विद्यापीठाच्या सिनेटमध्ये सभागृहात शिक्षणसम्राटाची बांडगुळ नको तर शैक्षणिक न्याय हक्कासाठी लढणारे प्रतिनिधी पाठवा -डॉ.हर्षवर्धन दवणे
विद्यापीठाच्या सिनेटमध्ये सभागृहात शिक्षणसम्राटाची बांडगुळ नको तर शैक्षणिक न्याय हक्कासाठी लढणारे प्रतिनिधी पाठवा -डॉ.हर्षवर्धन दवणे
नांदेड:दि ११
विद्यापीठाचे सिमेंट सभागृह म्हणजे एक प्रकारे राज्यसभेचे सभागृह असून यात निवडून देण्यात येणारे प्रतिनिधी हे शिक्षणसम्राटाचे बांडगूळ असणारे नको तर शैक्षणिक हक्कासाठी लढणारे प्रतिनिधी सिनेट सभागृहात पाठवा असे प्रतिपादन विद्यापीठ महाविकास आघाडी पॅनलचे खुल्या प्रवर्गातील उमेदवार डॉ.हर्षवर्धन दवणे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची सिनेट सदस्य निवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार असून त्या निमित्ताने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दवणे म्हणाले की ,विद्यापीठामध्ये गरीब, अल्पसंख्याक ,बहुजनांचा आवाज गुंजला पाहिजे. या पत्रकार परिषदेस विद्यापीठ महाविकास आघाडी आघाडी पॅनल नांदेडचे खुल्या प्रवर्गातील उमेदवार दवणे हर्षवर्धन किशनराव तसेच फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील नरबाग यांची उपस्थित होती. मागील २०वर्षांपासून विद्यार्थ्यांचे न्याय हक्कासाठी आपण लढत असून हाच लढा सिनेट सभागृहात देण्यासाठी नोंदणीकृत मतदारांनी आमच्या पॅनलला विजयी केल्यास विद्यापीठांमध्ये चाललेल्या भोंगळ कारभार आपण अंकुश आणणार असून विद्यापीठाकडून मार्कमेमोची दुसरी प्रत देण्यात येते त्यावरील डुप्लिकेटचा शिक्का मोर्तबही बंद करू त्याचबरोबर विद्यापीठांमध्ये महापुरुषांच्या नावाने विविध अध्यासन केंद्र स्थापन करण्यासाठी आणि एम. ए .उर्दू अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन विद्यापीठ महाविकास आघाडी पॅनल नांदेड येथील खुल्या प्रवर्गातील उमेदवार दवणे हर्षवर्धन किसनराव यांनी पत्रकार परिषद दिले. विद्यापीठ महाविकास आघाडी पॅनलच्या सिनेट सदस्य निवडणूक रिंगणात एकूण नवीन नऊ उमेदवार असून त्यात नांदेड येथून हर्षवर्धन दवणे,नांदेड (खुला प्रवर्ग), परभणी येथून प्रा. डॉ.अरुण लेमाडे (खुला प्रवर्ग), श्रीकृष्ण दिवे ,लातूर(खुला प्रवर्ग), प्रा. मोहीम सन्नाउल्लंखान परभणी (खुला प्रवर्ग)विठ्ठल सोळंके ,हिंगोली(खुला प्रवर्ग) ,प्रा.डॉ.केशव जोंधळे पूर्णा,(अनुसूचित जाती)शांतलिंग काळे, पाथरी (इतर मागास वर्ग), प्रकाश रवंदळे पूर्ण -परभणी (भटक्या जमाती प्रवर्ग)ममता पाटील गाडेकर सिडको नांदेड,(महिला प्रवर्ग) याप्रमाणे उमेदवार असून मराठा संघर्ष समिती ,मुप्टा शिक्षक संघटना, महात्मा फुले शिक्षक परिषद ,पंजाराव देशमुख शिक्षक परिषद ,अनुसूचित जाती- जमाती-विजा अधिकारी -कर्मचारी संघटना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना,नसोसवायएफ विद्यार्थी संघटना,सजा संघटना,फुले शाहू आंबेडकर युवा मंच इत्यादी संघटनांचा या विद्यापीठ महाविकास आघाडी पॅनलला समर्थन आहे. या पत्रकार परिषदेचे प्रस्तावित स्वप्नील नारबाग यांनी केले तर नसोसवायएफचे राज्य प्रवक्ते प्रा.सतीश वागरे व जिल्हा प्रवक्ता मनोहर सोनकांबळे यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, ही पत्रकार परिषद यशस्वी करण्यासाठी स्वप्नील नरबाग, प्रा.सतीश वागरे,बालाजी कोंडामंगल,प्रकाश दीपके,प्रवीणकुमार सावंत,जयवर्धन गच्चे,धम्मपाल वाढवे, अनुपम सोनाळे, किरण भिसे, अक्षय पारदे,अनुपम सोनाळे, किरण भिसे, अक्षय पारदे,अक्षय कांबळे,मनोहर सोनकांबळेे,प्रा.सचिन नरवाडे,सागर घोडके, दिनेश येरेकर, सदानंद गायकवाड, राजरत्न पवार, आनंद कदम, शुभम दिग्रसकर, मयूर शेरे, श्रीनिवस् पाटील, निखिल गर्जे, लक्ष्मण वाठोरे, विजय थोरात आदींनी परिश्रम घेतले.