जगण्याचा उद्देश असावा!
जगण्याचा उद्देश असावा!
अलीकडे लोकं जगगत असतात. किड्यामुुंग्यांसारखं जगत असतात असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण त्यांचं जगणं तसंच असतं अगदी. काहीतरी खावून जगणं. मोठं होणं. त्यानंतर विवाह करण. दोनचारर पोरं पैदा करणं आणि म्हातारं झाल्यावर नातवांना सांभाळणं. कधी एखाद्यावेळी एखादं मोठं घर बांधणं. एवढ्या गोष्टी सर्वच करीत असतात. यात कसला आला उद्देश? कोणताच उद्देश दिसत नाही यात. आता कोणी म्हणेल की आहे ना उद्देश. तो घर बांधतो ना. प्राणीमात्रा घर बांधतात का? बरोबर आहे ते. कारण प्राणीमात्राचा विचार केल्यास तेे घर बांधत नाहीत. यावर मला लहानपणीची तिस-या वर्गात शिकलेली गोष्ट आठवते. माकडाचं घर.
एक माकड असतं. ते माकड या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत असतं. वर्षातून आठ महिने त्याला घर बांधायचं नसतं. कारण पाऊस नसतो. परंतू ज्यावेळी पाऊस सुरु होतो, तेव्हा त्याला घर आठववतं. कारण तो ओलै होता असतो पावसाने.. थंडीही लागत असते. माणसाचंही असंच आहे. तो थंडी, ऊन वा-यापासून संरक्षण करण्यासाठी घर तर बांधतो, परंतू त्यावरती त्याचा काही उद्देश नसतो. मुलं पैदा करणं हा उद्देश नाही. ते कार्य तर प्राणीमात्रााही करतात. तेही घर बांधतातच. ज्यावेळी पाखरं अंडे घालतात. त्यावेळी त्या अंड्यांना ठेवण्यासाठी आणि उबविण्यासाठी पाखरांना घर बांधणं आवश्यक असतं. ते अतिशय सुबक घर बांधत असतात. प्राणीही आपल्या पिल्लांना रस्त्यावर जन्म देत नाहीत. तेही गृहेचा वा झााडाझुडपाचा आधार घेतात.
माणसाचं कोणतं तरी एक ध्येय असावं. केवळ मुलं पैदा करण्याला वा जन्माला घालण्याला ध्येय समजू नये. तसंच घर बांधण्यालाही नाही. मग कोणाला ध्येय मानावं. असे ध्येय कोणतेच तर नाही जगात.
लोकं वरील प्रकारचे शब्द नेहमी वापरत असतात. त्यातच कोणी पैसे कमविण्याला ध्येय समजून त्याला आधी प्राधान्य देतात. पैसे प्राणी कमवत नाही असं म्हणतात. परंतू त्यालाही ध्येय मानू नये. मग ध्येय नेमकं कोणतं?
यात आणखी सांगायचं झाल्यास जी मंडळी ध्ययेय मानतात. त्या मंडळींपैकी कोणी म्हणतात की ध्येय हे उच्च असावं. ध्येय असं असावं. तसंं असावं. परंतू नेमकं ध्येय कोणतं ते सांगत नाहीत.
ध्येय नेमकं कोणतं याचा विचार केल्यास निर्मीतीला आपल्याला ध्येय मानता येईल. निर्मीती मग ती कोणतीही असो, घर बांधणंं वा ममुलं पैदा करणं वा रैसा कमवणं ही देखील निर्मीतीच आहे. तेही ध्येयच आहे. ध्येयालाच उद्देशही म्हणता येईल. परंतू ते सर्वसामान्यांचं ध्येय झालं. पशूपक्षांचं ध्येय झालं ते. कारण तेही एक पैसा सोडला तर घर बांंधणे आणि मुलं पैदा करणे या गोष्टी करीत असतात. आपण मानव आहोत. आपण पशूपक्षी नाही. त्यामुळं आपण त्या तीनन गोष्टी सोडून इतरही गोष्टी करु शकतो. जसे. मोठमोठे पद प्राप्त करणे, संशोधन करणे, साहित्य लेखन करणे, चित्र रेखाटणे, संगीत, चित्रपट निर्माण करणे, गीत तयार करणे. शोषीतांना न्याय मिळवून देणे. इत्यादी सर्व गोष्टी या ध्येयात मोडतात. माणूस म्हणूून आपण जन्माला आलोय ना. मग अशाचप्रकारचं ध्येय ठेवावं जीवनात. आपलं मनोरंजनही होईल.
जीवन हे सुखदुःखानं भरलेलं आहे. अलीकडे दुःखानं कोणालाच सोडलेललं नाही. पशूपक्षांचं दुःख वेेगळं. त्यांना तर कळतच नाही की त्यांचा जीव केव्हा जाईल. जंगलात एखादा शाकाहारी प्राणी केव्हा एखाद्या मांंसाहारी प्राण्यांचा घास बनेल, ते सांगता येत नाही. तसंच कोंबडे, बककरे, मासे आदिंसारखे प्राणी तर जणू मरणासाठीच जन्म घेतात की काय, असं त्यांचं दुःखानंं भरलेलं जीवन. आपण त्यामानानं फारच सुखी आहोत. आपल्याला त्या प्राण्यांंसारखं कोणी केव्हाही कापत नाहीत. मग आपल्यासारखा एवढा सुखी कोण? कोणीच नाही. मग आपण का बरं लाचाारासारखं वागतो. नेहमी आम्हाला फारच दुःख आहे असं आपलं तुणतुणं असतं. तेच तुणतुणं हालवत आपण आपला उद्देश संपवतो.
आपलाही उद्देश असावा. विलक्षण असा उद्देश असावा आपला. शिवरायांसारखं ध्येय आपलंही असावं. डॉ. बाबासाहेबांसारखा ते प्राप्त करण्यासाठी खटाटोप असावा आणि सावित्रीबाई फुलेंसारखी निष्ठा असावी. थॉमस अल्वा एडीसन शिकला नव्हता, परंतू ध्येय उच्च होतं त्यांचं. त्यांनी त्याच ध्येयाच्या जोरावर अख्ख्या जगासमोर उजेेड निर्माण केला आणि ममाायकेल फरेडे……तोही शिकला नव्हता. परंतू त्यानं जग जवळ आणलं डिझल इंंजीन बनवून. लुई पाश्चर दोन वर्ग शिकला होता फक्त. परंतू इंजेक्शनं तयार केलीत त्यानं.
आज अशी कितीतरी माणसंं अ्शी आहेत की जी शिकलेली नव्हती. परंतू उच्च ध्येयानं ती आजही आठवतात आपल्याला. ध्येय प्राप्तीसाठी केवळ शिकावं लागत नाही. हं, शिकल्यानं थोडीशी बुद्धी वाढते. काहींची जजास्तच वाढते. ती मंडळी चांगलं करीतच नाही कधी.
शिका. मी सारखा शिकू नका म्हणत नाही. शिका. परंतू शिकल्यावर आपलं ध्येय विसरुु नका म्हणजे झालं. काही काही मुलं शिकतात, परंतू शिकल्यानंतर तेे काम मिळवतात. ध्येयही गाठतात. परंतू मायबापाची सेवा करु शकत नाहीत. असं शिकणंं कोणत्या कामाचं आणि ते त्यांचं ध्येयही कोणत्या कामाचं?
विशेष म्हणजे माणसानं माणूस म्हणून जन्म घेतला ना. कधीतरी तो मरणारही आहे. कारण जे अस्तित्वात आहे. ते कधीतरी संपणारच.. ते शाश्वत नसतं. त्यात तो किती शिकला आणि किती नाही हे पाहता येत नाही आणि पाहूही नये. फक्त त्यानं काय काय केलं हे पाहावं.
आज घर बांधण्याची स्पर्धा सुरु आहे. जणू स्पर्धाच लागली आहे. जे आपलंं ध्येय नाही. अन् जे ध्येय आहे, त्याचा विसर पडत चालला आहे आपल्याला. ज्या घराला, गाडीला, पैशाला आपण आपलं ध्येय संजतो ना. ते ध्येय मरणानंतर कधीच सोबत येत नाही. मरणानंतर त्यानं किती कमवलं हे कोणीही पाहात नाही. कोणी केवढं घर बांधलं हे कोणीही पाहात नाही. तसंच कोणं कोणती गाडी घेतली होती. तेही कोणी पाहात नाही. पाहतात फक्त त्यानं कोणतं कार्य केलं ते. त्यानं केलेल्या चांगल्या कार्याचं मुल्यांकण होतं. वाईट कार्याचं नाही. त्याचबरोबर हे चांगलं कार्य तेव्हाच होतं. जेव्हा चांगलं उद्दीष्ट्य डोळ्यासमोर असतं. माणसानं जगावं. जगण्याचाही उद्देश असावा. तो उद्देश चांगला असावा. त्यानुसार चांगसे कार्य घडेल. जेणकरुन आपलं मरणानंतरही कोणी नाव घेईल व मृत्यूनंतरही आपलं नाव होईल. कारण पैसा कोणीही कमवतो. घर कोणीही बांधतो. परंतू असं कार्य कोणीही करीत नाही की ज्या कार्यानं माणसं नावारुपाला येतील. अमर राहतील. महत्वाचं म्हणजे त्यासाठी त्याचं ध्येय चांगललं असलं पाहिजे. उद्देशही चांगला असला पाहिजे. तसंच जीवनात जर समोर जायचं असेलल तर कोणतंतरी ध्येय वा उद्देश असला पाहिजे एवढंच सांगावेसे वाटते.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०