संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद येथे शब्दगंध समुह प्रकाशनाच्या वतीने सिने अभिनेत्री कु.रुपाली पवार आणि प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.आनंद अहिरे यांच्या हस्ते मौलाना आझाद रिसर्च सेंटर, संभाजीनगर येथे प्रकाशन सोहळा पार पडला. *”शिक्षण आमचा देव”* हा प्रा.देविदास गायकवाड यांचा पहिलाच काव्यसंग्रह असून शिक्षणाचे महत्त्व विशद करणा-या ४२ कविता सदर काव्यसंग्रहामध्ये आहे. सदर काव्यसंग्रहाला प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे, अमरावती यांची प्रस्तावना तर शिक्षण उपसंचालक दिपक चवणे यांचा शुभेच्छा संदेश लाभला आहे. ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांकरीता प्रेरणादायी असा काव्यसंग्रह आहे. प्रा.गायकवाड यांचे “पेटला वनवा”, ” जिवन सागर” हे दोन काव्यसंग्रह व “इंग्रजी ग्रामरचा राजमार्ग” ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. प्रा.देविदास गायकवाड हे हाडाचे शिक्षक असून ते अनेक पुरस्कार प्राप्त कवी आहेत. त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. “शिक्षण आमचा देव”हा मराठी भाषेतील अत्यंत नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी काव्यसंग्रह आहे. त्यांच्या या साहित्यिक यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.