व्यक्तिविशेष

डॉ.हर्षवर्धन दवणे शैक्षणिक चळवळ जगणारे कार्यकर्तुत्व…!

डॉ.हर्षवर्धन दवणे शैक्षणिक चळवळ जगणारे कार्यकर्तुत्व…!

कारण शिक्षणच हे असे क्षेत्र आहे ज्यातून सर्व घटकांतील लोकांना न्याय मिळवून देऊ शकते.मुळातच शिक्षण हे निःशुल्क असायला पाहिजे. कोणतेही शिक्षण असू द्या ते ग्रहण करण्याचे सगळे मार्ग हे सर्व समाजासाठी सारख्याच पध्दतीने मोकळे झाले पाहिजे. त्याच्यासाठीच गेली २०वर्षापासून कार्यशील असणारे एकमेव नेतृत्व म्हणजे डॉ.हर्षवर्धन दवणे होय.आज घडीला स्वा.रा.ती.म.विद्यापीठाच्या अधिसभेच्या (सिनेट)सदस्य निवडीच्या निवडणूका लागल्या आहेत. त्यामुळे या काळात अनेकजण आपण सिनेट सदस्य निवडणूक म्हणून येण्यासाठी सर्वकाही पणाला लावत अहात. त्यात डॉ.हर्षवर्धन दवणेही मोठ्या जोमाने तयारीत आहेत.लोकांचा वाढता प्रतिसाद, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, विविध शैक्षणिक संघटना, विद्यार्थी, पालक, त्यांचा असणारा प्रचंड जनसंपर्क आणि विशेष म्हणजे या शैक्षणिक प्रवासातील आजी माजी विद्यार्थी, कर्मचारी ,मित्र परिवार यांच्याशी असणारे थेट संबंध या बाबी त्यांना विजयाची पुष्पमला घालतील हे मात्र नक्कीच. माझा आणि माझ्या काही मित्राचा अनुभव ,पाहणीतुन पुढे आलेल्या गोष्टी म्हणजे डॉ.हर्षवर्धन यांनी केवळ शिक्षण घेतले नाही तर त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला आहे. कारण आपण केवळ नोकरीसाठी शिक्षण घेण्याच्या ध्येयाने शिक्षणाच्या प्रवाहात प्रवेश करतो.आपली डिग्री आपली नोकरी लवकरात लवकर कशी प्राप्त करावी आणि आपले उपजीविकेचे साधन शोधावे हाच आपला सर्वांचा बेत असतो.पण यापलीकडे जाऊन काही माणसं जेव्हा सर्वांना शिक्षण, सर्वांना न्याय मिळावा म्हणून खटाटोप करतात अशी ध्येयवेडी माणसे आजच्या काळात शोधूनही सापडणार नाहीत.एका तमिळ सिनेमातील आशय बोध स्पष्ट करतांना त्यात असे म्हटले आहे की,तुमच्याकडे जमीन जुमला असेल धन दौलत असेल तर ते कोणीतरी हिसकावून घेईल चोरून, घेईल, तुमच्यावर हल्ला करेल पण शिक्षण,ज्ञानचं हे असे एकमेव धन आहे जे कोणीच लिबाडून घेणार नाही. म्हणून मानवाच्या जीवनात शिक्षण किती महत्वाचे आहे ही बाब याठिकाणी स्पष्ट होते.त्यामुळे याच शिक्षणाला वाचवायचे असेल किंवा शैक्षणिक परिवर्तन घडवून आणायचे असेल तर शिक्षणाच्या दालनात अर्थात सिनेट सदस्यपदी ज्या माणसाला शैक्षणिक जाणीव आहे.जो शिक्षणातील सर्वकाही ध्येय -धोरणे, कायदा,ज्ञान जाणतो अशाच माणसाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवडून दिले पाहिजे ही प्रत्येक पालक,विद्यार्थी, आशा शिक्षित सर्व मतदारांची नैतिक जबाबदारी वाटते.कारण अन्य निवडणुकीप्रमाणे आपण या निवडणुकीला समजत असेल तर आपण आपला आणि आपल्या पिढ्याच्या शैक्षणिक नुकसानीची पायाभरणी करत आहोत असेच म्हणता येईल.डॉ.हर्षवर्धन दवणे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचा न्याय मिळवून देण्यासाठी आपला काळ ,वेळ, नोकरी सर्वकाही पणाला लावले आहे. समाजशास्त्र विषयात एम.ए. एम.फिल.पी.एचडी,नेट तसेच करून कोणत्याही कॉलेजला कायमस्वरूपी प्राध्यापक म्हणून त्यांना नोकरी करता आली असती पण नोकरी अली की बंधने आली मग विद्यार्थ्यांसाठी कोण लढणार..?हाही प्रश्न उपस्थित होतो.त्यामुळे डॉ.हर्षवर्धन दवणे यांचा हा एक प्रकारचा त्याग आणि त्यांची कार्यशीलता या संपूर्ण बाबीचा आपण प्रकर्षांने विचार करावा आणि डॉ.हर्षवर्धन दवणे यांना आगामी १३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी त्यांना खुल्या प्रवर्गातील पसंती क्रमांक १ देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी कराल आणि शैक्षणिक बदलाच्या कार्यात आपले योगदान देऊन सहकार्य काराल हीच अपेक्षा..

आपलाच
मनोहर सोनकांबळे
-8459233791

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button