वर्तमानपत्र देशाचा आरसा की त्याबद्दल लोकांमध्ये शांसकता..
वर्तमानपत्र देशाचा आरसा की त्याबद्दल लोकांमध्ये शांसकता
वर्तमानपत्र तसं पाहता देशाचा आरसा आहे. कारण ते वर्तमानपत्र आपल्याला राजकीय घडामोडींची माहिती देत असते. कुठे पूर आला, कुठं भुकंप आला, कुठं महामारी आली आणि कुठं भुस्खलन झालं याची पुरेपूर माहिती देत असते. एखाद्या वेळेस मिडीया अर्थात दूरसंचार साधनं खोटी माहिती प्रसारीत करू शकतील, परंतू वर्तमानपत्र ती माहिती प्रसारीत करू शकत नाही. कारण सोशल मिडीया अर्थात दूरसंचार साधनांची माहिती टिकत नाही. परंतू वर्तमानपत्रातील दृश्य हे अनेक दिवसपर्यंत जतन करता येत असल्याने त्यातून खोट्या बातम्या प्रसवता येत नाही. पर्यायानं सांगायचं झाल्यास वर्तमानपत्र प्रेरणा देण्याचं काम करीत असतात.
सोशल मिडीया एक जबाबदार घटक. माहिती संप्रेषणाचं एक प्रभावी माध्यम. परंतू पारदर्शक माध्यम नाही. त्या मिडीयावरुन क्षणात माहिती मिळत असते. परंतू जी माहिती मिळते. त्यामध्ये तेलमीठ, मालमसाले टाकल्यागत रोचक मसाला घालून तो मुद्दा गाजवला जातो. त्यातच काही भाग असं प्रकरण गाजवत असतांना त्यात काही खोट्या गोष्टींचाही भरणा केला जातो. अशी मालमसाला टाकलेली बातमी फार काळ टिकत नाही. ती लवकरच कालबाह्य होते.
अलीकडे सोशल मिडीया विकलेली एक वास्तूच आहे. जसं जी वास्तू वा एखादी इमारत आपण खरेदी करतो. त्या वास्तू वा इमारतीचा उपभोग आपण आपल्या मतानुसार आपल्या आपल्या परीनं जसा घेत असतो. तसाच उपभोग काही राजकारणीही सोशल मिडीयाचा घेत असतात. ते अशा सोशल मिडीयाला विकतच घेवून टाकतात. ही वास्तविकता आहे. आज अशाच प्रकारचं कार्य प्रत्येक राजकीय पक्ष करीत असलेला आपणास दिसत आहे.
वर्तमान पत्र मात्र तसं नाही. वर्तमानपत्रात सर्वच भाग जो छापून येतो. तो सत्य असतो. तो भाग बहुतेक स्वरुपात असत्य राहात नाही. तसंच सोशल मिडीयासारखाच हा भाग विकलाही जात नाही. परंतू हे जरी सत्य असलं तरी आजचं वर्तमानपत्र आपला दर्जा टिकवतांना दिसत नाही असं दिसतं. आजचं वर्तमानपत्र हे विकलं जातं असंही दिसतं आणि आजच्या वर्तमानपत्रावरुन असं दिसतं की ह्या वर्तमानपत्राला प्रत्यक्ष कोणीतरी राजकीय पक्षानं विकत घेतलेलं असावं. त्या पद्धतीने ते कार्य करीत असतात.
तसं पाहिल्यास वर्तमानपत्राला लोकशाहीचा पहिला स्तंभ मानण्यात येतो. तो लोकशाहीचा चवथा स्तंभच आहे. कारण त्या स्तंभातून न्याय मिळत असतो. असा न्याय की त्यातून लोकशाही जागृत राहू शकते. समजा एखाद्यावर अन्याय झाला आणि त्याला न्याय जर मागायचा असेल तर हा लोकशाहीचा चवथा स्तंभ काम करीत असतो आणि त्याला न्याय मिळतोही. परंतू काही काही आजच्या काळातील हेच लोकशाहीचे चौथे स्तंभ हे आपले कार्य बरोबर करीत नसल्याने आजच्या काळात या लोकशाहीच्या चवथ्या स्तंभावर सांशकता निर्माण झाली आहे. त्यामुळं विशेष सांगायचं म्हणजे ज्याला आपण लोकशाहीचा चवथा स्तंंभ समजतो. ज्याला आपण आपल्या स्वतःच्या संरक्षणाचा स्तंभ समजतो. त्या लोकशाहीच्या स्तंभानं काळजी घ्यायला हवी. त्यानं कोणाच्या दबावात न येता कार्य करावे. तसेच कोणाच्या दडपणात न येता सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावे. जेणेकरुन लोकांना या चवथ्या स्तंभावर विश्वास वाटेल व लोकांमध्ये शांसकता निर्माण होणार नाही. लोकांना तो देशाचा आरसा वाटावा असं कार्य वर्तमानपत्रानं करायला हवं. वर्तमानपत्रानं पारदर्शक असायला हवं त्याचबरोबर निर्भीडही हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर