राज्य

विदर्भातील बहुचर्चित करोडो रुपयांचा रेल्वे भ्रष्टाचार;आज विधान भवनात गाजणार की वाजणार..

विदर्भातील बहुचर्चित करोडो रुपयांचा रेल्वे भ्रष्टाचार;आज विधान भवनात गाजणार की वाजणार..

सुनील शिरपुरे/यवतमाळ

यवतमाळ: यवतमाळ येथील बहुचर्चित वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खनणातील गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात चर्चेचा मुद्दा असल्यामुळे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्यासोबत आज चर्चा झाली. आज विधान भवनात वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खनणातील गौण खनिज भ्रष्टाचार विधान भवनात गाजणार की वाजणार.! असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयाचा गौण खनिज रेल्वे कंत्राटदार, उपकंत्राटदार यांनी राज्य सरकारच्या काही संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांशी हात मिळवून खुल्या बाजारात विकला. ह्या संदर्भात सतत पाठपुरावा करून वारंवार संबंधित वरिष्ठांना तक्रारी करून सुद्धा त्याचबरोबर आमरण उपोषण *’जिंकू किंवा मरू’* आंदोलन अशा प्रकारच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करून सुद्धा संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कुठल्याही पद्धतीची कारवाई हेतूपूर्वक केल्या गेलेली नाही. त्यामुळे तक्रारदार तथा नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टचे सचिव अमोल कोमावार यांनी वारंवार मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मा.उपमुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस, मुख्य सचिव महसूल विभाग मंत्रालय मुंबई तसेच भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सुद्धा तक्रारी वजा निवेदने सादर केलीत. परंतु या गंभीर प्रकरणाकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नव्हते. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा.अजित दादा पवार यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या भ्रष्टाचार प्रकरणातील राज्य शासनाचे भ्रष्ट अधिकारी कुणाल झाल्टे तहसीलदार यवतमाळ व राजेंद्रगिर गोसावी निवृत्त जिल्हा खनिकर्म अधिकारी यवतमाळ यांच्यावर चौकशी व कठोर कारवाई करून गौण खनिजाची मोजणी करून दंडात्मक रक्कम यांच्या खाजगी संपत्तीतून वसूल करण्यासाठी प्रामुख्याने निवेदन सादर करण्यात आले.
पत्रकारावर केलेला अन्याय, प्रकरण दडपण्यासाठी त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या पदाचा गैरफायदा घेऊन चुकीचे दस्ताऐवेज तयार करणे, तक्रारदारावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारच्या अनेक अनैतिक प्रकाराला जबाबदार असणारे कुणाल झाल्टे तहसीलदार यवतमाळ व त्यांचे सहकारी मित्र यांचेवर सक्तीने कारवाई करण्यासाठी व प्रकरणाला गंभीरपणे घेऊन चौकशी करून न्याय देण्यासाठी पोलीस खात्यांना सुद्धा तक्रारी दाखल केलेल्या आहेत. याबाबत सुद्धा निवेदनात स्पष्ट नमूद केलेले आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील गौण खनिजाचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार हा रेल्वे ठेकेदार आर.भरत रेड्डी व त्यांचे उपकंत्राटदार अमित सुभाष मुथा व इतर उपकंत्राटदार यांनी कोरोनाचा फायदा घेत राज्य सरकारच्या काही संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांशी हात मिळवनी करून केला. अंतर्गत रस्ते, निवासी प्रयोजनासाठी असलेल्या लेआउट मधील खोलगट भागातले प्लॉट, एमआयडीसी, हॉटेल समोरील पार्किंग, नाल्यातील अतिक्रमण करून तयार केलेले प्लॉट अशा ठिकाणी हे गाव खनिज दलालांमार्फत विक्री करून करोडो रुपयाचा गैरव्यवहार करण्यात आला. या संदर्भात जाय मोक्यावर मुद्देमालासह ट्रक व गौण खनिज पकडून दिल्यानंतर सुद्धा आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांवर कुठल्याही विभागाने त्यांचे दोष सिद्ध झाल्यानंतर सुद्धा कारवाई केली नाही. परंतु या सर्व प्रकाराला सर्वांसमक्ष आणून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या तक्रारदाराला आज माननीय अजितदादा पवारांच्या रुपाने एक आशेचा हिरवा कंदील मिळाला. आज विधान भवनात रेल्वे भ्रष्टाचार प्रकरण गाजणार की वाजणार..! यासंबंधी सर्वांचे लक्ष लागले आहे.

*रेल्वे भ्रष्टाचार प्रकरणासंबंधी चर्चा*
*विरोधीपक्ष नेते अजित दादा पवार यांनी तक्रारदार नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टचे सचिव अमोल कोमावार सोबत सविस्तर चर्चा केली. वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्प व उत्खननातील गौण खनिजांचा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार विषयी सखोल चर्चा करून या प्रकरणाची गंभीर दखल विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी घेतली. नागपूर हिवाळी अधिवेशनात बहुचर्चित रेल्वे भ्रष्टाचार उघडकीस आणून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले आहे.*

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button