३१ डिसेंबरच्या आता सर्व विद्याशाखेच्या आरएसी घेण्यात यावी-नसोसवायएफ

३१ डिसेंबरच्या आता सर्व विद्याशाखेच्या आरएसी घेण्यात यावी-नसोसवायएफ
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पी.एचडी प्रवेश प्रक्रियेतील सर्व विद्याशाखेच्या प्रथम आरएसी प्रक्रिया ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी नसोसवायएफ या संघटनेकडून प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंग बिसेन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पी.एचडी प्रवेशासाठी पेट २०२२ अशी जाहिरात मे महिन्यात काढली होती.त्यासाठी प्रवेश परीक्षा आणि निकाल ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून २१ नोव्हेंबर रोजी विज्ञान शाखेची आरएसी आयोजित करण्यात आली होती.मात्र अध्यापकांचे सिनेट (अधिसभा) निवडणूक असल्याने चारही विद्याशाखेच्या आरएसी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे पी.एचडी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या पेट उत्तीर्ण व पेट मधून सूट प्राप्त विद्यार्थ्यांचे सारथी, महाज्योती आणि बार्टीच्या २०२२ च्या फेलोशिप जाहिरातीय अर्ज दाखल करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक असे मोठे नुकसान होईल
त्यामुळे लांबत जाणारी आरएसी डिसेंबरच्या आत आयोजित करून संपन्न करण्यात यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल असे निवेदन नॅशनल एसी एसटी ओबीसी स्टुडंट अँड युथ फ्रंट या विद्यार्थी संघटनेने प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंग बिसेन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले म्हटले आहे.यावर नसोसवायएफ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन दवणे,राज्य प्रवक्ता प्रा.सतीश वागरे,डॉ.किरण भिसे,अनुपम सोनाळे, आदिनाथ डोपेवाड, जिल्हा प्रवक्ता मनोहर सोनकांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.