भारतीय संविधान आणि भारतीय समाज
*भारतीय संविधान आणि भारतीय समाज*
विनोद पंजाबराव सदावर्ते
मोबा:९१३०९७९३००
**************************************
२६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये उच्च शिक्षीत लोक खूप असले तरी संविधान अभ्यासक लोक फक्त अपवादात्मक आहेत. कारण ज्यांना आपण उच्च शिक्षीत समजतो त्या लोकांनी कधीच संविधान वाचले नाही, काही लोकांनी संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले म्हणून वाचले नाही, काहींनी तर संविधान बौद्धांचा धम्म ग्रंथच आहे अस समजून ते वाचले नाही. काही लोकांनी आम्हाला संविधानाने काहीच दिले नाही म्हणून वाचले नाही, काहींनी स्पर्धा परिक्षेची तयारी करून मिरीट येण्यासाठी वाचले पण वाचलेले कळालेच नाही. ज्यांना संविधान हा भारतीय ग्रंथ असुन ते सर्वोच्च आहे याची जाणीवच नाही त्यांना उच्च शिक्षीत म्हणणे म्हणजे आंधळ्याला राखण्याचे काम दिल्या सारखे होईल. डोक्यामध्ये जातीयतेची घाण, मिडिया, राजकारण आणि वेगवेगळ्या कट्टरवादी संघटनेने संविधानाला दुर्लक्षित करून काही लोकांनी चुकीची मांडणी केली व संविधान हा बौद्धांचा ग्रंथ होऊन बसला. बर बौद्धांनी भारतीय संविधान वाचले अशातला काहीच भाग नाही. काही बौद्धांच्या घरी भारतीय संविधानाची प्रत असेल पण ती शोकेस मध्ये बंद आहे. सरकार, मिडिया यांनी कधीच संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याचे पावित्र्य राखले पाहिजे, संविधान साक्षर जनता व्हायला पाहिजे या बाबद कधीच राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम झाले नाही. लोकांना धार्मिक ग्रंथ महत्त्वाचे वाटतात पण राष्ट्रीय ग्रंथाविषयी कुठल्याही प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये दिसत नाही. परंतु संविधान हे घराघरात पोहचवणे आणि संविधान प्रत्येकाला समजून सांगणे हे प्रत्येक संविधान अभ्यासकाचे काम आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे संविधान फक्त बौद्धांचे आहे हे मेंदु गहाण ठेवून बोलल्या पेक्षा एकदा संविधान वाचुन संविधान समजून घेणे सार्थ ठरेल. संविधान समजून घेताना जात, धर्म, पंथ, कट्टरता, भेदभाव बाजूला सारून शुद्ध मनाने मेंदुचा योग्य वापर करून संविधान समजून घेणे आवश्यक आहे. समजून घेताना *आरक्षण, सवलत* यावर भर देऊन बौद्धांना सवलती आहेत, आरक्षण आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले म्हणजे फक्त बौद्धांसाठीच आहे अशी ओरळ आपल्या येथे ओरडली जाते. पण आरक्षण फक्त बौद्धांनाच आहे, एकाच जातीला आहे, त्यांनाच सवलती आहेत अस बोलणे म्हणजे निव्वळ मेंदू गहाण ठेवल्याचे लक्षण होय.
आरक्षण समजून घ्यायचेच असेल तर अगोदर आपल्याला आरक्षण दिले कशाच्या आधारावर हे लक्षात घेतले पाहिजे. आज काही लोक म्हणतात आर्थिक आधारावर आरक्षण मिळायला पाहिजे. पण आरक्षण नेमके देण्याची वेळ का आली हे समजून घेऊन. चातुर्वण्य व्यवस्थेमुळे शुद्रांना फक्त गुलाम बनवून चाकरी करण्याचे काम दिले. वर्ण व्यवस्थेने शुद्रांना बरोबरीचा अधिकार दिला नाही. सामाजिक दृष्टीने त्यांना दुय्यम माणुन हक्क अधिकारा पासून वंचित ठेवले. ज्यांना सामाजिक दृष्टीने मागास ठेवले त्यांना विकास, समता, न्याय यांच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची सुरवात झाली. आरक्षणाची सुरवात ही राजर्षी शाहु महाराज यांनी केली, राजर्षी शाहु महाराज म्हणजे लोकांना बौद्धांचे राजे वाटतात. कारण सत्य इतिहास वाचणे आणि समजण्या एवढा परिपक्व मेंदू अपवाद वगळता भारतीय लोकांचा नाही याची प्रचिती नेहमी येते. राजर्षी शाहु महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुळातील चौथे शाहु महाराज म्हणून ओळखले जातात. म्हणजे आरक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नाही तर राजर्षी शाहु महाराज यांनी सुरु केले. उच्च वर्णीय लोक खालच्या वर्णातील लोकांना न्याय, समता, हक्क अधिकार मिळू देत नव्हते म्हणून राजर्षी शाहु महाराज यांनी मागास लोकांचा सार्वांगिक विकास व्हावा म्हणून आरक्षण सुरू केले. शाजर्षी शाहु महाराज यांची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनाबद्ध करून त्याला शासकीय संरक्षण दिले. *आता आपण आरक्षण कोणाकोणाला मिळते हे बघुया. SC ला १३% आरक्षण ५९ जाती, ST ला ७% आरक्षण ४७ जाती, OBC ला १९% आरक्षण 346 जाती, SBC ला २% आरक्षण ७ जाती, VJ ‘अ’ ३% आरक्षण १४ जाती, NT-B ला २.५% आरक्षण २८ जाती, NT-C ला ३.५% १ जात, NT-D ला २% आरक्षण १ जात. अशा पद्धतीने आरक्षणाची विभागणी झाली आहे. सदर विभागणी ही महाराष्ट्र राज्याची आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जातीला आरक्षण नाही तर समुहाला आरक्षण आहे आहे आणि एका समुहामध्ये एकापेक्षा जास्त जाती आहेत. आणि विषेश कोणत्याही जातीला प्राधान्य क्रम न देता अनुक्रम देऊन सर्वांना समान संधी दिली आहे. ही जर रचना कळाली असती तर आरक्षण एकाच जातीला आहे असे संकुचित विचार डोक्यात आलेच नसते. थोडक्यात काय तर जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास होते त्यांना आरक्षणाच्या चौकटीमध्ये बसवले आहे.
