जिल्हा
एस.एम.निवासी शाळेत संविधान दिन साजरा
एस.एम.निवासी शाळेत संविधान दिन साजरा
नांदेड.
सुनित शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड संचलित एस.एम.निवासी संमिश्र अपंग तांत्रिक व पुनर्वसन केंद्र बरडशेवाळा ता. हदगाव जिल्हा नांदेड येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान उद्देशिकेचे पूजन संस्थेचे सचिव प्रविणकुमार रामचंद्र भास्करे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी व्यवस्थापकीय अधिक्षक श्री.विश्वभूषण भास्करे यांनी सर्व कर्मचार्यांना व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व सांगून संविधानाची प्रत देऊन सामूहिक संविधान वाचन करून घेतले.
यावेळी शाळेचे कर्मचारी श्री.संतोष लंगडे, श्री.अक्षय कांबळे,श्री.संजय लोमटे,चक्रधर इंगोले यांच्यासह इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.