१४ ऑक्टोबर – मानव मुक्तीचा सुवर्ण दिन..
१४ ऑक्टोबर – मानव मुक्तीचा सुवर्ण दिन..
‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु, हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक येवले मुक्कामी युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची ऐतिहासिक ‘भीम गर्जना’ केली अन् रक्ताचा एकही थेंब न सांडता, १४ ऑक्टोबर १९५६ साली लाखो अनुयायांसह पवित्र नागभूमीत ‘न भूतो, न भविष्यती’ अशी जागतिक धम्मक्रांती घडविली. बुध्दाचे धम्मचक्र जगावर फिरवून, पाश्चात बौध्द जगाशी संबंध जोडला. मानव मुक्ती दिनाची जगानेही सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली आहे. मनुष्यहीन, भविष्यहीन, अखंड अंधकारमय लाखो उपेक्षित, शोषितांच्या जीवनात परिवर्तनवादी स्थित्यंतर घडविले. त्यावेळी दिक्षार्थींना २२ प्रतिज्ञा देऊन, दुसऱ्या दिवशी बाबासाहेब बुध्द धम्माच्या आचरणासंदर्भात म्हणतात, ‘मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी कृती तुम्ही केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण गळ्यात एक मढे अडकवून घेत आहोत अस मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टिने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणूनचं आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबरचं देशाचा इतकेचं नव्हे तर, जगाचाही उध्दार करु. कारण बौद्ध धर्मांनेचं जगाचा उध्दार होणार आहे.’ बाबासाहेबांची बौद्ध धम्मासंदर्भात संकल्पना किती सकारात्मक, व्यापक अन् जागतिक होती हे यावरुन सिद्ध होते.
*धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा !* 💙
*- मिलिंद कांबळे चिंचवलकर*
9892485349