संविधानाने हक्क अधिकार सर्वांना समान दिले आहेत. संविधानाने दिलेले अधिकार खालील प्रमाणे- १) समतेचा हक्क २) स्वातंत्र्याचा हक्क ३) शोषनाविरूद्धचा हक्क ४) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क ५) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि ६) घटनात्मक उपाय योजनांचा हक्क. वरील हक्क बहाल करून प्रत्येकाला मानसन्मान प्राप्त करून स्वाभिमानाचे जिवन दिले आणि राष्ट्र मजबूत केले. ह्या गोष्टी संविधानाने सर्वांना सारख्या च दिलेल्या असल्या तरी स्वतः ला सुशिक्षित समजणाऱ्या लोकांना जर कळत नसेल तर त्या व्यक्तीचे शिक्षण काय कामाचे? किमान संविधान दिनी या गोष्टी लक्षात घेऊन आरक्षण आणि हक्क हे जरी माहिती झाले तर आरक्षण नेमके कोणाला आहे आणि किती महत्वाचे आहे याची प्रचिती येईल. अधिकार सर्वांना सारखेच आहेत ते देताना कोणत्याही प्रकारचा भेद केला नाही. म्हणजे जात धर्म पंथ वर्ण लिंग या कोणताही प्रकारच्या भेदाचा विचार न करता माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानी जिवन बहाल केले. संविधान दिनानिमित्त आपण संविधान घराघरात पोहचण्याचा संकल्प करून चालणार नाही तर संविधान प्रत्येक नागरिकाच्या हिताचे कसे आहे या बद्दल प्रबोधन करणे आवश्यक आहे. आणि संविधाना विषयी प्रबोधन करताना संविधानाची मांडणी योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. ज्यांनी संविधान डोक्यावर घेतले अशा बौद्ध समुहाने संविधानाची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली आहे. आमच्या बापाने संविधान आमच्या च साठी लिहले असे बोलुन चुकिचा प्रचार करण्यात येतो म्हणून संविधान घराघरात पोहचले नाही आणि संविधान जागृती झाली नाही. संविधान हे राष्ट्र मजबूत करून प्रत्येक व्यक्तीला बरोबरीचे स्थान देउन प्रगतीचे दार उघडे करून दिले. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान असुन जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. याची माहिती जाणीव जगाला आहे भारतीय बुद्धीमंद लोकांना नाही. भारतीय संविधानाचा संबंध जाती धर्माशी जोडणे, बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले म्हणून न वाचने हे फक्त आणि फक्त द्वेष आणि भेदभावाचे लक्षण आहे. भारतीय संविधान राष्ट्रीय ग्रंथ आहे जो पर्यंत आपण स्वतः वाचून त्यावर कोणी ममन करणार नाही तोपर्यंत कळणार नाही. संविधान घराघरात पोहचवण्यासाठी आपल्याला संविधानाचा जो गाभा आहे तो गाभा तरी कोणत्याही प्रकारची द्वेष भावना वा श्रेष्ठ पणा न बाळगता लोकांच्या मनात रुजवणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला संविधानाचा गाभा कळेल तेव्हा संविधानाने कोणत्याही धर्माला जातीला, पंथाला झुकते माप न देता एकाच बंधनात बांधून ठेवले आहे. संविधानामुळे जातीवाद, भेदभाव संपुष्टात येऊन सर्वाना समान संधी दिली. आणि हीच बाब लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. भारतीय संविधान हे भारतीय माणसाने समजून घेऊन राष्ट्र हिताला हातभार लावणे काळाची गरज आहे. संविधान दिनी आपण संविधान अभ्यासक, तज्ञ, यांनी कमीत कमी संविधानाचे आरक्षण, हक्क अधिकार याविषयी प्रबोधन केले तरी भारतीय समाज संविधान साक्षर होण्यास सुरवात होईल.
*संविधान दिनाच्या भारतीय नागरिकांना हार्दिक सदिच्छा, आणि आपल्या ज्ञानाचा वापर देशहितासाठी करून सर्वांना एकच किंमत बहाल करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन*
**************************************
विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
**************************************